Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Archana Dagani

Children


4.5  

Archana Dagani

Children


ऋतुप्राप्ती - आईचे दृष्टीकोन

ऋतुप्राप्ती - आईचे दृष्टीकोन

3 mins 360 3 mins 360

नीता काल रात्रीपासून फार अस्वस्थ होती. काल संध्याकाळी तिची अकरा वर्षांची मुलगी तिला म्हणाली "आई माझ्या पोटात दुखतय", थोडा वेळ बसून होती तिची मुलगी मंजिरी पण नंतर छोट्या भावासोबत मस्ती करण्यात दंग झाली होती. पोटदुखी पण विसरली असावी. नीताला हे ऐकल्यानंतर मनात धस्स झालं होतं. तिला माहित होतं, मंजिरीची ऋतुप्राप्ती आता लवकरच सुरू होईल, तिला सावधान करायला हवं पण तिची हिंमतच होत नव्हती मंजिरीशी ह्या विषयावर बोलायची.


रात्रभर तिला झोप लागली नाही. ती विचार करत होती की मंजिरी बरोबर ह्या नाजुक विषयावर कशी चर्चा करावी आणि मुळात तिची प्रतिक्रिया काय असेल??? नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात सुरू होते. कधीतरी पहाटे तिला झोप लागली. सकाळी उठली तर डोके भणभणत होते, पण मंजिरीशी ह्या विषयावर सविस्तर बोलणे महत्त्वाचे होते.


तिचे कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते, मार्ग सुचत नव्हता. आज ती सकाळी चहात साखर टाकायला विसरली होती, दुपारच्या जेवणात भाजीत मीठ नव्हते. ती अस्वस्थ आहे हे तिच्या सासूने हेरले होते पण कारण काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. दुपारी सर्व अवरून जरावेळ वामकुक्षी घेण्यासाठी नीता तिच्या खोलीत गेली. तेव्हढ्यात सासू खोलीत आलेली पाहून ती उठून बसली.


"अग असू दे .."


"काही हवं होतं का तुम्हाला..."


"नाही ग काल रात्रीपासून तुला बघते, फार अस्वस्थ वाटत आहेस म्हणून तुला विचारायला आले.."


"अनिकेतशी भांडण झाले आहे का ???"


"नाही"


"मग तब्येत बरी नाही का तुझी ??.." त्यांनी मायेने नीताच्या डोक्यावर हात फिरवत विचारले.


"नाही"... मायेचा स्पर्श होताच नीता रडू लागली.


"काय झालं पोरी, मला सांग काही त्रास

होत आहे का तुला...."


"अग मला तू आई म्हणतेस ना मग सांग बघू काय झालं ते ..."


"आई, मंजिरी आत्ता अकरा वर्षांची झाली आहे, तिची ऋतुप्राप्ती कधीही सुरू होऊ शकते, कालच बोलत होती आई पोटात दुखतय म्हणून, पण ह्या विषयावर तिच्याशी सविस्तर कसे बोलावे हेच कळत नाही मला. खूप विचार केला पण काही मार्गच सापडत नाही."


"अग एवढ्याश्या गोष्टीसाठी इतका त्रास करून घेतलास स्वतःला, एकदा माझ्याशी तरी बोलायचे होतेस, मी बोलू का तिच्याशी ???"


पण तिची प्रतिक्रिया कशी असेल काय माहित नाही म्हणून मिच बोलावे असे वाटते मला.


"एक आई म्हणून तुझ्या मनातली घालमेल समजू शकते मी. तू एवढी समजूतदार आहेस मला वाटले होते तू या विषयाची कल्पना मंजिरीला दिली असशील म्हणून मी काही बोलले नव्हते एवढे दिवस. बरं असूदे.. आपण बोलू तिच्याशी..."


पण कसे ???


"काय सांगणार आपण तिला ???"


"सूनबाई अग जग फार पुढे गेले आहे हल्ली. कितीतरी पुस्तके आहेत, वेग वेगळे वेडिओस आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण तिला माहिती देऊ शकतो..."


सासूबाईंचे बोलणे ऐकून नीताला बराच धीर मिळाला होता, ह्या गोष्टी आपल्या डोक्यात का नाही आल्या ह्याचेच तिला आश्चर्य वाटले.


"तू थांब मी तिला आवाज देते".. असे म्हणत सासूबाईंनी मांजिरीला हाक मारली. मंजिरी टीव्ही बघत बसली होती.


मंजिरी धावतच आईच्या खोलीत शिरली.


मंजिरी आत्ता तू मोठी होत चालली आहेस बाळ, जरा जपून ....


आजीच्या बोलण्यावर मंजिरी जरा रागातच बोलली "आपण मोठे झालो की धावत नाही का ???"


नीता आणि सासूबाईंना हसूच आले. नीताने मंजिरीला आपल्या जवळ बसवले.


"असे नाही ग, पण आपण मोठे झालो की आपल्या शरीरात कितीतरी बदल घडतात नाही का ??? "


आईच्या बोलण्यावर मंजिरी म्हणाली हो ना, माझ्या वर्गात मिच सर्वात उंच आहे.


"हो ग जसे बाहेरून आपण वाढतो तसेच आपल्या शरीरात आतून पण खूप सारे बदल घडत असतात.


पुस्तकातून आणि वीडीओच्या माध्यमातून दोघींनी हळुवारपणे मंजुरीला पहिल्या मासिक पाळीबद्दल, शरीराच्या स्वचछतेबद्दल अशी बरीच महिती सांगितली. मंजिरीने पण व्यवस्थीत माहिती ऐकून घेतली.. आणि म्हणाली अग हे सगळे तर मला माहित आहे....


हे ऐकून दोघींना धक्काच बसला. अग तुला कसे माहित हे सगळे ???


आईच्या तोंडून नकळतच प्रश्न निघाला.


"अग गेल्या आठवड्यात आमच्या शाळेतल्या बाईंनी आमच्या सर्व सातवीतल्या मुलींचा एक वेगळा विशेष वर्ग घेतला होता. त्यात फक्त मुलीच होतो आम्ही. आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका आहेतना, त्यांनी एका स्त्रीरोगतज्ञला आमंत्रित केले होते. ही माहिती त्यांनी आम्हाला एडुकॉम् वर खूप छान समजावून सांगितली. अग ही काही व्याधी नाही हे तर ऋतूचक्र जे एका विशिष्ट वयात सुरू होते आणि विशिष्ट वयात समाप्त होते. यात घाबरण्यासारखे काहीच नाही, पण स्वछतेकडे मात्र विशेष लक्ष दिले पाहिजे."


"पण मला माफ कर, मी तुला अभ्यासाच्या गडबडीत सांगायलाच विसरले"


आपल्या मुलीची प्रतिक्रिया ऐकून नीताला फार आनंद झाला. तिच्या डोळ्यात आनंदअश्रू होते.


माझी चिमणी माझ्या पंखाखाली राहून कधी एवढी मोठी झाली कळले सुद्धा नाही.


सासूबाईंना पण मंजिरीचे बोलणे ऐकून फार बरे वाटले.


ज्या गोष्टीचा मार्ग नीताला गेले दोन दिवस सापडत नव्हता, ज्या गोष्टीसाठी ती अस्वस्थ होती, त्या गोष्टीचे उत्तर मंजिरीकडे आधी पासूनच होते.


Rate this content
Log in

More marathi story from Archana Dagani

Similar marathi story from Children