Archana Dagani

Drama

3  

Archana Dagani

Drama

घटस्फोट भाग -१

घटस्फोट भाग -१

3 mins
255


मेधा ...अग आवर लवकर, कुठे आहे माझा डबा, मला उशीर होत आहे, कालच तुला सांगितले होते ना माझी खूप इंपॉर्टन्ट मीटिंग आहे म्हणून...


अवी, अरे किती ओरडतोस सकाळी सकाळी, हे घे तयारच आहे सगळे.


मला आणि मुलांना, आम्हालाही उशीर होत आहे.

बरं चल निघतो मी ..


सायली आणि सन्नी दोघांचाही पा घेऊन तो घराबाहेर पडतो. मुलांबरोबर मेधाही अविला बाय करण्यासाठी घराबाहेर येते. तो गाडी काढतो आणि सर्वांना बाय करत ऑफिसला निघून जातो.


मुलांनो साडे आठ वाजले, आपल्यालाही निघायला हवे, नाहितर उशीर होईल.


अग आई.. आम्ही तयारच आहोत, उगाच गोंधळलेली असतेस तू ...


बरं बॅग घेऊन गाडीत बसा, शालू ताईंना थोडी कामे समजावून मी आलेच.


सासू सासऱ्यांना नमस्कार करून थोड्याच वेळात मेधा बाहेर येते व गाडीतून मुलांना शाळेत सोडवते आणि स्वतः कॉलेजला निघून जाते.दुपारी घरी येताना ती मुलांना पण घरी घेऊन येते. हाच तीचा नित्यक्रम होता.


अवि आणि मेधाच्या लग्नाला सतरा वर्ष झाली होती. पंधरा वर्षांची एक मुलगी तर सात वर्षांचा मुलगा होता. अवि एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनिअर होता तर मेधा कॉलेज मध्ये प्राध्यापिका होती. खूप सुखी, समाधानी आणि समृद्ध कुटुंब होते त्यांचे.घरात मेधा सासू सासऱ्यांची पण खूप लाडकी होती.


आज रात्री आठ वाजता अवीच्या ऑफिस मध्ये कंपनीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि सनेहभोजन आयोजित केले होते.


दुपारच्या जेवणनंतर वामकुशी घेऊन मेधा नुकतीच उठली होती तेवढ्यात अविचा फोन आला.


हा बोल ना अवि...

आज संध्याकाळी ऑफिसची पार्टी आहे लक्षात आहे ना तुझ्या???

हो लक्षात आहे ना, आवरायलाच चालले होते आणि तुझा कॉल आला...

बरं मी सात वाजता घरी येतो तुला पीकअप करायला ..

बरं..मी आवरून घेते मग. दोघांनीही फोन ठेवून दिला


मेधाने शालू ताईला रात्रीच्या जेवणाचे समजवले, मस्त आल्याचा गरमा गरम चहा घेतला, फ्रेश झाली आणि तयारीला लागली.


मेधा छान तयार झाली. हल्या गुलाबी रंगाची पैठणी नेसून, गळ्यात मंगळसूत्रा बरोबर सुंदर डायमंड नेकलेस आणि सेट मधलेच कानातले आणि बांगड्या . डोळ्यात काजळ आणि गुलाबी लिपस्टिक. केसांची नेहमी सारखीच कमरेवर झुलणारी लांब वेणी आणि त्यावर ताजा जुईचा सुगंधित गजरा, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, गोऱ्या रंगाची आणि मध्यम बांध्याची मेधा फार सुंदर दिसत होती. उतार वयातही तिच्या चेहऱ्यावर तेज कायम होता.


संध्याकाळी ठरल्या प्रमाणे अवि घरी आला. मेधाला बघतच राहिला.

फार सुंदर दिसतेस आज हे शब्द कानी पडताच गालातल्या गालात मेधा गोड हसली आणि त्याला पटकन आवरायला सांगितले.


अवि आणि मेधा खूप दिवसानंतर असे एकत्र बाहेर पडले होते. नेहमी मुले त्यांच्या बरोबर असायची, पण आज मुले नव्हती. अवि म्हणाला पार्टी मध्ये आपण थोडा वेळ थांबू आणि बाहेर जेवायला जाऊ. बरेच दिवस झाले आपण एकत्र बाहेर पडलोच नाही. ठीक आहे ..मेधा म्हणाली.


पार्टीत सहभागी झाल्यावर अविने मेधाची ओळख त्याच्या बॉस आणि इतर काही सहकर्मी ह्यांच्या बरोबर करून दिली. मेधा पहिल्यांदाच आवीच्या ऑफिस फंक्शन मध्ये सहभागी झाली होती. बॉसने अविच्या कामाची खूप प्रशंसा केली, आपल्या नवऱ्याची स्तुती एकून ती फार खुश झाली.


सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. सगळेजण आप आपल्या जागेवर बसून कार्यक्रमाचे आनंद घेत होते.


थोड्यावेळात अवि मेधाला म्हणाला मी वॉशरूमला जाऊन येतो.आर्धा तास झाला तरी अविचा काहीच पत्ता नव्हता. त्याचा फोन पण स्विचऑफ येत होता म्हणून मेधा त्याला शोधायला वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली.


तेवढ्यात तिला एका झाडा मागे अंधारात कोणाचा तरी आवाज ऐकु आला, तो आवाज अविचा होता असे तिला उगाच वाटले. म्हणून ती जरा बाजूला झाली तरी आवाज येतच होता.


आपण दुपारीच लंच मध्ये भेटलो होतो ना तरी पण तू पुन्हा का मला भेटायला बोलवलंस....


माझ्या बरोबर मेधा पण आहे, तुला सांगितले होते ना मी, तरी पण तू...


मला तुझ्या शिवाय करमत नाही, घटस्फोट दे ना तिला, असे किती दिवस आपण लपून भेटत राहणार ???


या गोष्टींवर आपण नंतर बोलू, मला आत्ता मेधा कडे गेले पाहिजे नाहीतर ती मला शोधत बसेल.


माझा फोन पण मी स्विचऑफ करून ठेवला आहे. आपण उद्या भेटुन या विषयावर सविस्तर बोलु. असे बोलून अवि तिथून बाहेर निघाला आणि समोर मेधाला बघताच त्याच्या पाया खालची जमीनच सरकली की काय असे वाटले त्याला.थोड्या वेळासाठी अंधारीच आली त्याच्या डोळ्यांपुढे.


समोर अविला बघून तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा अविच होता. मेधाने सर्व काही ऐकले होते. ती सुन्न उभी होती. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दोघांनाही काय करावे काहीच सुचत नव्हते. तेवढ्यात मेधाने गाडी काढली आणि घरी जायला निघाली.


अवि तिथेच खाली मान घालून उभा होता. वर बघण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. मेधा तिथून निघून गेली आहे, हेही त्याला कळले नाही...


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama