Archana Krishna Dagani

Others

3  

Archana Krishna Dagani

Others

नृत्यांगना

नृत्यांगना

9 mins
243


अगं काय ह्या चादरी आणि बँकेट्सचा पसार काढून बसली आहेस ??? आज मस्त नवऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी मला कंपनी द्यायची सोडून ही कसली कामं काढलि आहेत तू ???


अहो, आज तुमची सुट्टी आहे पण मला घरच्या कामां मधून सुट्टी नाही.. पावसाळा जवळ येत आहे, चादरी आणि बँकेट्स धुवून कडक उन्हात सुकवून ठेवायला लागतील. म्हणून धुवायला काढत आहे.


आज मुलं पिकनिकला गेली आहेत, आई पण महीला मंडळा बरोबर फिरायला गेली आहे, म्हटल बायको बरोबर आजचा दिवस घालविन, तुझ्या हातच्या टॉप डिशेसचा आस्वाद घेइन, तर तू हे काम काढून ठेवलंय सगळा मुड ऑफ केलास बघ मुग्धा....


राजीव, तुम्ही पण ना लगेच राग येतो तुम्हाला, अगदी लहान मुलांसारखे वागता कधी कधी....गेले चार दिवस पाणी आले नव्हते, आज भरपूर पाणी आहे म्हणून हे पेंडींग काम काढले हो, तुम्हाला छळयला नाही...हे बघा सकाळचे नऊ वाजलेत..तुमचा नाश्ता आणि चहा पण झाला आहे, लंच साठी बराच वेळ आहे..मी काय म्हणते, बाजारातून जरा भाजी आणून दया ना, लिस्ट देते, तुम्ही घरी येई पर्यंत माझे सगळे आवरून होईल.. मग तुमच्या आवडीचे पदार्थ बनवेन...


राजीवला मुग्धाचे बोलणे पटले, तसे ही घरात नुसते टीव्ही बघत बसला असता तर आळस आला असता, त्याच्या पेक्षा उन्हे वाढायच्या आत जरा फेर फटका मारून आलो तर पाय मोकळे होतील आणि फ्रेश वाटेल म्हणून त्याने कापडी पिशवी घेतली, लिस्ट आणि वॉलेट खिशात ठेवला आणि गाडी न घेताच पायी निघाला.


तो येई पर्यंत मुग्धा ने सगळे कपडे धुवून गच्ची वर वाळत सुद्धा टाकले आणि स्वंपाकाला लागली..


तसे ही आज घरी त्या दोघांशिवाय कोणीच नव्हते.. तिने पटकन कूकरला पुलाव फोडणीला टाकला आणि पनीर मसाला बनवायला सुरुवात केली...


तेव्हढ्यात राजीव भाजी घेऊन आला.. घरात सुटलेल्या पुलावचा घमघमाट, पनीर मसाल्याचा सुगंध, तो चकित झाला...


काय ग आवरलं का ??? आणि स्वंपाकाला सुद्धा लागलीस??? त्याने तिच्याकडे कौतुकाने बघत विचारले...


हो... होईलच जेवण तयार ..पोळ्या लाटत ती बोलली...सगळीकडे तुपाच्या पोळीचा सुगंध दरवळत होता.. आधीच बनवून फ्रिज मध्ये ठेवलेल्या कोथिंबीर वड्या थोड्या काढून त्याही तळून घेतल्या.


दोघे जेवायला बसले... खुप दिवसा नंतर ते असे एकत्र, निवांत जेवायला बसले होते.. प्रत्येक गोष्ट त्याच्या आवडीची होती... तो मनसोक्त जेवत होता, त्याला जेवण आवडलय, हे त्याचा चेहऱ्यावरची तृप्ती सांगत होती.. मुग्धाचे पोट तर त्याला जेवताना बघूनच भरले होते..


काय ग डेझर्ट नाही का ??? त्याने मस्करी करत विचारले...


आहे ना... तिने आमरसतल्या शेवयांची वाटी त्याच्या समोर ठेवली तसा तो अधिकच खुश झाला...मुग्धा तुला माझ्या मनातलं कसं काय कळतं ग ?? त्याला खुश बघून ती पण फार खुश झाली...


अहो, मला माहित होते की आज तुम्हाला सुट्टी आहे म्हणून काल संध्याकाळीच बरीच पूर्व तयारी करून ठेवली होती.. तो जेवून जरावेळ झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेला..तिने किचन आवरलं...घड्याळात पाहिले तर दुपारचे दोन वाजले होते. मुले परत यायला तीन तास होते.. मग तीही थोडावेळ आराम करण्यासाठी बेडरूम मध्ये गेली..


सकाळी फार लवकर उठली होती म्हणून अंग टाकताच क्षणी तिचा डोळा लागला.. तास भर झाला असेल.. तेव्हढ्यात मेघ गर्जना ऐकु येऊ लागली.. काळे ढग दाटून आले होते .. अवकाळी पाऊस पडण्याचे चेन्हे दिसू लागली..तिला गच्चीत वाळत घातलेले कपडे आठवले आणि ती धावतच वरती गेली. पटापट वाळत घातलेले कपडे काढले आणि बास्केट मध्ये ठेवले... तेव्हढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला...


पाऊसाचे पाणी अंगावर पडताच ती शहारली...काहीच वेळात ते आल्हाददायक वातावरण तिला आपल्या भूतकाळात घेऊन गेले जेव्हा ती एक गोल्ड मेडलिस्ट, ट्रेंड कथ्थक डान्सर होती.. तिने देशात आणि परदेशात खूप मोठे शोज केले होते... वयाच्या पाचव्या वर्षा पासून ती सराव करीत होती...गुरुजी स्वतः तिला शिकवायला घरी येत असत...तिचे नृत्याच्या प्रती प्रेम बघून आई वडिलांनी तिला कधी ही नृत्या पासून वंचित केले नाही.. तिला नेहमी प्रोत्साहन दिला...त्यांच्या प्रोत्साहना मुळेच तर ती एवढी मोठी नृत्यांगना झाली होती....पण लग्न झाले आणि तिची सर्व कला कोलमडून पडली होती....


ती  एकटीच पावसात भिजत होती..आपोआप तिचे पाय नृत्य करू लागले...एखादा मोर पावसात आपला पिसारा फुलवून आनंदात नचावा तसेच तिही कोणत्याही बंधनाला न जुमानता नाचत होती...तिची कला आज तिला साद घालीत होती...आणि तीही त्या कलेचा हात पकडुन बिंदास त्या पवसाचा आनंद घेत नृत्य करत होती....तिचे प्रत्येक हाव भाव, शरीराची हालचाल, चेहऱ्याचे एक्स्प्रेशन सर्व काही प्रोफेशनल ...आज दहा बारा वर्ष तिने स्वतः ला ह्या सुखा पासून वंचित ठेवले होते तरीही तिच्या नृत्यात तुस भर ही कमी नव्हती...


ना कसले संगीत ना कोणत्याही वादयाची ताल....आज ती पावसाच्या तालावर वर कोणाचीही परवा न करता स्वखुशीने नचत होती... एखादया नृत्यांगनाला शोभेल, कोणाच्याही मनाला लगेच मोहून टाकेल, असे नृत्य...


तेवढ्यात बेडरूम मध्ये राजीवला जाग आली..त्याला बेडरूम मध्ये मुग्धा दिसली नाही म्हणून त्याने एक दोन वेळा तिला हाक मारली...तरीही मुग्धाचा आवाज त्याला आला नाही....बाहेर धो धो पाऊस कोसळत होता...तो बेडरूम मधून बाहेर आला...घरभर मुग्धाला शोधू लागला पण मुग्धा घरात कुठेच नव्हती...त्याला गच्ची चे दार उघडे दिसले.. तसा तो वर गेला...


मुग्धा खुशीत नृत्य करीत होती....तिचे नृत्य बघून तो पण क्षणभर गोंधळून गेला...त्याने तिला असे नाचताना कधीच बघितले नव्हते, किंबहुना तो पहिल्यांदाच तिला नाचताना बघत होता...


नाचतात नाचता तिची आणि राजीवची नजरभेट झाली...आणि तिचे पाय जागीच थांबले.. पूर्ण भिजली होती ती... मुग्धा फार घाबरली...डोळ्यातून अश्रू वाहू लागले...आता राजीव आपल्याला ओरडेल ...सासू बाईंना कळले तर काय.?? त्यांची बोलणी ऐकावी लागतील...सासूबाईंना दिलेले वचन....

इतके दिवस आपण जी गोष्ट घरच्या लोकांपासून लपवून ठेवली ती आता उघडकीस येईल...ती खाली मान घालून तशीच उभी राहिली....


राजीवने मुग्धाला जवळ ओढले..तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू, पावसाचे पाणी ही लपवू शकले नव्हते. त्याने अलगद तिच्या चेहऱ्यावरचे पाणी टिपले.


खुप सुंदर नृत्य होते...तू मला कधीच सांगितले नाहीस की तू इतकी सुंदर नृत्य करतेस ते ???तुला नृत्याची आवड आहे... का लपवुन ठेवलेस माझ्या पासून???? राजीव ने तिला विश्वासात घेत प्रेमाने विचारले.


त्याच्या हळुवार आणि प्रेमाच्या स्पर्शाने ती बोलती झाली...


राजीव...मला लहानपणा पासून नृत्याची फार आवड होती म्हणून आई बाबांनी मला कधीही नृत्य करण्यापासून वंचित ठेवले नाही...मला गुरुजी पण खूप चांगले लाभले म्हणून मला

कथ्थक मध्ये गोल्ड मेडल मिळवता आला. पुढे माझे शो देशात आणि परदेशात होऊ लागले...एक नृत्यांगना म्हणून मी यशाच्या खूप मोठ्या शिखरावर जाऊन पोहचले होते....त्याच वेळी तुमचे स्थळ आले. माझे आजोबा आणि तुमचे वडील खूप मोठे वकील आणि घनिष्ठ मित्र होते...म्हणून तुमच्या स्थळाला नकार देता आला नाही...


आई ने तुमच्या आईला माझ्या नृत्याबदल सांगितले होते पण त्यांनी माझ्या कलेचा तिरस्कारच केला..तुमचे वडील हे खूप मोठे वकील होते, समाजात त्यांचे फार नाव होते... लोकांसमोर नाचणे....आमच्या घरात असले काहीही चालणार नाही, असे तुमच्या आईनेच माझ्या आईला स्पष्ट शब्दात सांगितले होते...म्हणून लग्नानंतर मला माझी कला पुढे जोपासता येणार नाही...आणि राजीवला ह्या बाबतीत काहीही सांगू नका असे त्यांनीच बजावले होते...


माझे आजोबा त्या वेळी आजारी होते...नातीचे लग्न आपण ठरवलेल्या घरीच व्हावे आणि हे लग्न आपल्या डोळ्यांनी पहावे ही त्यांची शेवटची इच्छा होती म्हणून आई बाबांचे ही काहीच चालले नाही..आणि मी ह्या लग्नाला तयार झाली...


राजीवच्या डोळ्यात पाणी होते...त्याच्या मनातला अपराध बोध त्याचे डोळे सांगत होते....


मुग्धा....अग एकदा तरी माझ्याशी ह्या विषयावर बोलायचे होतेस, आपण काहीतरी मार्ग काढला असता...एवढ्या वर्ष तू एकटीच मन मारत राहिलीस... त्रास सहन करत राहिलीस...


तू निश्चिंत हो आता...मी तुला असे मन मारून, कुढत जगू देणार नाही...मी बोलेन आई बरोबर...तू काळजी करू नकोस...


राजीव तुम्ही हे बोललात हेच खूप आहे माझ्या साठी..आई फार कडक आहेत... त्या तुम्हाला काहीच बोलणार नाहीत पण मला मात्र धारेवर धरतील...तुम्हाला त्यांचा स्वभाव चांगलाच माहित आहे..जुणी दुखणी डोके वर कढतील असे काहीतरीच वागू नका आणि काही बोलू ही नका...


अग पण....


ते काही नाही..तुम्हाला माझी शपथ आहे ..हा विषय आता इथेच संपवा...


चला खाली, मी कपडे बदलून आलेच.. मग मस्त गवती चहा बनवते... असे बोलून मुग्धा गोड हसली... हसताना तिच्या गालावर पडलेली खळी बघून त्याचा ही मुड बदलला...


काही वेळातच मुग्धा दोघांसाठी गरमागरम वाफाळलेला चहा घेऊन आली..ते दोघेही जरा विचारातच चहा संपवतात आणि तेव्हढ्यात दारावरची बेल वाजते..


मुलं सहली वरून घरी येतात ...अंश आणि प्रांश दोघांचा घरी येताच एकच गोंधळ सुरू होतो....काही तासांनंतर मुग्धाच्या सासू बाई सुध्दा घरी परततात....


राजीवच्या मनात विचारांचा गोंधळ सुरूच असतो...त्याला काहीही करून मुग्धाला तिचा छंद पुन्हा सुरू करण्यास मदत करायची असते..पण तिने दिलेली शपथ त्याला त्रास देत असते...काय करावे त्याला सुचत नाही...


मुग्धा नेहमी सारखीच सगळ्या गोष्टी विसरून आपल्या मुलांमध्ये रमली होती आणि काही वेळानंतर स्वयंपाकालाही लागते....


रात्री सगळे जेवायला बसतात....मुग्धच्या सासूबाई तिला उद्देशून म्हणतात "सून बाई एका महिन्या नंतर आमच्या महिला मंडळा तर्फे काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत....त्या कार्यक्रमातून जी काही रक्कम गोळा होईल ती सर्व आम्ही गरजू मुलींनी दान करणार आहोत...माझ्या मैत्रिणींच्या सूना काही ना काही कार्यक्रम सादर करणार आहेत....काही जणी गाणी म्हणणार आहेत, तर काही नाटक सादर करणार आहेत....तू पण एखादे नृत्य सादर करावे अशी माझी इच्छा आहे.... म्हणून तयारीला लाग....


त्या असे बोलताच राजीव आणि मुग्धा एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले...मुग्धा काही बोलेल तेवढ्यात छोटा प्रांश बोलला....अग आजी आईला कुठे नाचता येते???तिला फक्त पोळ्या लाटता येतात...स्वंपाक करता येतो...


हो ना ...एखादा पदार्थ बनवायला सांग तिला...हे काय सांगतेस???? म्हणे नृत्य ??? अंश मस्करीच्या स्वरात बोलला आणि दोन्ही मुलं हसू लागली...


सासूबाईंनी मुलांच्या पाठीत उगाच धपाटा दिल्यासारखे केले आणि झोपायला निघून गेल्या....


रात्री मुले झोपल्यावर मुग्धा आणि राजीव बाल्कनीत बोलत बसले होते...


अहो...आई का बरे अश्या बोलल्या असतील???मी सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करवे असे त्यांना का वाटले असेल??? लग्नाआधी त्यांनीच मनाई केली होती ना ..मग आता त्यांचे विचार कसे काय बदलले??? तुम्हाला काय वाटतय??? मुग्धा चे प्रश्न संपतच नव्हते...


अग हो....किती प्रश्न विचारशील एकाच वेळी??? तुझे म्हणणे बरोबर आहे ग...आई असे सहजा सहजी तिचे मत बदलणारी नाहीच??? मला पण काहीच समजत नाही ...काय चाललंय तिच्या मनात...


पण एक सांगू आई ने आता स्वतःहून परवानगी दिली आहे, तेव्हा ही संधी सोडू नकोस.. उदया पासून सराव करायला सुरुवात कर...माझी काही मदत लागलीच तर...बंदा हाजिर है... राजीव चे ते नाटकी बोलणे ऐकून तिला हसूच आले...


मुग्धाने सराव सुरू केला ... तिला सरावा साठी वेळ मिळवा म्हणून राजीव तिला बरीच मदत करीत होता...बघता बघता एक महिना संपला, कार्यक्रमाचा दिवस उगवला... मुग्धा खूप सुंदर तयार झाली होती... बऱ्याच वर्षानंतर तिने नृत्यासाठी मेकअप केला होता..दोन मुलांच्या जन्मा नंतर सुद्धा तिचा बांधा कामनीय होता..ती फार सुरेख दिसत होती...


राजीव बोलायच्या आधी अंश बोलून मोकळा झाला...आई फार सुरेख दिसतेस ग.... सासूबाई पण तिला बघतच राहिल्या...


स्टेज वर जातातच तिने आधी स्टेजला नमस्कार केला...आणि तिचे नृत्य सुरू झाले....फार शालीनतेने तिने आपली कला सादर केली...मंत्र मुग्ध होऊन सर्वजण तिलाच बघत होते..


मुग्धा चे नृत्य संपले आणि संपूर्ण हॉल मध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला.टाळ्यांच्या गजरातच तिने प्रेक्षकांना नमस्कार केला आणि बॅक स्टेज गेली...


तिथे तिच्या घरचे सगळे जण तिची आतुरतेने वाट पाहत होते .. सासूबाईंन बरोबर त्यांच्या तीन चार मैत्रिणी होत्या आणि कोणीतरी वयस्कर माणूस होता....राजीव आणि मुलं तर तिचे नृत्य पाहून भारावूनच गेले होते...ती पण फार खुश होती.


तेवढ्यात सासुबाईंची एक मैत्रीण बोलू लागली... सुरेखा...तुझी सूनबाई खूप मोठी कलाकार आहे....आम्हाला वाटायचे की आमच्याच सूना टॅलेन्टेड आहेत...तू तर तुझ्या घरात हिराच लपवून ठेवला होतास....कधीच बोलली नाहीस तुझ्या सूने बद्दल....


सासूबाई हसतच बोलल्या... हो ना...माझी सून आहेच गुणी...गोल्ड मेडलिस्ट आहे ती....लग्नाच्या आधी पासून एक अप्रतिम नृत्यांगना म्हणून देशात आणि परदेशात बरेच नाव होते तिचे....पण तिला संसारात जास्त रस म्हणून लग्न झाले आणि संसार सांभाळता सांभाळता स्वतःचा छंदच विसरली बघ...म्हणून मिच तिला पुन्हा आठवण करून दिली....आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले...


खरंच सुरेखा सासू असावी तर तुझ्या सारखी...किती नशीबवान आहेस तू मुग्धा....सासू बाईंची दूसरी मैत्रिण बोलली...


सासूचा फोलपणा मुग्धाच्या लक्षात आला होताच पण राजीवला ही कळाले...त्याची आई तिच्या अहांकारा पोटी हे सर्व करीत होती...त्यात आपुलकी किंवा कले साठी प्रेम वगैरे काहीच नव्हते तर समाजात आपली प्रतिष्ठा उंचावण्याचा तो एक खेळ होता....


मुग्धा आणि राजीवला त्यांची सर्व उत्तरे भेटली होती....म्हणून पुढे काहीही बोलण्याचे किंवा काही विचरण्याचा त्यांनी विचार मनातून काढून टाकला...


सुरेखा मॅडम ...मी काय म्हणतो जर मुग्धा ताईंनी आमच्या अनाथालयातल्या मुलींना नृत्य शिकवला तर....तेव्हढीच अनाथ मुलींची करमणूक होईल आणि मुली पण फावल्या वेळात कला शिकतील....


नक्कीच जोशी साहेब... मला पण फार आनंद होईल जर असे झाले तर...तुम्ही निश्चिंत व्हा ...

उदया पासून मुग्धा रोज येईल....


मुग्धा आणि राजीव खुश होते.... सासूच्या अहंकारामुळे का होईना शेवटी तिचा छंद, तिची कला तिला जोपासता येणार होता...


एक नृत्यांगना म्हणून मुग्धाला आता पुन्हा जगता येणार होते...


Rate this content
Log in