Archana Krishna Dagani

Drama

3  

Archana Krishna Dagani

Drama

सांसारिक बेडी

सांसारिक बेडी

2 mins
203


कोरोनाने बरे होऊन त्याला पंधरा-वीस दिवस झाले होते. अशक्तपणा आता ही होता..कधी कधी खोकला पण सुरू व्हायचा. खूप थकलेला दिसू लागला होता तो..पूर्वी सारखी तरतरी चेहऱ्यावर दिसत नव्हती. कामावर पुन्हा रुजू व्हायला त्याला अजून वेळ हवा होता, पण घरची परिस्थिती बेताचीच.


घरी म्हातारे आई वडील, त्यांना ही बीपी आणि डायबिटीस! म्हणजे दर महिन्याचा हॉस्पिटल आणि औषध गोळ्यांचा खर्च होताच. त्यात पाच वर्षा पूर्वी नवीन फ्लॅट विकत घेतला होता त्याने त्याचे हप्ते ही होतेच, शिवाय टू व्हीलर चे हप्ते, मुलांचे शिक्षण, वाणी, दूध वाला, भाजी असे बरेच किरकोळ खर्च.


कोरोनामुळे गेले वर्ष भर घरी होता तो. आता तर त्याची थोडी फार बचत पण संपत चालली होती. सुरवातीला ऑफिस मधून तीन-चार महिने पगार मिळाला होता पण नंतर तोही येणे बंद झाला होता. दोन महिन्या पूर्वी पासून ऑफिस वाल्यांनी पीक अप आणि ड्रॉप फॅसिलिटी सुरू केली होती म्हणून तरी त्याचे ऑफिस जाणे येणे सुरू झाले होते. पण ऑफिस सुरू झाले आणि त्याला कोरोना झाला.


महिनाभर उपचार घेऊन आता कुठे त्याला बरे वाटू लागले होते. पण घरी बसून चालणार नव्हते. घरी कमावणारा तो एकटाच आणि खणारी तोंड सहा, घर खर्च कसा चालवणार तो ?? कोणा कोणाचे पैसे थोपवून ठेवणार ?? कामाला गेल्या शिवाय पर्याय नव्हता त्याच्या कडे. आजारपणा मुळे घरातून पाय बाहेर निघत नव्हता, शरीर साथ देत नव्हते पण जाणे गरजेचे होते त्या शिवाय पगार हातात येणार नव्हता.


बायकोचा विरोध होता पण तिलाही माहित होते कामाला गेल्या शिवाय पर्याय नाही. ति पण त्याला मदत म्हणून कपडे शिवायची पण कोरोना मुळे सार्वजनिक समारंभ बंद झाले होते त्या मुळे तिची ही थोडीफार येणारी आवक बंद झाली होती. खानावळ सुरू करण्याची तिची मनशा होती पण घरात कोरोना पेशंट भेटल्यावर त्यांच्या घरातले अन्न कोण विकत घेणार होते.


शेवटी तो कामावर रुजू झाला. महिना भर कामावर गेला..बायकोला पगार आणून दिला आणि त्याची तब्येत बिघडली....हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण दोन दिवसातच त्याचा मृत्यू झाला होता.


ज्या संसारामधल्या जबाबदारीच्या बेड्यांनी त्याला बांधून ठेवले होते, ज्या संसारासाठी तो पुन्हा कामावर जाण्यास तयार झाला अश्या असंख्य बेड्यांमधून तो नेहमीसाठी मुक्त झाला होता. हवी हवीशी वाटणारी अवजड सांसारिक बेडी त्याने नकळतच तोडली होती. ज्या घराचे हप्ते तो फेडत होता मृत्यू नंतर त्या घराची पायरी बघणे ही नशिबी नव्हते त्याच्या..हॉस्पिटल मधूनच परस्पर स्मशानात नेण्यात आले होते त्याला...

धन्यवाद 🙏

अर्चना कृष्णा दगानी.

कथा आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. अश्या अनेक कथान साठी मला फॉलो करायला विसरू नका.धन्यवाद 🙏


अर्चना कृष्णा दगानी.

कथा आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. अश्या अनेक कथान साठी मला फॉलो करायला विसरू नका.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama