Archana Krishna Dagani

Others

4  

Archana Krishna Dagani

Others

मातृत्वाची वाट भाग -२

मातृत्वाची वाट भाग -२

4 mins
227


आईने जोरात तिच्या कानशिलात लगावली, त्या आवाजाने भाऊ आणि वडील सगळेच आपल्या खोलीतून बाहेर आले.

"काय झाले ?? कसला आवाज ऐकु आला??" स्नेहाचा भाऊ धावतच बाहेर येऊन विचारू लागला.

मला काय विचारतोस, स्नेहालाच विचार ! आई आत्ता पण रागातच होती.

काय झालं स्नेहा ??? का रडतेस बाळ ?? बाबांनी आईला शांत राहण्याचा इशारा करत स्नेहाला प्रश्न विचारला.

"अहों ती परवा पुण्याला चालली आहे गर्भपात करायला... "असे बोलून आईने डोळ्याला पदर लावला.

ऐकुण सर्वच जण स्तब्ध झाले.


बाबा म्हणाले " स्नेहा काय आहे हा सगळा प्रकार ??" जरा समजावशिल का आम्हा सर्वांना.

स्नेहा रडत होती. भावाने तिला सोफ्यावर बसवले. थोडे पाणी दिले. घोटभर पाणी पिऊन तिला जरा बरे वाटले. ती बोलू लागली...

आई मी लग्नानंतर लगेचच अमितला सांगितले होते, किमान दोन वर्ष तरी मला मुल नको म्हणून. तो ही तयार झाला.

पण दोन वर्षानंतर तो मुलासाठी मला सारखे विचारू लागला. सासू सासरे पण मला "आत्ता पुरे झाले कुटुंब नियोजन, लग्नाला तीन वर्ष होत आली, बाळ हवं आहे" असे बोलू लागले. पण मलाच नको आहे मुल.


गेले तीन वर्ष मी गर्भनिरोधक गोळ्या घेत आहे, पण ह्या वेळेला माझे गणित चुकले आणि मी तीन महिण्याची गरोदर राहिले. मी कोणालाच सांगितले नाही मी गरोदर आहे म्हणून, अमितला पण नाही. मला हे मुल नको आहे.

हे सर्व ऐकून आईला गरगरल्या सारखे झाले. काय बोलावे ह्या मुलीला, कुठून दुर्बुद्धी सुचली हिला.आई मनातच बोलली.

अग पण का नको आहे मुल ??? हे कळेल का आम्हाला, बाबा बोलले.

ज्यांना मुल होत नाही त्या देवाकडे मुलासाठी प्रार्थना करतात आणि देवाने तुझ्या झोळीत हे सुख दीले तर तू त्याला मारायला निघालीस. कशा साठी स्नेहा ..?? आई बोलता बोलता रडू लागली.

मला भीती वाटते गर्भधारणेची. मी वाचलय, पाहिलंय किती त्रास होतो स्त्रीला. माझ्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मला खूप भीती वाटते. मला नाही व्हायचं आई...

आई स्वतःचे डोळे पुसत, हळुवार तीला समजावू लागली. अग वेडी की खुळी तू ?? मी पण जर असा विचार केला असता तर तू ,दादा तुम्हा दोघानना ह्या सुंदर जगाचा अनुभव घेता आला असता का??


अग तू आई होणार आहेस, आई होणे हे जगातले सर्वोच्च सुख, जे फक्त आपण एक स्त्री म्हणून अनुभवू शकतो. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण आपल्या शरीरात एक जीव वाढवू शकतो, गर्भातच त्याच्यावर हवे तसे संस्कार घडवू शकतो. एका मासाच्या गोळ्याला जीवन दान देऊ शकतो. तुला ही संधी मिळाली आहे आणि तू म्हणते मला भीती वाटते. माझी मुलगी अशी पळपुटी असेल असे वाटले नव्हते मला. तुझ्या सारखाच जर सगळ्यांनी विचार केला तर मानव जातच संपून जाईल.आणि तू काही एकटी नाहीस आम्ही सर्व आहोत तुझ्या बरोबर. काही काळजी करू नकोस.

आईचे बोलणे ऐकून स्नेहाला जरा धीर आला.


बाबा बोलू लागले, अग पोरी तू एवढी हुशार आणि हे काय वेड्यांन सारखे काहीतरीच डोक्यात भरून ठेवलेस ?? अग एवढा मोठा निर्णय घेण्या आधी कमीतकमी आमच्याशी एकदा बोलायचे तरी होतेस. निदान आईला तरी कल्पना द्यायची. तू तुझ्या नवऱ्याचा, त्याच्या आई वडलांचा, त्यांच्या मनाचा जरा तरी विचार केलास का ??

वातावरण खूप टेन्स झालेले बघून भावाने हसतच तिच्या डोक्यावर टपली मारत, "स्नेहा तू फार स्ट्रोंग आहेस, काहीच काळजी करू नकोस सगळे ठीक होईल" म्हणून तिला धीर दिला.


मी आत्ताच अमितला ही गोड बातमी देतो, खूप खुश होईल तो असे बोलून फोन कडे वळका तेवढ्यात आईने त्याला थांबविले.

अरे तिचा काय निर्णय आहे, तिला आधी स्पष्ट तर करू दे, आणि अमित उद्या सकाळी येणार आहेत तेव्हा प्रतेक्ष्यात त्यांना काय ते सांगू. तुम्ही जा झोपा आता. आईने फर्मान सोडले.


तसे भाऊ आणि बाबा दोघेही त्यांच्या खोलीत निघून गेले.

आई आणि स्नेहा आपल्या खोलीत गेल्या. आईने स्नेहाला विचारले काय आहे तुझा निर्णय ???

स्नेहाच्या मनात कुठेतरी शंका होतीच. आईच्या मांडीवर डोके ठेवून ती बोलू लागली "जमेल ना मला ??? बाळ झाल्यावर त्याचे पालन पोषण करता येईल ना मला व्यवस्थित ??


आई तिच्या केसांत हात फिरून हसू लागली. का नाही जमणार ?? बाप्पा आहे ना, तो सर्व काही करवून घेईल तुझ्याकडून. अगदी निश्चिंत हो. आम्ही सर्वजण आहोतच तुझ्या पाठीशी. तुला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. मी तुला सगळे नीट समजावून सांगेन. तू आई होणार आहेस, दोन जीवांची आहेस म्हणुन आत्ता फक्त चांगला आहार आणि चांगले विचार. आपण उद्याच स्त्रीरोगतज्ञाकडे जाऊ. आणि हो तुझी ती पुण्याची अपॉइंटमेंट कॅन्सल करायला विसरू नकोस, आणि दोघी हसू लागल्या.


दुसऱ्या दिवशी अमितला ही गोड बातमी कळताच तो फार खुश झाला. तिकडे सासू सासरे पण खूप खुश झाले. सर्वजण इतके खुश होतील वाटले नव्हते स्नेहाला. आईने आपल्याला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवले म्हणून आपण आई होणार असा विचार करताच तिला खऱ्या अर्थाने आनंद झाला.आपल्या गर्भात एक जीव अंकुरित होत आहे, अमित आणि माझे प्रेमाचे प्रतीक, या विचारानेच ती शहारली. आई ने तिच्या चेहऱ्यावरची खुशी टिपली होती.


तिकडे दोन महिन्या नंतर नेहाला मुलगा झाला होता. स्नेहा आत्या झाली होती.


आई, सासू, नेहा सर्व तिला पावलोपावली मार्गदर्शन करीत होते. घरी अमित पण तिला वेळच्यावेळी औषधे देणे, गरोदर पणातली योगासने, प्राणायाम तिच्याकडून करवून घेणे, योग्य आहार घेणे असल्या बऱ्याच गोष्टी तिच्या कडून करूवून घेत होता. तिला आठवणीने वॉकला नेत होता. सासूबाई पण तिचे डोहाळे पूर्ण करीत होत्या. शेवटी स्नेहाने नऊ महिन्यानंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला, न घाबरता! पूर्ण गरोदरपणाच्या प्रवासात आई ने तिला प्रसव पिडे साठी तयार केले होते.


कापसासारखे बाळाचे शरीर हातात घेताच आनंदअश्रू तिच्या गालवर ओघळू लागले. ह्याच बाळाचे जीव घ्यायला निघाली होती ती, पण आईने तिला मातृत्वाची वाट दाखवली होती, जी कठीण तर होती पण अशक्य नव्हती.


धन्यवाद . कथा आवडली तर नक्की शेअर, लाईक आणि कमेंट करा.


Rate this content
Log in