Archana Dagani

Drama

3  

Archana Dagani

Drama

घटस्फोट भाग -२

घटस्फोट भाग -२

3 mins
219


मेधाने गाडी काढली आणि घरी जायला निघाली. अवि तिथेच खाली मान घालून उभा होता. वर बघण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. मेधा तिथून निघून गेली आहे, हेही त्याला कळले नाही. मेधा संपूर्ण रस्ताभर रडत रडत गाडी चालवत होती. तीने कशी तरी गाडी घरापर्यंत आणली. आई बाबा त्यांच्या खोलीत झोपले होते. शालू ताई पण झोपल्या होत्या. घरी येऊन तिने थंड पाण्याने तोंड धुतले कपडे बदलले आणि मुलांच्या खोलीत गेली.झोपलेल्या मुलानंबरोबर सहजच पडली. झोप काही लागत नव्हती. तेवढ्यात सायलीला जाग आली, अग आई तू आमच्या खोलीत ????

सहजच ग...


आणि सायली कुस बदलून पुन्हा झोपली.मेधाला झोप काही केल्या लागत नव्हती. तिकडे जेव्हा आविने वर पाहिले, त्याला समोर मेधा दिसली नाही. त्याने ऑफिसच्या बाहेर पार्किंग एरिया मध्ये जाऊन पाहिले गाडी जागेवर नव्हती. मेधाला फोन लावला पण फोन स्विच ऑफ. गडबडीत तो टॅक्सीत बसला आणि घरी आला, दारात गाडी बघून तो समजला की मेधा घरी आली आहे. सर्वजण झोपले आहेत असे त्याला वाटले. स्वतःकडच्या चावीने दार उघडून तो आत गेला. बऱ्याच वेळा असे होत असे, तो ऑफिस मधून उशिरा घरी परत येई, मग स्वतःकडच्या चावीने दार उघडे. बेडरूम मध्ये मेधा नव्हती पण तिने नेसलेली साडी जवळच्याच खुर्चीत त्याला दिसली. तो मुलांच्या रूमच्या दिशेने गेला, मुलांच्या बेडरूमचे दार आतून बंद होते. त्याला खात्री पटली, मेधा मुलांच्या खोलीत होती...


तो पण मग फ्रेश झाला पण बेडरूम मध्ये त्याला कोंडल्या सारखे वाटू लागले, जीव गुदमरायला लागला म्हणून तो गच्ची वर मोकळ्या हवेत गेला.

झोक्यावर बसून विचार करू लागला. आपल्या हातून फार मोठी चूक झाली आहे. गेले सहा महिने मी मेधाला धोका देत आलो, पण तिने कधीच माझ्यावर अविश्वास दाखवला नाही. गेले सहा महिने तिला खोटे सांगितले की मी टूरला जात आहे. माझ्या अनुपस्थित तिने घर, मुले, आई बाबा सर्वांना छान सांभाळले. कधीच माझ्याकडे तक्रार केली नाही. तीने माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला, आणि मी तिचा विश्वासघात केला. वाईट काळत तिने माझी साथ दिली आणि मी तिच्या प्रेमाला दगा दिला.


मेधा अत्यंत हुशार, गुणी, कर्तव्यदक्ष, प्रेमळ आई, पत्नी आणि सून आहे. मीच फार स्वार्थी आहे, मी मेधाचा तर विचार कधी केलाच नाही पण मुलांचाही विचार केला नाही. सुखी संसारात मी माझ्या हाताने स्पोट केला. त्याने मनातच निर्णय घेतला, मी उद्याच नलिनीला सोडून देईन, बॉसला सांगून तिची बदली कुठेतरी लांब करून टाकेन. तिच्या पासून पिच्छा सोडवायला हवा, नाही ऐकली तर मागेल तेवढे पैसे देऊ, पण आता हे थांबवायला हवे.

उद्या सकाळी सर्वान समोर मी केलेल्या चुकीची मेधाचे पाय धरुन माफी मागेन आणि सर्व पूर्वीसारखेच करून टाकेन. असा विचार करतच तो गच्ची वरून खाली बेडरूम मध्ये आला आणि पहाटे कधीतरी त्याला झोपी लागली.


मेधा रात्रभर जागीच होती.तिने तिच्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकलेल्या गोष्टी खऱ्या होत्या की खोट्या तिला कळत नव्हते. अवीने हे असले नाते नको होते जोडायला. मी त्याच्या शिवाय कधीच कोणाचा विचार सुद्धा केला नाही आणि तो लग्नाची सप्तपदी, आणाभाका, मुले, आई बाबा, मी ,आम्हा सर्वांना विसरला एका दुसऱ्या बाई साठी. तिचा विश्र्वासच बसत नव्हता.कुठे कमी पडलो आपण? काहीच कळत नव्हते.

पण एक मात्र नक्की होते, ती अवीला माफ करणार नव्हती.


तिचे डोके भनभनायला लागले होते. तीने झोपेची गोळी घेतली, तेव्हा कुठे जाऊन तिला सकाळी सहा वाजता झोप लागली. पण दुसऱ्या दिवशी कसा सामना करणार होते ते एकमेकांचा ??? मुलांना कळले असते तर काय आदर केला असता त्यांनी त्यांच्या बाबाचा? आणि आई बाबंपासून कसे लपविणार होते ते, हा सगळा प्रकार?

प्रश्न खूप होते पण उत्तर सापडत नव्हते.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama