रोजगार
रोजगार
एक सहा सदस्यीय कुटुंब होते. कुटुंबाचा प्रमुख प्रथम लहान गांवात राहत होता. तो त्या काळत मँट्रिक शिकला होता. तो देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीचा काळ होता. वडलोपार्जित जमीन वाहुन आपले व कुटुंबाचे भ्ररण-पोषण करित होता. देश-भक्ति रक्तात कुटुन- कुटुन भरली असल्यामुळे ईंग्रज सरकारची गुलामी करण्याचे नाकारले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेत होते. कॉग्रेसच्या स्वराज्य स्वातंत्र आंदोलनात सकिय असल्यामुळे ते नेहमी आपल्या भागात होणा-या कॉग्रेसच्या अधिवेशनात भाग वैगरे घेत होते. जेव्हा- जेव्हा कॉग्रेसचा दमदार नेता विदर्भात येत असे, तेव्हा हमखास त्यांच्या रैली मध्ये जात असे. आदिकाळा पासुनच या देशात शेती हा व्यवसाय निसर्गावर आश्रित होता. त्यामुळे बहुतेक कुटुबांची आर्थिक परिस्थिति हमखास ढासळ्त जात होती. आलीया भोगाशी असावे सादर. ह्याच कारणा मुळे शेवटी मुलांच्या शिक्षनासाठी आणी आर्थिक स्थिरतेसाठी गांव सोडुन छोट्या शहरात त्यांना जावे लागले होते. शिक्षण असल्यामुळे लगेच सरकारी नौकरी मिळाली होती. सरकारी नौकरी मुळे स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष भाग घेता येत नव्हता. त्याची खंत सारखी जानवत होती. सर्व काही व्यवस्थित चालु होते. मोडिन पण झुकणार नाही.पण आपल्या सिंध्दाता मुळे कधी-कधी उच्य अधिका-या सोबत मतभेद व्हायचे. हे मतभेद वाढतच गेले होते. नेमेचि येतो मग पावसाळा येते. शेवटी त्या नौकरीचा राजिनाम देवुन मोकळे झाले होते. देव देते पण कर्म नेते. जर कदाचित त्याच नौकरित जमुन बसले असते व आपल्या सिंध्दांताला थोडि शिथिलता दिली असती. तर तो व्यक्ति स्वतंत्र भारतात बाकि अन्य कारकुना सारख कमीत-कमी उप-जिल्हाधिशच्या पदावर निश्चितच सेवा निवृत झाला असता आणी सरकारी पेनश्न व मिळणा-या नगदी मुळे आपले व परिवाराचे जीवन सुखमय करु शकला असता !.
परिवाराचा निर्वाह करण्यासाठी शेवटी प्राईवेट बैंक मध्ये नौकरी करुन कसे तरी मुलांना शिकवित होता. पदरी पडले आणी पवित्र झाले. स्वतंत्रता नंतर भारतीय बैंकांचे राष्ट्रिकरण झाले होते. त्यात सर्व बैंका सरकारी उपक्रम मध्य मोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे नंतरच्या काळात आर्थिक परिस्थिति थोडी सुदृढ झाली होती. एक तिळ रगडणार किती अन तेल देईन किती ?. पण वाढ्त्या पारिवारिक जवाबदारी मुळे फार काळ आर्थिक सुदृढता टिकू शकली नाही. शेवटी मोठा मुलाचे पण लग्न झाले आणी त्याच्यावर पण परिवारची जवाबदारी वाढ्तच चालली होती. सेवानिवृति मुळे घरात येनारी आवक बंद झाली होती. त्यामुळे संपूर्ण भार हा मोठ्या मुलावर पडत होता. त्या काळ्यात बैंकेत पेनशन मिळत नव्हती. थोडे फार पैसे जे मिळाले होते, त्या मध्ये भविष्याची आर्थिक सोय आणी मुला-मुलींचे अपूर्ण शिक्षण व लहान मुलिचे लग्न करायचे होते. अशा बिकट परिस्थितित ते आपाल्या अन्य मुलांना फारशे चांगले शिक्षण देवु शकले नाही. दुष्काळात तेरावा महिना. आर्थीक परिस्थिति सारखी ढासळत चालली होती. त्यामुळे घरात चांगलेच तंगीचे व व्देषचे वातावरण निर्माण झाले होते. अशा कठिन परिस्थितित मोठ्या मुलाची बदली झाली होती.त्यामुळे तो इच्छा असतांनाही काही विशेष मदत करु शक्त नव्हता.
जेव्हा एक दरवाजा बंद होतो,तेव्हाच दुसरा दरवाजा पण उघडत असतो. त्याच काळात त्यांच्या एका मुलाला भयंकर आजार झाला होता. तो जवळ- जवळ पंद्रा दिवस मेडिकलला भरती होता. पण मध्यंतरी त्याची एका दुर-दराजच्या गांवी हायस्कूल वर नियुक्ती झाली होती. आदेशानुसार त्याला आठ दिवसाच्या आत कामा वर रुजु व्हायचे होते. अशी आर्डर मिळाल्या नंतर त्यांच्या मुलाने पूर्ण उपचार न घेता स्वतः डॉकटरांना विनंती करुन डिसचार्ज करुन घेतले होते. डॉकटरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. फार धावपळ करण्यास मनाई केली होती. परिस्थिति बघता आणी समोरच भविष्य उज्वल करण्यासाठी त्या मुलाने नौकरी वर जान्याचे ठरविले होते.वडिलांना सर्व परिस्थितिची जानीव असल्यामुळे त्यांनी त्याच्या निर्नयाचा विरोध किंवा समर्थन पण केले नव्हते.
शिक्षकाची जी नौकरी मिळाली होती ती एका खेड्याच्या शाळेत होती. आनी भर पावसाळा चालु होता. अशा कठिन परिस्थितित आजार पणात जायचे म्हनजे एक मोठी जोखिम होती. दैव नेहमी शुर-विरांची मदत करते !. शेवटी ही जोखिम परिवाराने स्वीकारली. आणी नौकरीवर रुजु व्हायचे असा निर्नय झाला होता.
ठरल्याप्रमाणे त्याच्या मदतीला त्याचा लहन भाउ सोबत होता. परिस्थिति वर मात देत, ते दोघे ही गांवात पोहचले. आम्हाला अशा कठिन परिस्थितित आलेले पाहुन मुख्याध्यापक व अन्य स्टॉफ पण चकित झाला होता. नंतर गांववाल्यांनी आणी स्टॉफने चांगली मदत केली होती. सर्व काही ठिक वाटल्या नंतर त्याने आपल्या लहान भावाला ,कॉलेज पडत असल्यामुळे वापस जाण्यास सांगितले होते. छोटा भाउ सांयस कॉलेजला शिकत होता. त्याला वापस पाठवणे गरजेचे वाटले होते. पण त्या अवधी मध्ये भरपुर जोरदार पाउस पडल्याने सर्व बाजुंनी गांवाला पुराने वेडा घातला होत. गांव एक बेट झाले होते. आता पाउस जरी कमी झाला होता. तरी नाला पार करुन मुख्य रस्ता वर जाने अवघड्च होते. शेवटी गांवात दोन विशेषज्ञ तैराक होते. त्यांनी धाकट्या भावाला नाला पार करु देन्याचे आश्वासन दिले होते. त्याने शेवटी विचार केला कि पुन्हा जर पावसाने झोडपले तर मग जाने अजुन अवघड होईल. पावसाने भिजलेली व नव-याने झोडपली तर मग सांगार कुणाला ?. शेवटी दोघाही भावांनी निर्णय केला की जायचे.शेवटी ते दोघे व ते दोन तैराक सकाळी नाला काठी पोहचले होते. छोट्या भावाने हा पराक्रम करण्यासाठी शिव धनुष्य पेललेले होते. विशेषज्ञ तैराकंनी धाकट्याला आपल्या पध्द्तीने नाल्याच्या दुस-या काठावर तुडुंव भरलेल्या नाल्यातुन सुखरुप दुस-या काठावर घेवुन गेले होते. धाकट्याला पलिकडच्या काठावर सुखरुप बघुन मोठा भाऊ सुखावला व आनंदी चेहराने त्याला हात हालवुन निरोप दिला होता. तो निघालो व थोड्या- थोड्या वेळने मागे बघत होतो. लहान भाऊ नजरे आड होई पर्यंत सारखे भाऊ हात हालवत होते.
आजही नौकरी व रोजगारीची समस्या प्रत्येक परिवारात तशिच आहे. फ्क्त परिस्थिति बदली आहे. दळनवळणाचे साधन आणी गांवा पर्यंत रस्ते व नालावर बरेच ठिकानी पुल बनले आहेत. मदतीसाठी कठिन परिस्थितित सरकारी यंत्रना उपलब्ध असते. व संपर्का साठी मोबाईल व फोन उपलब्द आहेत. या प्रसंगा वरुन रोजगाराचे महत्व तेव्हा आणी आता कोराना महामारिच्या काळ्यात जे दिसले आहे, त्यावरुन कल्पना करता येईल !.
