रोहिणीचे उखाणे
रोहिणीचे उखाणे


१)*** पहिल्यांदा नाव घेताना ***
प्रेमाच्या दिव्यात प्रीतीची वात,.... चे नाव घ्यायला करते आतापासून सुरुवात...
२)*** सप्तपदी नंतर ***
मंगळसूत्राच्या दोन वाट्या,एक सासर,एक माहेर,.... नीं केला मला सौभाग्याचा आहेर...
३)*** जेवताना घास भरवताना ***
देवघरात दरवळतो अगरबत्तीचा सुवास,....ना भरवते पहिला घास...
४)*** माप ओलांडताना ***
१)देवाची तीन रूपे,ब्रह्मा विष्णू महेश,....चे नाव घेऊन करते ग
ृहप्रवेश...
२)शुभमंगलप्रसंगी अक्षदा पडल्या माथी,....झाले माझे जीवनसाथी...
४)*** माप ओलांडून आत आल्यावर खेळ खेळून झाल्यावर ***
माप ओलांडताच मनाला लागली सुखाची चाहूल,...चे नाव घेऊन टाकले घरात आज पहिले पाऊल...
*** दुसऱ्या दिवशी हळद खिसक्याला ***
५)माझ्या सुख दुःखात साथ देतील पदोपदी माझे पती ...ची झाले मी सौभाग्यवती...
*** सत्यनारायण पूजेसाठी ***
तांब्याच्या ताम्हणात तांदळाची रास, ....चे नाव घेते तुमच्यासाठी खास....