सुनसान रस्ता
सुनसान रस्ता
ही घटना काल्पनिक असून त्याचा कोणत्याही वास्तू, ,व्यक्ती किंवा जागेशी संबंध नाही ...यातील पात्र आणि नावे ही काल्पनिक आहेत कोणत्याही व्यक्तीचा याचाशी काहीही एक सबंध नाही....
नुकतंच लग्न झालेली तीन जोडपी फिरायला जायचा विचार करत होते...'मनाली' ठरलं ही होतं पण शेवटी कोणत्या ना कोणत्या कारणाने 'मीनल-कुणाल,सारा-अभी' यांचं ऐनवेळी रद्द झालं...आणि मग राहिले कोण तर 'रिद्धी - सिद्धांत'...ते चौघे रद्द झाले म्हणून या दोघांना जाणं रद्द करायचं नव्हत... फार दूर नको जवळच कुठे तरी 5-7 दिवस जाऊन येऊ म्हणून त्यांनी कोकण निवडलं...कोकणात तशी फार स्थळ आहेत आणि गोवा ही जवळच आहे ...( खऱ्या गावाचं,ठिकाणचं,हॉटेलचं नि रस्त्याचं नाव इथे मी घेत नाही...)
31 डिसेंबर चा प्लॅन नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2019 रोजी अमलात आला आणि अखेर जायचा दिवस उजाडला.पहाटे लवकर उठून सगळं आवरून रिद्धी-सिद्धांत एक ड्राइवर बरोबर घेऊन प्रवासाला निघाले...टप्पा लांबचा होता एका दिवसात कव्हर होणार नव्हता म्हणून मधले 2,3 देव दर्शन घेऊन एका ठिकाणी पहिला मुक्काम केला ...दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हॉटेलवर पोहचले...तिथे पोहचायला दिवस मावळला होता त्यादिवशी कोठेही न जाता हॉटेलवरच मुक्काम केला...
दुसऱ्या दिवशी लवकर उठुन जवळचे चर्च,समुद्रकिनाऱ्यावरच्या राईड ,किल्ले असं पाहिलं,संध्याकाळी निवांत सनसेट चा आनंद घेतला...आणि उशिरा हॉटेलवर परतायला निघाले...15-20kg तरी अंतर असेल...येताना रात्र म्हणजे 10 वाजले असतील...तिकडची वाहतूक बहुधा 9 नंतर तूरळक होते.... रस्त्याने कोणीही दिसत नव्हतं...शांत आणि सुनसान तो रस्ता जास्तच भीतीदायक वाटत होता... नवीन जागा ,रस्ते असल्यामुळे ड्राइवर मॅप लावून चालला होता ...हॉटेलच्या
जवळ आलो 4,5 कि.मी. वर आलो अस तो दाखवत होता ...त्याच वेळी मॅप ने 1 टर्न घ्यायला लावला नि तो टर्न घेतला...
तो रस्ता फारसा असा डांबरीकरण नव्हता..खड्डे होते..त्यामुळे गाडी फास्ट घेता येत नव्हती.. 15-20 मिनिटे झाली तरी मॅप 4-5किलो मीटरच दाखवत होतं... एकही गाडी त्या रस्त्याने सोबत नव्हती ...टर्न घेऊन मागे जावं तर टर्न मारायला ही जागा भेटना... आपण चुकलोय असं वाटतं तर होत पण एवढ्या रात्री खाली उतरून आजूबाजूला पाहण्याची ही हिम्मत नव्हती...त्यात गाडीत 1 बाईमाणुस होतं... अशावेळी जास्त भीती असते...
या भीतीने आहे तिथूनच मागे पुढे करत कसा तरी रिटर्न टर्न घेतला...टर्न घेताना गाडी मागच्या काट्यांत ही जात होती पण पर्याय नव्हता ...गाडी पंक्चर होईल याची भीती होती ...सिद्धांत तसं ड्राइवर ला म्हंटला ही ,पण ड्रायव्हरला काय जाणवलं माहीत नाही ,त्यानं सिद्धांतच न ऐकता गाडी बाजूच्या काट्यांत घेतली आणि सर्रकन टर्न मारला...आणि हायवे ला येऊन पोहोचलो मग सुसाट गाडी हॉटेलवरच नेऊन थांबवली...तोपर्यंत मागच्या दोन्ही चाकांमधील हवा गेली होती ... हॉटेलवर तरी पोहचलो म्हणून कुठे जीवात जीव आला...सकाळ एक मेकॅनिक बोलवून पंक्चर काढून देईल असा हॉटेलचा मॅनेजर बोलला...म्हणून ती पण काळजी मिटली... भूक तर लागली होती पण आता ती पण हरवली होती...एक मनाशी ठरवलं...उद्यापासून कुठे ही गेलं तरी 7 पर्यँत हॉटेलवर यायचं, पॉईंट कमी पाहून झाले तरी चालतील पण 7 च्या आत घरात...
असे ट्रिपचे 7 दिवस संपले...7 तारखेला रिटर्न चा प्रवास नॉनस्टॉप करत घरी 10 वाजता पोहचलो...
टीप- तो चकवा नव्हता... रस्ता चुकला म्हणून मनातली धास्ती होती...पण त्या बाजूला चकवे आजही लागतात...