Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

RohiniNalage Pawar

Others


5.0  

RohiniNalage Pawar

Others


नवरा काय असतो

नवरा काय असतो

2 mins 553 2 mins 553

नवरा काय असतो हे मला आमच्या लग्नानंतर एक वर्षांनी पहिल्यांदा जेव्हा तो आज एक दिवस बरोबर नाहीये ना तेव्हा कळलं, आज रात्री तो घरी नाही हे कळताच आपोआप डोळ्यांत अश्रू दाटून येतात, आणि फोन चालू असताना धबधबा कोसळावा तसे कोसळू लागतात,समजत नाही नक्की काय होतंय पण तो एकटा दुसऱ्या ठिकाणी आहे आणि आपण घरी सगळ्यांसमवेत तरी देखील एकटं वाटू लागतं का ते माहीत नाही. 


आपली रूम त्याच्याशिवाय आपल्याला एकटीला खायला उठते.तो एक दिवस घरी नाही तर आपण किती बैचेन होतो ना, पण जेव्हा माहेरी जातो, सात आठ दिवस राहतो तेव्हा तो तेवढे दिवस एकटा घालवतो, त्यालाही एकटं वाटत असेल ना, पण म्हणतात ना पुरुषांना त्यांच्या भावना खरंच शब्दांत नाही मांडता येत हे खरं आहे. आपण रडून लगेच आपल्या भावना व्यक्त करतो पण त्यांना ते नाही जमतं, आपण माहेरी मात्र लगेच रमून जातो तेव्हा नाही आपल्याला त्याची कमी भासतं, मग सासरीच का तो नसताना कमी भासते.


खरंच आपण आपले राहत नाही, नकळत त्याचे होऊन गेलेलो हे तो एक दिवस घरी नसताना जाणवतं, आपल शरीर फक्त घरी असतं मन मात्र त्याच्यासोबतच असतं. दररोज लवकर निघून जाणारा दिवस आणि रात्र त्या दिवशी मात्र खूप मोठे वाटू लागतात. त्याच्या वर्षभराच्या आठवणी सर्रकन क्षणांत डोळ्यासमोर एका मागे एक येतात. त्याच्यासोबत केलेली भांडणे, आपल्यामुळे त्याला झालेलं दुःख आणि त्या रागात त्याने काहीतरी सोडून जायच्या केलेल्या गोष्टी ऐकताच आपण कोलमडताना त्याने सावरायला मारलेली ती मिठी... तो क्षण आणि त्या वेळी दोघांच्या मनात एकमेकांबद्दल वाढलेलं प्रेम याच्या भावना मीच काय कोणीच शब्दांत नाही मांडू शकतं.


आई बाबांनंतर जवळचं कोणी देवाने आपल्यासाठी बनवलं असेल तर ते नवरा आणि बायको हे का ते तेव्हा कळतं. आपल्या थोड्याशा दुःखाला ही तो आपल्याला किती सांभाळून घेतो ना, आणि त्याचं दुःख मूठभर असलं तरी आपल्याला चिमुटभरंच सांगतो आणि उरलेलं त्याच तोच पेलतो. तो कामात स्वतःला झोकून देतो का तर आपल्याला काही त्रास नाही व्हावा.आणि आपण म्हणतो की तो वेळच देत नाही त्याला कामे महत्वाची आहेत आपण नाही.पण तो कधीही त्याबद्दल काहीच बोलत नाही.देता येईल तसा वेळ तो काढतो आणि त्या वेळात आपल्या हवं नको ते सगळं देतो.


जसे वडील स्वतःसाठी काही करत नाहीत ना तसाच नवरा ही स्वतःसाठी काहीच करत नाही.जे काही करतो ते आपल्यासाठी नि कुटुंबासाठी करतो. त्याच्याशिवाय खरंच आयुष्याचा विचारच नाही करू शकत नाही राव. ज्यांचे जोडीदार (नवरा किंवा बायको) अचानक सोडून जातात ना त्यांचं दुःख किती मोठं असेल ना... हे आपल्यातला एक दिवसाचा दुरावा क्षणभर मनावर दाब आणतो.


एकच मागणं आहे देवाला,तू बनववेल्या या नात्यातील खऱ्या नात्याला कधीच दुःख आणि दुरावा देऊ नकोस.कुठेही असो ते नातं सुखरूप असावा...


Rate this content
Log in