RohiniNalage Pawar

Romance

5.0  

RohiniNalage Pawar

Romance

तो आणि ती

तो आणि ती

9 mins
1.2K


आज ते दोघे भेटले होतेे ,त्याची खुप इच्छा झालती तिला भेटायची म्हणून तिला तो भेटलाच...चार तास एकत्र घालवले.निघताना शेवटची कॉफी घेतली...त्या कॉफी शॉप पासून थोड़े दूर आल्यावर तिच्या लक्षात आल की ती तिचा मोबाईल कॉफी शॉप मध्येच विसरली... म्हणून तिने त्याचा मोबाइल घेऊन तिचा नम्बर डाईल करून कॉल लावला तर त्याच्या मोबाईल मध्ये तिचा नम्बर#माऊ नावाने सेव होता...तिने माघारी येऊन त्याला खुप क्यूटली विचारले.

ती:- तू माझा नम्बर असा या नावाने का सेव केला आहे...???

तो:-मला ते नाव तुझ्यासाठी खुप आवडल.

ती:-आणि मी...???

तो:-तुला तर तुझ्या नावा पेक्षाही खुप लाइक करतो...

ती:-कधी बोलला नाहीस...

तो:- हे काय आता बोलतोय...

ती:-मग प्रपोज़ कधी करतोयस

तो:-(काही वेळ)शांत,निशब्द...कसला???

ती:-(चिडून)जाऊ दे ,कसला नाही सोड

तो:-मस्करी केली गं..

ती:-(शांत )

तो-एक खर सांगू का???

ती:-काय

तो:-मला प्रेम नाही तर क्लियर अरेंज्ड मैरिड करायचय...

ती:-शांत...नो रिप्लाय and says बाय...(रागात)बोलू नकोस तू जा...आणि भेटायचे बहाने ही बनवू नकोस पुन्हा...

तो:-बरं बाय...(हसत...)


बाय म्हणून तिने त्याच्या कड़े पाठ फिरवली आणि चालू लागली...पुढे गेल्यावर तिने मागे वळून पाहिले तर तोही तिला जाताना दिसला...ति त्याच्या त्या पाठमोरया आकृतीकड़े पाहत तिथेच उभी राहिली...

नेहमीप्रमाणे तिला न काही समजवताच तो आजही तसाच निघून गेला या विचाराने ती झोपेतुन जागी झाली...डोळ्यांच्या पाणवलेल्या कड़ा पुसत तीने आवरायला सुरवात केली... त्याचा रात्री च तिला फ़ोन आलता की त्याला आज तिला भेटायच आहे...आज वर त्याच्या ओठी न आलेल आज तो बोलेल या वेड्या आशेने ती आवरून तयार झाली...पहाटेच स्वप्न खर होत या भोळया भाबडया विचाराने ती किंचीतशी मनोमन खुश ही होती...ठरलेल्या वेळेच्या आधी ती भेटायच्या ठिकाणी वाट पाहू लागली...ठरलेली वेळ ही आता तासा तासाने पुढे सरकत होती आज तरी तो त्याला स्वतःहुन भेटाव वाटल म्हणून लवकर येईल या आशेने ती आधीच तिथे येऊन थाम्बली होती पण आज ही तो नेहमी सारखा उशीर करणार हे तिने मनाला समजावले... ती तेथून निघनार तोच हा धावत तिथे आला ...

तो:- सॉरी आज पण उशीर झाला ...तुला आज पण खुप वाट पहावी लागली ना...

ती:-तुला भेटण्यासाठी तर मी आयुष्यभर ही वाट पाहिल..(मनाशी पुटपुटत)

तो:-काही म्हणाली का तू..??

ती:-(स्मित हास्य करत)नाही रे काही नाही...तू बोल का बोलावल आज मला तू चक्क स्वताहून भेटायला...

तो:-खास काही नाही ग...असच आज फ्री होतो म्हणून म्हटल भेटाव तुला...

ती:-हो का ...फ्री वेळेत चक्क तुला आज मला भेटावस वाटल...इतर वेळी फ्री असला तरी तू मला फक्त आज कंटाळा आलाय म्हणून टाळत असतो मग आज अस नेमक काय झाल...???

तिला आज त्याच्या तोंडाने तिच्या बद्दल वाटणार खास अस काही तरी ऐकायच होत म्हणून आज ती त्याच्या नजरेला नजर देऊन बोलत होती...

तिच्या डोळ्यातले ते भाव त्याला आज खुप खोलवर भासत होते...ते काहीतरी बोल म्हणतायत अस आज त्याला पहिल्यांदा तिच्या डोळ्यांत प्रकर्षाने दिसत होत...

ती काय बोलतेय याकडे त्याच लक्ष च नव्हतं...तिच्या त्या चेहऱ्यावर उमटलेले ते भाव तिच्या डोळ्यांत साठलेल ते स्वप्न आज त्याला त्याच्या समोर आतुरतेने वाट पाहतय अस भासत होत... ती बोलत च होती आणि तो तिच्यात बुडुून गेला होता...तिचे बोलणे सम्पले तरी तो तिच्या डोळ्यांत हरवून गेला होता तीची ही तशीच काहिशी अवस्था होती तेवढ़यात त्याचा फ़ोन वाजला आणि दोघे भानावर आले...त्याने फोन उचलला आणि बोलता बोलता च तिला खुप urgently काम आहे.पुन्हा भेठू अस सांगून घड़बडीत तो निघून गेला... त्या घड़बडित त्याने तिच्या साठी आणलेल चॉकलेट ही द्यायचा विसरून गेला पण आणलेल गिफ्ट मात्र त्याने आल्या आल्या तिच्या हाती सोपवल होत...

लव डिजाईन च्यां रैपर मध्ये असलेल ते गिफ्ट तिला अजून च भावूक करूंन गेल... ठीक आहे तोंडाने नाही तर गिफ्ट मधून त्याला काही तरी बोलायच असेल या आशेने तीने ते घरी जाऊंन उघडायचे ठरवले आणि ज्या उत्साहाने ती आली होती त्याच उत्साहाने ती घरी निघाली...

त्याच्याबद्दलच्या तिच्या अपेक्षा दिवसें दिवस वाढत च चालल्या होत्या... त्याने व्यक्त न केलेल्या त्या भावना त्याच असतील याच विश्वात तिचे विचार त्याच्याबद्दल अजूनच दृढ़ होत चालले होते...तो कसा का वागेना दरवेळी मनाची समजूत घालत ही त्याला माफ़ करायची...

तिच्या आणि त्यांच्यात झालेली ती आजची नजर भेट तो एव्हाना विसरला होता...ती ही तिची सगळी काम उरकून रात्री घरी आली... फ्रेश झाली आणि आई आज मला भूक नाहीये माझ जेवण बनवू नको सांगत ते गिफ्ट उघडू लागली...रैपर मध्ये रैपर...रैपर मध्ये रैपर यात तिची उत्सुकता अजून च वाढली होती...अखेर शेवटचा रैपर आला आणि तो रैपर ही तिन हळूवारपने काढ़ला... त्यातील बॉक्स छोटाच होता पण उघडण्यापूर्वी त्यात काय असेल या तिच्या भाबडया अंदाजेने तिला घेरल होत आणि तो अंदाज खरा असेल तर ???या धाकधुकीच्या विचारत तिचा चेहरा पूर्ण हर्षाने उजळला होता त्या क्षणी ती अजूनच मोहक दिसत होती...


तिने तो गिफ्ट चा बॉक्स उघडला...आकाशात जसे अचानक ढग जमा होऊन गर्दी करावीत आणि सूर्याच्या किरणांनी ही त्यात अचानक दिसेनास व्हाव तसे तिचे ते मोहक भाव तिच्या चेहऱ्यावरून नाहीसे होत होत.े डोक्यात विचार गर्दी करू लागले होते कारण त्या बॉक्स मध्ये सॉरी अस लिहिलेली एक चिट्ठी तिला मिळाली होती...आता हे सॉरी कशासाठी, का आणि त्याने आपल्याला अस अचानक का म्हणाव...ते पण मला कधीही न बोललेला शब्द...तो पण एवढ़या कुशलतेने...विचारांमध्ये बुडूंन रहावे की बागडावे तिला काही कळत नव्हते...त्याच क्षणी तिला त्याला फ़ोन करावा वाटला,तो घरी पोहचला ही असेल ...त्याच्याशी यावर शांत बोलता ही येईल म्हणून ती तो कॉल received करण्याची वाट पाहू लागली...अस करता करता 10-12 मिस्ड कॉल त्याला पडले होते...

तो जेव्हा फ्री झाला आणि मोबाईल पाहिला तेव्हा तिचे ते missed कॉल्स पाहून त्याला त्यांची सकाळ ची भेट ती नजरभेट आणि तिच्या आठवणीत त्याच्या चेहर्यावर आलेल ते हसू हे सगळ त्याला नवीन भासत होत..

तिच्याबद्दल त्याला ही आता खुप काही वाटायला लागल होत पण ते व्यक्त होता येत नव्हतं...याच धुंदित तो विसरला की ती तिकडे त्याच्या त्या एका सॉरी मुळे बैचेन झाली असेल म्हणून त्याने तिला return कॉल केला....

ती:बोल..आलास का घरी...

तो:हो...अग ते अचानक आलेल काम च आटोपत नव्हतं म्हणून मोबाईल कड़े लक्ष च देता नाही आल सॉरी...

त्याच्या त्या पुन्हा सॉरी च्या डंकाने ती ला काहीच समजेनास झाल...हा आज अस का वागतोयस...

न राहून तिने त्याला विचारल...हे सॉरी च काय लावलय तू...कळेल का मला...

तो-ह्म्म्म...ते व्होय ते असच...ह्यावेळी गिफ्ट मध्ये काय द्याव लवकर कळेना म्हणून सॉरी दिल...मला माहित नाही मी कधी चुकलो असेल नसेल चुकलो ...तुला नकळत कधी दुखावल असेल किंवा माझ्याबद्दल तुझ्या मनात काही चित्र विचित्र भरून दिल असेल त्या प्रत्येक गोष्टी साठी हे सॉरी समझ... तुला माझ्याकडून याची गरज नसेल ही हे मला माहित आहे कारण तू दरवेळी मला सहज माफ़ केल असशील...कारण मी एक ही चुक करणार नाही अस होऊच शकत नाही पण चुक झाली हे सांगून माफ़ी मागण्यापेक्षा चुक नसली तरी माफ़ी मागितली म्हणून काही बिघडत थोड़ी...हो ना...???

ती-तू काय बोलतोय हे दरवेळी तू दुर्लक्ष केल तरी मला समजून जायच रे... पण आज तू शांत, एकदम बिनधास्त, मन मोकळ पनाने बोलूंन ही मला आज तुझ सगळ बोलण समजण्यापलीकडे जातय रे...

तो:असच असत .

(त्याची ती छोटी स्माइल ही आज तिला तिच्या अपेक्षेपेक्षा खुप काही बोलत होती)

तिची अपेक्षा होती की त्याने त्याच्या मनातल प्रेम व्यक्त कराव...म्हणजे फक्त ते मैजिक वर्ड...पण त्याच आजच वागण सगळ तिच्या अपेक्षेपेक्षा वेगळ पण हव हवस अस वाटनार होत...

या सगळ्यात तिची त्याच्या कडून असलेली आजवर ची अपेक्षा ही कधीच गळून पडली होती...अपेक्षेत तिची जी चीड़ चीड़ व्हायची तीही आज कुठेतरी हरवली होती...

त्यांच्या बोलण्याने आज एक मस्त असा ट्रैक धरला होता...एकमेकांना न काही विचारता ही आज ते आपआपल्या गोष्टी एकमेकांना दिल खुलास सांगत होते...

खुप अस बोलण झाल्यावर...

ती-खुप रात्र झाली आहे आपण उदया यावर बोलू...पण

तो-पण काय???

ती- भेटून बोलू... जमेल का...??

तो-.ठीक आहे... नेहमीच उशिरा येणारा 'आरू' आज मात्र वेळेवर भेटण्याच्या ठिकाणी पोहचला होता,आणि कायम लवकर येणारी 'आशू' आज अजूनही आली नव्हती...खुप वेळ गेला ती आलीच नाही म्हणून तो वैतागुन तिथुन निघून गेला... ती आली नाही या चीड़ चीडी मध्ये त्याचा आजचा दिवस पूर्ण च बिघडला होता.. ऑफिस मधल्या कामात ही त्याचे आज लक्ष नव्हते,तरी सुट्टी होई पर्यन्त कसा तरी तिथेच रेंगाळत राहिला...संध्याकाळ झाली तो घरी जायला निघाला पण ऑफिस मधल्या फ्रेंड च्या पार्टी मुळे आज ही त्याला रूम वर जायला उशीर झाला होता...दिवसभर हरवलेला आरू पार्टीमुळे थोड़ा जागेवर आला होता...तो रूम वर पोहचला...त्याला त्याच्या रूम चे दार उघडेच दिसले...कोणी तरी आलय का?? कोण आल असेल बर!! या विचारात च त्याने घरात थोड़े दबकतच पाऊल ठेवले..इकडे तिकडे पाहू लागला त्याला कोणीच दिसेना,

तेव्हड्यात किचन मधून ती हातात पानी आणि कॉफी चा ट्रे घेऊन येताना त्याला दिसली...त्याला तो एक भास च वाटला,म्हणून त्याने दुर्लक्ष केले आणि फ्रेश व्ह्ययला निघून गेला ...

ती-आज ही उशीर केलास यायला,आज ही खुप काम होत का??

तो-नाही ती मित्राची पार्टी होती ना सो थोड़ा उशीर झाला... (थोड़ा पुटपुटला)

आणि आपण एकटाच बड़बड़तोय की काय??खरच इथे कोणी आहे का?? पहायला तो हॉल मध्ये आला...ती त्याला तिथेच उभी दिसली

(गुलाबी सिल्क साड़ीने तिला आज अगदी सुन्दरतेने परिपूर्ण बनवल होत...)

पुन्हा भास झाला की काय म्हणून... स्वतःला च विचारायला लागला...अरे !!ही का दिसतीये मला..???

ती-मी दिसतेय का तर मी खरच समोर आहे म्हणून ..

तो-(थोड़ा तिच्या जवळ येऊन )

तू खरच आलियेस??पण अशी अचानक आणि डायरेक्ट रूम वर,आपल सकाळी ठरलेल्या ठिकाणी भेटायच ठरल होत ना... मग तू का आली नाहीस मी किती वाट पहिली माहितीये का तुला...???तो बडबड़तच होता आणि ती फक्त त्याच्याकडे पाहत होती...तिची काळजी आणि ती आली नाही म्हणून त्याची ती बैचेनी सगळी ती आज जणू हक्काने अनुभवत होती...आणि तो मात्र वेडयासारखा बोलत च होता...बोलता बोलता तो ही गप झाला आणि तिच्यात हरवून गेला... तिचे ते एव्हढ़या जवळून प्रत्यक्षात पाहन्यात आलेले आजचे ते रूप त्याला वेड लावत होते...तिचे ते मोकळे केस खिड़कीतून येणाऱ्या मंद हवेवर हलकेसे झोके घेत होते...आणि काही हलकेसे तिच्या त्या बोलक्या डोळ्यांवर विरंगळले होते...तिचे ते केस बाजूला करायला तो नकळत अजूनच तिच्या जवळ गेला...त्याच्या त्या अलगदश्या स्पर्शाने ती शहारली होती...तीचे डोळे अलगद मिटूंन तो स्पर्श अनुभवत होते,त्याच्या आणि तिच्या त्या थरथरत्या गुलाबी ओठां मधील अंतर केव्हाच मिटले होतेे.

आजवर नकळत स्पर्श झाल्यावर एकमेकांना सॉरी बोलनारे ते दोघे आज मात्र एकमेकांच्या स्वाधीन आणि एकमेकांच्यात विलीन झाले होते..."हा चंद्र तुझ्यासाठी ही रात्र तुझ्यासाठी,रास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी"

या कानावर पडलेल्या ओळींनी त्याला हलकेसी जाग आली,त्याला वाटल तो अजूनही तिच्यात सानिध्यात आहे ,पण स्वप्न शेवटी स्वप्न असत ना...

    त्याचे स्वप्न आणि त्यांनी भेटायचा ठरवलेला दिवस सगळ कस जुळून आल होत, 'आरू'ला आज तिला भेटून सगळ काही सांगायच होत,ते दोघे भेटले ही पण आज त्याला ती दरवेळी भेटनारी 'आशू'वाटत नव्हती,आज तिच्या बोलण्यात त्याला बोलायला भाग पाडणार दरवेळीच प्रतिबिंब दिसत च नव्हतं,ती आजही खुप बोलत तर होती पण दरवेळी तिची जी त्याला खिळवून ठेवानारी नजर आज काही तरी बोल रे अस बोलताना त्याला भासत नव्हती.तो मनोमन गोंधळला होता ,की आजवर जे अनुभवत होतो ते माझेच भास होते की ,ती खरच तशी वागत होती,तो आल्यापासून शांतच आहे ती एकटीच बड़बडतेय म्हणून आशू ने आरू ला विचारल,

ती-हेल्लो,आरू काय रे,रात्री तर फ़ोन वर खुप बोलत होता ,अस नाही तस आणि बरच काही, मला वाटल समोर आल्यावर समजावशील सगळ,मग आज काय झालय,???गप्प का आहेस??

तो-रात्री काय बोललो आपण तेव्हा खास काहीच नाही ना, मग त्यात समजावयाच काय म्हणून तू अजून काय बोलतेयस हेच ऐकत होतो बाकि काही नाही...

आशू तर बदलली होती हे नक्की,म्हणजे बदल असा की त्याच्या कडून तिची आता अपेक्षा अशी काही नव्हतीच ,तो दोन दिवसा पासून जे वागत होता ते तिला हवे हवेसे वाटत होते बस बाकि त्याने व्यक्त व्ह्यवच अस तिची आता अपेक्षा नव्हती,कारण तो दोन दिवसात अनुभवलेला बदल च तिला त्या नात्याची कमी भासु देत नव्हता,शब्दाने बांधीलकी झाली नसली तरीही मनाने ते आता एकमेंकांशी जोडले गेले होते,हे तिला   

कळत होत, पण तो मात्र गोंधळात च होता,शेवटी त्याने ही स्वतःला मनोमन मनाला समजवल की,मी कुठेतरी चुकत असेल म्हणजे मीच तिच्याबद्दल तस वाटून घेतल असेल,असो ती आता जशी आहे तशीच तर हवी होती,मनमोकळी ,बिंदास्त,हक़्क़ाने सावरनारी,बोलनारी आणि बरच काही...त्याने या क्षणी त्या विषयी शांत राहनच ठरवल,शब्दाने बोलण्यापेक्षा आपण तिला हे अनुभवून देऊ अस त्याने ठरवल, आणि हलकेसे पण तिला हवे हवेसे वाटनारे त्याचे ते हसू त्याच्या चेहऱ्यावर क्षणभरात पसरले,दोघांच्या अव्यक्त भावना न बोलता ही दोघांनाही जणू समजल्या असाव्यात असे त्यांचे चेहरे बोलत होते,रात्रीच्या उरलेल्या गोष्टिंवर त्यांचे सविस्तर बोलणे झाले आणि आजची भेटही सम्पली,

     त्यानंतर अशा त्यांच्या अनेक भेटी झाल्या, पण शब्द अव्यक्त च होते पण भावना मात्र बोलक्या झाल्या होत्या,उदया व्यक्त होऊंन पुढे एकत्र येवो किंवा ना येवो, त्यांच नात मात्र मनाने एकत्र आलेल होत,आणि तशा प्रेमाच एक तरी नात आयुष्यात असाव अस म्हणणाऱ्या नात्याची कुठे उनीव ही त्यांना भासत नव्हती,त्यांच्या नात्याला नाव नव्हतं पण प्रत्येक नात्यात ते मात्र सजल होतं...

काही ओळी असाच काही नात्यांसाठी...


स्वप्ने त्यांची जी होती ती फार सुंदर होती,

स्वप्नात ते एकमेकांच्या साथ होती...

शेवटी मनातले मनाला कळले होते,

ते क्षण तर कायम आठवणीत राहतील असेच होते...


*तात्पर्य*-काही नात्यांना नाव नसतात, पण तरीही जन्मोजन्मीची बनून जातात...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance