RohiniNalage Pawar

Drama Horror Thriller

3.8  

RohiniNalage Pawar

Drama Horror Thriller

रेवाचा फ्लॅट

रेवाचा फ्लॅट

13 mins
900


(सदर नावे, घटना आणि स्थळ सगळं काल्पनिक असून त्याच्या कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काही संबंध नाही,आणि संबंध आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा)


भाग-१


रेवा जिथे राहत होती त्या रूममध्ये आता तिच्या बरोबर असणाऱ्या आणि तिच्या ओळखीच्या कोणी मैत्रिणी राहिल्या नव्हत्या,म्हणून तिने रूम सोडायचा विचार केला आणि नवीन ठिकाणी नवीन प्लॅट ओळखीच्या मैत्रिणी सोबत राहण्यासाठी शोधू लागली,खूप दिवस शोधल्या नंतर त्यांना एक प्लॅट मिळाला... 1BHK हवा तसा आणि मस्त होता...लगेच शिफ्ट करून सगळं व्यवस्थित झालं...नवीन building असल्यामुळे जास्त कोणी अजून तिथे राहायला आलेले नव्हते आणि रेवा ज्या फ्लोअर ला रहात होती त्या फ्लोअर ला अजून तरी ती सोडून कोणी शेजारी आसपासच्या प्लॅट मध्ये रहायला आलेलं नव्हतं...तिची मैत्रीण रिया ही काही दिवसांसाठी घरी जाणार होती,तशी रेवा धीट होती त्यामुळे ती एकटी रहायला तयार झाली होती,रिया दुसऱ्या दिवशी घरी गेली...आणि रेवा च दररोज च रुटिंग पुन्हा सुरू झालं,जॉब ला जाणं आणि आल्यावर जेवण बनवणं हेच काम तीच दररोज च असायचं...


त्या दिवशी ऑफिस मधून यायला लेट झाला होता म्हणून तिने जेवण पार्सल घ्यायचं ठरवलं,कायम बाहेर ती वडापाव आणि समोसा खाणारी, कधी जेवण भाजी चपाती पार्सल न घेतलेली रेवा आज भाजी चपाती पार्सल घेऊन प्लॅट वर आली,आल्यावर फ्रेश झाली जेवायला ताट करून घेणार तोच तिला आज काहीतरी वेगळं जाणवलं की आपण आज या फ्लोअर ला एकटे नाही आहोत,कोणीतरी नवीन आलेलं दिसतंय, कोणीतरी शेजारी आलंय म्हणून रेवा जेवणाचं ताट तसंच ठेऊन रूम च्या बाहेर आली आणि शेजारी कोण आलय पहायला शेजारच्या प्लॅट ची बेल वाजवू लागली...


तीनदा बेल वाजल्यावर करररर आवाज करत दरवाजा उघडला गेला,समोर दरवाजा उघडायला आलेलं तिला कोणीच दिसलं नाही...काही विचार मनात येतो ना येतो तोच आतल्या रूम मधून आवाज आला, आत ये मी आहे,आवाज एका स्त्रीचा होता म्हणून तिने न दबकता आत मध्ये पाऊल ठेवलं,आवाज ज्या बाजूने आला त्या बाजूला तिची नजर त्या आवाजाला शोधू लागली.पण तिला कोणी दिसेना,सगळीकडे नजर फिरून झाल्यावर कुठे आहात??असा आवाज देणार तोच तिच्या एक गोष्ट लक्षात आली की,हा प्लॅट आपल्या प्लॅट सारखा मुळीच नाहीये,बहुधा बिल्डिंग मधले सगळे प्लॅट एकाच Structure चे असतात मग हा असा वेगळा का आहे, 1BHK तर आहेचं पण याचा हॉल,किचन,बेडरूम सगळंच जणूं एक वाडा असल्यासारखं का भासतंय...आता मात्र एक ना अनेक शंका आणि विचार तिच्या मनात गर्दी करू लागले,अचानक एक हवेची झुळूक आली आणि तिच्या कानाशी काहीतरी हितगुंज करतीये अस तिला वाटू लागलं,सगळ्या दार खिडक्या बंद असताना वाऱ्याची झुळूक आलीच कुठून?? तिला दरदरून घाम फुटला, तशी तिने स्वतःची पाऊले दाराबाहेर जाण्यासाठी वळवली, आणि पळत तिच्या रूम मध्ये निघून गेली...

............................................


भाग-२

रूम मध्ये येऊन तिने रूम चा दरवाजा लॉक करून घेतला आणि जाऊन शांत सोफ्यावर बसली आणि भीतीने घट्ट डोळे बंद करून घेतले,तोच तिला बाथरूम मधून पाण्याचा नळ चालू असल्याचा आवाज आला,मी तर इथे आहे मग तिकडे कोण आहे,आणि तर व्यवस्थित नळ बंद केला होता मग चालू कसा झाला... ती उठली आणि घाबरत घाबरत एक एक पाऊल बाथरूम च्या दिशेने टाकू लागली तसा पाण्याचा आवाज वाढत होता,तिथे गेल्यावर आत डोकावणाऱ तोच लाईट गेली,आणि ती मोठयाने किंचाळली आता मात्र भीतीने माघारी फिरायचा तिच्यात त्राण नव्हता,तसा मागून आवाज आला शु...शुशु...तिने मागे वळून पाहिलं हातात मेणबती घेऊन रिया उभी होती,रियाला पाहून तिच्या जिवात जीव आला.

रिया - ये वेडाबाई किंचाळायला काय झालं,हा लाईट जायचा टाइम आहे माहीत नाही का??...5 मिनिटांत येती लाइट.

त्या दोघी हॉलमध्ये येऊन बसल्या आणि थोड्या वेळात लाईट आली...

रेवा - तू येणार आहेस कळवलं नाही,आणि पाण्याचा नळ असा चालू ठेवतात का???

रिया-हो नाही कळवलं अचानक ठरलं मग आले डायरेक्ट,आणि फ्लॅट ची चावी पण तुझ्या कडे होती म्हणलं तू येशिलच मी पोहचेपर्यंत म्हणून नाही कळवलं तुला...

आल्यावर पाहिलं तर दरवाजा उघडाच होता आवाज दिला पण तर तू नव्हतीच ,म्हंटल खाली गेली असशील दूध आणायला...आणि मी फ्रेश व्हायला गेले पण पाणी च आलेलं नव्हतं, म्हणून तसाच नळ चालू ठेवला पाणी आलेलं समजेल म्हणून...

रेवा-ठिके,बरं झालं आली लवकर,मला पण एकटीला करमत नव्हतं.

रिया-हम्म्म,तू कुठे गेली होतीस ग,आणि ते पण जेवलेलं हात असंच टेबल वर ठेऊन???

रेवा-जेवलेलं नाही ग ,वाढून घेतलेलं म्हण, मला अजून जेवायचं आहे.

रिया-इकडे ये,बरी आहेस ना,पाहू दे बरं मला...

रेवा-हो बरीच आहे की,का काय झालं??

रिया-अगं खरकट ताट टेबल वर आहे ग वेडू, आणि तू म्हणतेस भरलेलं...

रेवा-अगं खरंच, मी जेवण वाढून घेतलं होतं पण मला जाणवलं आपल्या शेजारी कोणीतरी रहायला आलंय म्हणून मी तसच ताट ठेऊन पहायला गेले होते...

रिया-आपल्या शेजारी फ्लॅट मध्ये रहायला आलेत??wow कोण आहे ग,फॅमिली आहे की,बॅचलर बॉयस,कोण आहे???(हसत...)

रेवा-माहीत नाही,मी गेलते पण कोणी दिसलंच नाही मग माघारी आले...

रिया-बरं ते जाऊ दे,इकडे ये हे बघ ताट रिकामं आहे कुठे काय आहे यात,काय बनवलं होत आज??

रेवा-बनवलं नाही ग ,पार्सल आणलं होती भाजी पोळी, पण मी खाल्ली च नाही मग ताटातलं गेलं कुठे..??

रिया-ते जाऊ दे,मी घरून डब्बा आणला आहे ,ते खाऊया...

जेवण होतं आणि दोघी झोपायला निघून जातात..मध्यरात्री घड्याळात तीन चे ठोके पडतात,आणि चौथी थाप रेवाला दरवाज्यावर पडलेली ऐकायला येते,

...............................

भाग-३


तिला वाटलं भास होतोय म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि झोपी गेली,थोडा वेळ शांततेत गेला आणि पुन्हा तिला दरवाज्यावर थाप पडलेली ऐकायला आली,आता मात्र एका मागे एक थाप त्या दरवाज्यावर पडत होती,एवढं होऊन ही रिया मात्र थोडी ही जागी झाली नाही याचं तिला आश्चर्य वाटलं,तिला उठवावं अस तिला वाटलं तिने तिला उठवायचा प्रयत्न ही केला,कोणीतरी दरवाजा वाजवतय हे ही सांगितलं तरी रिया काही उठेना...

रिया-अग कोठे कोण वाजवतय,मला ऐकायला यायना, तुला भास होतायत ,झोपून घे ग,तुझी झोप झाली नाही...


रेवा रिया च ऐकून घेतलं तोपर्यंत दरवाज्यावरच्या थापांचा आवाज बंद झाला होता,मलाच भास होतायत असं स्वतःला सांगून तिने पुन्हा झोपून घेतलं. सकाळी उठून सगळं काही आवरून त्या ऑफिस ला गेल्या,संध्याकाळी 8च्या सुमारास रेवा ऑफिस वरून आली...रिया तिच्या आधी रूम वर आलेली होती,रेवा फ्रेश झाली जेवण काय बनवायचं म्हणून ती रिया ला विचारत होती,पण रिया मात्र वेगळ्याच तंद्रीत होती,तिचं लक्ष रेवा काय बोलतेय याकडे नव्हतंच.


रेवा-अग ये रिया,मी काहीतरी विचारतेय,सांग ना लवकर,भूक लागलीये मला काहीतरी बनवुयात ना....तरीही रिया कुठंतरी एकटक पाहत होती,मात्र तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू होतं, पण ते हसू रेवाला कायम सारख वाटलं नाही,रेवा च बोलणं चालूच होत तेव्हड्यात रियाने एक कटाक्ष तिच्या कडे टाकला,आणि रेवा शांत च झाली,रियाचं ते रौद्र रूप तिने तिच्या नजरेत आज पहिल्यांदा पाहिलं होतं...


तेवढ्यात रेवा चा मोबाईल वाजला,आणि ती मोबाईल आणायला बेडरूम मध्ये गेली,पाहते तर रिया चा कॉल येत होता,आणि या आधी 5 missed call तिचेच पडून गेले होते,रिया विचार करत होती की ही हॉल मधून मला का फोन करतीये,तशीच ती मोबाईल घेऊन हॉल मध्ये आली आणि पाहते तर तिथे कोणीच नव्हतं, आणि रिया चा कॉल तर येत होता,तिने तो उचलला रिया ने लगेच सांगायला सुरुवात केली...


रिया-ऐक रेवा मला यायला आज उशीर होईल,तू जेवण तुझ्या पुरतीच बनव आणि जेवण करून घे,मी बाहेरून जेवण करून येतेय...आणि फोन कट झाला...रिया काही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हती,काय घडतंय,ते कोण होतं, की माझा भास होता??असे एक ना अनेक प्रश्न तिला पडले,शांत वातावरणात अचानक हवेचा वेग वाढला आणि खिडक्या धडाधड आपटायला लागल्या,त्या बंद तिने कशातरी बंद केल्या,किचनची खिडकी बंद करायला गेली तर समोरच्या प्लॅट मधलं किचनच्या खिडकीतून कोणीतरी तिच्याकडे पाहत उभं आहे अस तिला दिसलं,एक हसण्याचा आवाज तिच्या कानी घुमू लागला,आणि लाईट ही गेली,तिने मोबाईल चा टॉर्च मेणबत्ती शोधण्यासाठी लावला तर तिला त्या उजेडात एक आकृती तिच्या समोरून भर्रकन गेलेली दिसली,ते काय होतं समजेपर्यंत तिच्या मागून तिच्या खांदेवर कोणीतरी हाथ ठेवला मागे वळून पाहण्याची तिच्यात आता मात्र थोडी ही हिम्मत नव्हती...


शुक,शुक,शुssss असा आवाज आला,तिला वाटलं रात्री सारखी मागे रियाच असेल म्हणून तिने लगेच वळून पाहिलं तर समोर तीने अर्धवट चेहरा जळलेली,केस मोकळे लांबसडक, आणि डोळे एकदम खोलवर गेलेले, चेहऱ्यावर ते रौद्र हसू असलेली एक स्त्री तिने पाहिली, आणि ग्लानी येऊन ती खाली कोसळली,दुसऱ्या दिवशी सकाळीच डायरेक्ट ती शुद्धीवर आली तर जिथे कोसळली तिथेच होती,रात्रीच तिला सगळं काही आठवलं ,रिया ला सांगावं ती आली असेल म्हणून ती तिला शोधू लागली, आवाज देऊ लागली,पण रिया अजून आलेलीच नाही म्हणून तिने रिया ला कॉल लावला,2,3दा ट्राय केला पण रिया काही कॉल उचलेना,थोड्या वेळाने रियाचाच कॉल आला..

रेवा-कुठेयस तू रिया???रात्री उशिरा येते सांगून तू अजून रूम वर आलीच नाहीस??

रिया-मी कधी म्हटले रात्री येते म्हणून,आणि आपला कॉल ही झाला नाहीये मी घरी आल्यापासून..मी अजून 4,5 दिवस येत नाही हे सांगायला मीच आज तुला फोन करणार होते..

रेवा-तू परवा रात्री रूम वर आलीयेस,सकाळी सकाळी नको ग फिरकी घेऊ..तुझी मजाक करायची सवय मला माहिती आहे,पण आता मजाक नकोय???कुठे आहेस सांग?

बोलता बोलताच फोन अचानक कट झाला, फोनमधून तोच हसण्याचा आवाज आला आणि मागून आवाज आला मी इथेच आहे...

.........................................


भाग-४


तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो,त्या खाली पडलेल्या मोबाईलच्या स्क्रीन मध्ये तिला तिच्या पाठीमागे उभी असलेली आकृती स्पष्ट दिसती,ह्या वेळी मात्र तिने जी रात्री पाहिली होती ती बाई नव्हती,ही एक छोटी मुलगी होती जिच्या चेहऱ्यावर भयंकर राग आणि डोळ्यांतून जणू आता रक्त वाहेल एवढे लाल होते,हिंमत करून स्वतःला सावरत धडपडत ती जिने उतरून खालच्या फ्लोअर ला आली...


तिथे कोणीतरी मदत करेल या आशेने तिने एका एकाचा दरवाजा खटखटायला सुरुवात केली,बऱ्याच वेळ झालं तरी कोणी दरवाजा उघडायला आलं नाही,तिने घड्याळाकडे पाहिले तर ,सकाळचे 11 वाजले होते,तरीही ह्या बिल्डिंग मध्ये सगळीकडे अंधारच पसरलेला होता...ठिंबठिंबणाऱ्या बल्बचां ही आता अंधुक प्रकाश होत चालला होता,ते विजण्याआधी तिचं लक्ष तेथील फ्लॅट ना असलेल्या कुलूपांकडे गेले,सगळे लॉक होते,ती आली तेव्हा सगळे इथेच होते,ऑफिस ला जाता येताना तस कोणी बाहेर दिसतं नव्हतं ,पण सगळे असे अचानक थोडी जातील...


आता हळूहळू सगळ्या गोष्टीं तिच्या लक्षात येऊ लागल्या होत्या,तीने त्या रात्री जी बाई पाहिली होती ती तिने ती याआधी इथे नवीन आलती तेव्हाच एक झाडूवाली म्हणून तिला पाहिलं होतं,आणि ती पोरगी जी तिला मोबाईलच्या स्क्रीन मध्ये दिसली ती तर गेट च्या तिथे आत मध्ये असलेल्या एका चॉकलेट च्या दुकानात बसलेली असायची, छोटीशी आणि दिसायला ही cute कोणीही सहज तिला पाहिलं तर आपसूक चेहऱ्यावर smile येईल अशी ती होती,रेवा आणि तिची दररोज नजरभेट व्हायची आणि रेवा एक smile देऊन दररोज निघून जात...काय घडतय याचा रेवाच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला होता,आणि इकडे मात्र ठिंबठिंबणारे बल्ब केव्हाच विझून गेले होते,सगळीकडे काळोख पसरला होता...बाहेर जायचा रस्ता ही आता तिला समजेना झाला होता...


आपल्याला मदतीची गरज आहे की ह्या दोघींना आपल्या मदतीची गरज आहे, तिला काहीच समजेना झालं,त्या दोघींनीही 10-12 दिवसात तिला काही त्रास ही दिला नव्हता जेणेकरून ती जास्तच भीती बाळगेल,उलट रिया म्हणून त्या दोघी तिच्या बरोबर राहत होत्या,तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालंत जे थांबायचं नावच घेतं नव्हतं,विचार करत चालत चालत ती एका अडगळीच्या खोलीत येऊन पोहचली, अंधारात काही दिसतं नव्हतं,चेअर ला धडकून ती खाली पडली,तिथे तिला एक मेणबत्ती हाताला लागली,आता एक काडीपेटी किंवा लायटर काहीतरी हवं होतं जेणेकरून तीला उजेड करता येईल,अंधारात ती कुठे काही मिळतंय का हे हाताने चाचपडत होती,तेव्हा तिच्या हाताला फुटलेल्या काचेचे तुकडे लागले...


ती बाई आणि मुलीचा आवाज रेवाला आता रडलेला ऐकू येऊ लागला होता,त्या दोघी तर तिला दिसत नव्हत्या आणि दररोजसारख्या आसपास भासत ही नव्हत्या,आज तिला जे भासत होतं ते भयंकर पेक्षा ही भयंकर होतं, पण ती स्वतःला सावरत होती,अचानक बंद झालेले बल्ब पुन्हा लागले होते,ती अडगळीची खोली धुंधक प्रकाशमय झाली होती,तिच्या हाताला लागलेली जखम तिला जाणवली नव्हती,पण रूम मध्ये मात्र सगळीकडे रक्ताचे थेंब पडले होतं,तिच्या लक्षात आल्यावर एका जागेवर ती बसली तिने जवळ असलेल्या स्टोलचा तुकडा फाडून ती जखम बांधून टाकली...सगळं काही शांत भासत आहे आता बाहेर पडावं म्हणून उठली,तिचा स्टोल तिथे असलेल्या पुस्तकांच्या रॅक च्या खिळ्यात गुंतला आणि सगळी पुस्तके खाली पडली, सगळी धुळीने माखलेली होती,एक एक करत तिने पुन्हा ती वर ठेऊन दिली,शेवटी जे हाताला लागलं ते एवढ्या धुळीतही जसच तसच होतं,ती एक आकर्षक डायरी होती म्हणून तिने ती हातातल्या बॅग मध्ये टाकली...आणि रूमवर आली,तिने ती डायरी उघवली ...त्यात पहिल्या पानावर एक सुंदर छोट्या गोड मुलीचा फोटो होता खाली तीच नावही होत 'रिया'...आणि दुसऱ्या पानावर एक couple फोटो होता,पण त्या फोटोमधल्या त्या पुरुषाचं तोंड रंगवलेल होत,त्यामुळे तो चेहरा नीट दिसत नव्हता...तीच नाव होतं सुमन पण त्याचं नाव ही रंगवलेलं होत...त्या स्त्रीला पाहिल्यावर तिला यांना आधी कुठेतरी पाहिलं आहे असं वाटलं,आणि तिला आठवलं,ह्या दोघी त्याचं आहेत ज्या काही दिवसांपासून फ्लॅट मध्ये दिसतायत...तिने डायरीच पुढचं पान उलटलं...आता येथून सुरू होत होती सुमन आणि रेवाची गोष्ट...

.....................................................................


भाग-५

मी सुमन काहीही अपेक्षा,स्वप्न, इच्छा न बाळगणारी ,जे आहे त्यात समाधान मानणारी... पण जशी आवड हळूहळू बदलते,तशा सवयीं ही बदलतात...

प्रेम, लग्न या संकल्पना तशा आधीपासूनच अस्थित्वात आहेत,पण तेव्हा फारसा त्यांना वाव नव्हता म्हणून माझं लग्न भारतीय संकल्पनेनुसार घरच्यांच्या पसंतीला मान देऊन केले...मुलगा कोण आणि कसा हे फक्त वरून वरून घरच्यांनाच माहीत असायचं,त्या मुलीला नाही...तसच अगदी माझंही होत...


संदीपशी लग्न जमलं आणि विवाहही झाला,नव्याचे नऊ दिवस असतात ना अगदी तसंच नवीन नविन सगळं छान वाटत गेलं,नवीन घर ,नवीन जागा,जिथे आसपास कोणीही नव्हतं...बाळाची स्वप्ने आणि मुलगी झाली तर तिचं नाव रेवा असेल हे ठरवून त्यांनी त्यांच्या घरालाही 'रेवाचा फ्लॅट' हेच नावं दिल होत...हळुहळु संदीप मध्ये बदल व्हायला लागला... संदीपच्या सवयीं कळायला लागल्या,तशी मनाला धास्ती वाढत गेली,त्याचं पिणं भयंकर वाढलं होत...माझ्या पोटात रेवाचा अंश तीळ तीळ वाढत होता,मला हे त्याला सांगायचं होत पण तो कधी शुद्धीतच नसायचा,ना घरी यायची वेळ ना कामाचा काही पत्ता...सगळेच काटे उलटे फिरत होते ...आयुष्यात प्रकाश हा किरण दिसतच नव्हता,एक एक दिवस काढता काढता माझे ही दिवस भरले होते...आणि रेवा जन्माला आली,तिच्याकडे पाहून तरी संदीप मध्ये काहीतरी बदल होईल या वेड्या आशेने मी त्याच्या सोबतच रेवाला घेऊन राहिले...रेवा हळूहळू मोठी होत होती ,बाबांचं प्रेम ,माया,काळजी हे तिच्या नशिबातच नव्हतं...तिने संदीप ला समजावयाचा प्रयत्न केला पण त्याच्यात काही बदल होत नव्हता,सुमनही आता दररोज त्याला कंटाळली होती,म्हणून एक दिवस तिने घर सोडून जायचं ठरवलं...


रेवाला घेऊन ती निघाली,तेव्हड्यात बाहेर दारात संदीप उभा राहिला,ती सोडून जातेय रेवाला घेऊन जातेय हे पाहून तो भयंकर चिडला,थोडाही शुद्धीत नसलेल्या संदीपला समजलंच नाही,त्याने त्या दोघींसोबत काय केलं...सुमन आणि रेवाला त्याने दारातून आत ढकलून दिलं, हातात जे आलं त्याने सुमन वर वार केले...छोटा रेवाचा जीव आकांताने ओरडत होता,पण ऐकायला आसपास कोणीही नव्हतं...सुमन रक्ताच्या थारोळ्यात विसावली होती,रेवाही ओरडून ओरडून निपचित पडली होती...त्या दोघींना उठवण्यासाठी शुद्धीत नसलेल्या संदीप ने पाणी म्हणून रॉकेलच ओतले...संदीप जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने समोर पाहिलं तेव्हा त्या दोघींनीही जीव सोडला होता...शेजारी एक डायरी होती ज्यावर छोट्या रेवाने त्यांच्या फ्लॅट चे आई बाबांचे चित्र एका स्वप्नाप्रमाणे रेखाटले होते...त्याला सगळं काही उलगलं पण तेव्हा वेळ निघून गेली होती...त्याच्या हातून घडलेल्या गुन्हा त्याचा त्यालाच सहन नाही झाला म्हणून त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला तेव्हड्यात घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सगळं काही जळून खाक झालं...


भाग-6

रेवाने ती डायरी बॅगमध्ये घातली आणि डायरी घेऊन बाहेर पडणार तोच ती मुलगी रेवा तिच्या समोर आणि ती बाई सुमन तिच्या मागे उभी राहिली,त्यांना रुद्रावस्थेत पाहणं तिला अवघड होतं, पण तरीही तिने जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला,तिच्या बॅग मधील ती डायरी त्या दोघी ही हिसकावू पाहत होत्या ,आणि रेवा मात्र तिची बॅग सोडायला तयार नव्हती...


तिची पूर्ण खात्री झाली होती की ह्या डायरीमध्येच त्यांचा जीव अडकला आहे...,हे त्यांचं स्वप्न आहे आणि कोणीही आपलं स्वप्न असं दुसऱ्याच्या हाती सोपवणार नाही म्हणून तिला आता हिला कस ही करून ती डायरी बाहेर घेऊन जायचंच होतं,म्हणून ती जीवाच्या आकांताने त्या भीषण शक्तींचा सामना करत होती...फिरून फिरून रेवा त्या अडगळीच्या खोली पाशीच येत होती,तिला बाहेर जायचा रस्ता काही केल्या मिळेना,आणि त्या दोघी तिचा पाठलाग काही सोडेना,छोट्या रेवाला आणि सुमनला हे सत्यही माहित नव्हतं की या डायरीच्या बाहेर जाण्याने त्यांना या फ्लॅटमधून मुक्ती मिळणार आहे...रेवाला मात्र बाहेरचा रस्ता शोधता शोधता संध्याकाळ झाली होती सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता,रेवा कितीही पळाली तरी अडगळीच्या खोली पाशीच येत होती,तिला आता काही समजतं नव्हतं,बाहेर पडण तिच्याच्याने होणार च नाही असं तिने आता मनाला समजवलं, पळायचा तर सोड आता उठून चालायच ही त्राण तिच्यात नव्हता,ती बाई आणि छोटी मुलगी तिच्या समोर खिकाळत बसल्या होत्या,त्यांचा तो हसण्याचा आवाज तिला आता अनावर झाला होता,ती वस्तू हाताशी धरून तिने आता पर्यंत स्वतःला त्यांच्या पासून वाचवलं होतं, ती वस्तू तिच्या कडे होती म्हणून त्या अजून पर्यंत तीच काही बिघडवू शकल्या नव्हत्या...त्या अडगळीच्या खोलीत एक छोटासा प्रकाश किरण बाहेरून आत येतोय हे तिच्या नजरेस पडलं,त्या पुस्तकांच्या रॅक च्या मागे एक खिडकी होती, येथून बाहेर पडायला नक्कीच रस्ता असेल ती विचार करत होती,एक शेवटचा पर्याय म्हणून आजमावून पहावं म्हणून तिने ते ही करायचं ठरवलं,त्या दोघींना त्या वस्तूकडे आकर्षित करत तिने ती वस्तू हवेत फेकली,ती पकडायला म्हणून त्या हवेत झेपावल्या तशी रेवाने ते रॅक बाजूला सारून त्या खिडकीतून बाहेर उडी मारली,उडी मारताना पुन्हा एकदा तिच्या स्टोल त्या रॅक मध्ये गुंतला,ते हवेत फेकलेली वस्तू ही नेमकी रॅक वर येऊन पडली,स्टोल गुंतल्यामुळे त्या रॅक वरचे सगळी पुस्तके रेवा बरोबर च खाली पडली...त्यात ती वस्तू ही खाली पडली तसा त्या दोहींच्या आक्रोशाने आणि किंचाळीने तो फ्लॅट हादरून गेला...


दुसऱ्या फ्लोअर वरून पडल्यामूळे रेवा बेशुद्ध झाली होती,5 मिनिटांनी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला कोणीतरी शुद्धीवर आणलं होतं,ते एक आजोबा होते,तिने त्यांच्या कडे लक्ष न देता आसपासच्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात ती वस्तू शोधू लागली...

आजोबा-अग पोरीं,या मातीच्या ढिगाऱ्यात काय शोधतीयेस,काही हरवलं आहे का???आणि तू इथे या ठिकाणी कशी आलीस???तीच लक्ष आजोबा काय बोलतात या कडे नव्हतं,ती वेड्यासारखी त्या मातीत काहीतरी शोधतीये विचित्र लक्षणं वाटलं म्हणून आजोबा तेथून निघून गेले,तो पुस्तकांचा ढिगारा चाचपडत असताना तीच लक्ष थोडं दुरवर पडलेल्या डायरीकडे गेलं,तिने ती हातात घेतली आणि उघडली त्या डायरीतील सगळी पाने अचानक नष्ट झाली होती...आणि एकच पानं उरलं होत...त्यावर लिहिलेलं होतं फक्त आणि फक्त

'रेवाचा प्लॅट'...


तिने मागे वळून पाहिलं तर ती पूर्णपणे गोंधळून गेली,दूरवर तिला काहीच दिसत नव्हतं,फक्त आणि फक्त सुनसान जागा होती,तिथे ना कोणती बिल्डिंग होती ,ना तिच्या येण्या जाण्याचा ऑफिस चा रस्ता होता,काहीच नव्हतं,सगळं काही तिच्या समजण्यापलीकडचं होतं, संध्याकाळ व्हायला काही मिनिट बाकी होते,सूर्य अजूनही मावळतीला गेला नव्हता त्याची फिक्कट किरणे अजूनही पडली होती,त्यात ती डायरी कधी राख झाली रेवाला ही नाही समजलं...हे सगळं घडलं याचा तिच्या कडे आता काहीच पुरावा नव्हता...


तिला माहीत ही नव्हतं की,आजवर स्वप्न आणि सत्य यात गुंतलेल्या त्या दोन जीवांना तिने कायमच मुक्त केलं होतं...

विश्वास न बसणाऱ्या गोष्टीं सांगून लोक वेड्यात काढतील,म्हणून ती आजही या बाबतीत शांतच आहे...आणि हे ही खरं आहे की ती बाई आणि मुलगी आजही तिला कधीतरी दिसते,पण रौद्ररुपात नाही तर हसऱ्या रुपात...

समाप्त...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama