व्यक्त होणं एक गरज
व्यक्त होणं एक गरज


अनेकदा अस होत की,
भावना व्यक्त केल्यानंतर हजारो प्रश्नांना सामोर जाव लागत, व्यक्त होण्यासाठी रस्ते तसे खुप आहेत, त्यातल्या त्यात जस जवळची व्यक्तीला आपण सहज सांगून टाकू शकतो, पण सगळ्यांकडेच ती व्यक्ती नसते आणि असली तरी सगळे च सांगू शकतात अस नाही, म्हणून काय करायच मनावर ओझ नाही ठेवायच, ते व्यक्त करायचच पण अशा भाषेत जी फक्त आपल्याला समजते, आणि व्यक्त झाल्याची आपल्याला शांती ही मिळते, कोणाला कळो अगर ना कळो शेवटी काय तर व्यक्त करण महत्त्वाच असत, ते कुठेतरी व्यक्त झाल की मन ही हलक होत आणि आपण उत्साही ही होतो..मग सोपा आणि साधा उपाय तो म्हणजे...
लिहा किंवा रेखाटत जा..लिहायचं आणि रेखाटायच म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आम्ही कवी, लेखक किंवा चित्रकार थोडी आहोत जेणे करून ते आम्हाला शब्दांत आणि चित्रात मांडता येईल...तर सांगायचं हे आहे की कोणीही जन्मतः कलाकार नसतो, परिस्थिती किंवा आवड यातून तो घडत जातो आणि कोणताही कलाकार आधी स्वतः साठी च आपली कला जपत असतो, उद्या जाऊन मग तो लोकांच्या नजरेत कलाकार बनतो...
व्यक्त होणं खरंच खुप महत्वाचं असतं, नाहीतर चिंता, काळजी आणि हुरहूर माणसाला आतून खूप पोखरते. जी वरवर जाणवत ही नाही, एकदा का माणूस मनाने खचला तर मग पुन्हा मनाला उभारी देणं खुप अवघड जातं... म्हणून व्यक्त होत चला, भलेही कोणाला मग काही ही वाटो...