STORYMIRROR

Prashant Shinde

Action Others

2  

Prashant Shinde

Action Others

राजकुमारी...

राजकुमारी...

1 min
135

परिकथेतील राजकुमार किंवा राजकुमारी म्हणून लहान असताना दिवसाची सुरुवात व्हायची.तेंव्हा खूप मजा वाटायची. सारे जीवन एक आव्हान वाटायचे. दुःख दारिद्र्य जवळपास फिरकायचे ही नाही.गरजा कमी आणि समाधान ,मोठे असायचे.वर्तमान आंनदी वातावरणात सरायचे.छोट्या छोट्या कथांनी कान तृप्त व्ह्यायचे.,आता नेमकी एक अशी कथा आठवत नाही पण त्या कथेतील राजकुमारी मात्र तशीच आहे.लांब कुरळे केस,गोबरे गाल, काळेभोर मोठे पाणीदार डोळे,थोडी लांब मान, रेखीव भुवया,भरगच्च छाती,कमनीय कंम्बर,आणि मोत्या सारखे बारीक दात ,लाल ओठ त्यातून खुलणारे स्मित हास्य सारे कसे विलोभनीय. अशीच सहचारिणी असावी अशी कल्पना मनात घेऊनच तरुणी खुलले फुलले. आजही त्या राजकुमारीसहच जीवन व्यतीत होते आणि नवल वाटते.आणि एक वेगळाच अर्थ जीवनाचा कळतो,मन सौन्दर्य मनाचे न्याहळते आणि स्वतःला राजा समजून जीवन व्यतीत होते. ती राजकुमारी नित्य माझी सेवा करते तेंव्हा परीकथेतील त्या राजकुमारीच्या मुखावरचे समाधान पाहुन खूप बरे वाटते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action