Arun Gode

Abstract

2  

Arun Gode

Abstract

पूरण पोळी

पूरण पोळी

4 mins
117


        महाराष्ट्रात पुरण पोळी हे व्यंजन खूपच प्रचलित, प्रसिद्ध व आवडीचे आहे. जवळ-पास बहुतेक मोठ्या सणाला पूरण पोळी हे व्यंजन गृहिणी परिवारासाठी हमखास करतात. पुरण पोळी जेवढी खाण्यासाठी स्वादिष्ट असते, तेवढीच ती करायला कष्टदायक व अवघड असते.सगळ्याच गृहिणींना ती पाहिजे तशी हमखास करता येतेचं असे नाही. फार लिचड, कष्ट्दायी काम असल्यामुळे ब-याच गृहिणी आंग काढतात. नाचता येत नाहीं म्हणुन आंगन वाकडे असे सांगतात. पारगंत स्त्रीयां फक्त पूरण पोळी फार आवडिने करतात. तसे हे व्यंजन फार महागडे पण आहे. ते बनवायला खर्चीक व वेळ लागणारे आहे. जेव्हा कधी-काळी पूरण पोळीचा पाहुणचार घरच्या किंवा पाहुण्याला असतो, तेव्हा जेवणाची काही वेळ निश्चित नसते.


       पुरणाची पोळी आमच्याकडे वर्षभरत निदान दोन-तीन वेळा, बहुतेक दिवाळी, गणपती व होळीला होत असते. काही महत्वाचे पाहुणे जसे जवाई, इन-व्याही वैगरे आले म्हणजे त्यांची खातीर दारी करण्यासाठी होते असते. आमच्या घरी, मी जर अपवाद सोडला तर, सगळ्यांनाच पूरण पोळी फार आवडते. त्यामुळे माझ्या आईला मी सर्वात लहान असल्यामुळे माझ्या साठी वेगळे काही तरी करावे लागत असे. पंगत चालु असतांना माझे सर्वच मोठे भाऊ मला पुरणाची पोळी किती छान झाली, म्हणुन सारखे हिणवत असायचे. त्यामुळे मला खूपच राग येत असे. राग आल्यावर मी ताटावरुण बरेच वेळा उठुन जात होतो. माझी आजी मग माझी समजुत घालत असे. ती म्हणायची अरे बाळा तु आता मोठा झाला आहे.आता असा नेहमी हट करत नको जावु. अन्नाला पाठ दाखवत नसते. पुरणाची पोळी तुझ्या आई पेक्षा कोणीच सुंदर करु शकत नाही. ती किती मेहनतीने पूरणाची पोळी सर्वांन साठी करते. बघ सगळे कसे आनंदाने व रुचीने पोळी जेवत असतात. तु पन थोडी-थोडी जेवायला सुरु कर , म्हणजे तुला पण आवडेल !. पण गाढवाला गुळाची काय चवं !.


      नंतर ती पुरण पोळीच्या घडलेला अनेक गंमती-जंमती सांगत असे.त्यतील एक प्रसंग मला अजुनही आठवतो. तुझ्या आईच्या लग्नात सर्व वराड्यासाठी तुझ्या आजोबाने पुरनाची पोळी करन्याचे ठरविले होते. त्यामुळे आम्हा सर्वांना त्याची पूर्व तयारी करावी लागली होती. जवल-जवळ हजार–पाचशे ,कमित-कमी वराडी लग्नात असनार असा कयास होता. पाटलांच्या घरचे लग्न असल्यामुळे गावांतील व आजु-बाजुच्या गावातील मंडळी पण असणारचं हे निश्चित होते.त्यामुळे सर्व प्रथम दहा-बारा तुपाच्या पिंपाची व्यवस्था करने आवश्यक होते. आजीने त्यामुळे दूध-तुप गांवातील लोकांना देने बंद केले होते. गावांत चर्चा होत होती कि पाटलीन ने दूध-तुप विकणे कां बंद केले असावे ?. इतक्या तुपाचे ते काय करणार !. असे प्रश्न चर्चेत नेहमी होत असे. वाड्यात व शेतावर काम करणारी मंडळी पण चर्चेत सहभागी असतं. त्यांना खूपच खोदुन-खोदून विचार-पूस केल्या वर ते सांगत कि येत्या हिवाळी हंगामात पाटलाच्या सर्वात लहान मुलीचे आणी घरातील शेवटचे लग्न असल्यामुळे तुप जमवणे सुरु आहे. त्यामुळे गांवातील लोकांना अंदाज आला कि मुलीच्या लग्नात बहुतेक पूरण –पोळी असनार !. गांवातील लोकांच्या आता अपेक्षा उंचावल्या होत्या. स्वातंत्र पूर्व काळात गोड-धोड खायला मिळने म्हणजे अक्षरः अमृत भेटण्या सारखे होते.चोर नाही तर चोरांची लंगोटी. या आशेने गरिब गांवकरी लग्नाची वाट बघत होते.


      लग्नाची तिथी जवळ-जवळ येत चालली होती. तसे-तसे वाड्यातल्या हालचालींना वेग येत होता. हजार-पाचशे वराड्यासाठी पूरण्याच्या पोळीचे लग्नात व्यंजन ठेवायचे म्हणजे अनेक मोठी गंज पुरण सिजवण्यासाठी लागनार होती.पुरण्याच्या पोळ्या साठी ब-याच सुगरनी बायांची व्यवस्था करने आवश्यक होते.या सर्व हालचाली मुळे लग्नात पुरणाच्या पोळीचे जेवन असनार हे निश्चित झाले होते. लग्नाच्या सर्व विधी सुरु झाल्या होत्या. व त्या पार पाडल्या जात होत्या.शेवटी पाटलाच्या सर्वात लहान लाडक्या लेकीचे थाटा-माटाने विधिवत लग्न लागले होते.पुरणाच्या पोळीच्या पंक्ति सुरु झाल्या होत्या. वराड्यांना पुरणाच्या पोळ्या जेवण्या साठी डोने भरुन-भरुन तुप वाढण्यात येत होते. वराडी अन्य व्यंजना सोबतच दटुन पूरणाच्या पोळीचे सेवन करत होते. हळु- हळु नवरी निघण्याची वेळ झाली होती. आवश्यक लग्नाच्या विधी पूर्ण होताच, वर पक्षाने निघण्याच्या हाल-चाली सुरु केल्या होत्या.


त्या काळात येण्या-जाण्या साठी रेंगी, छ्कडे, व बैल बंडीचा वापर होत असे. आनी नवरदेव-नवरी मेण्यात बसुन जात असे. मेणा घेवुन जानारे चार-सहा चांगले हट्टे-कट्टे पुरुष असायंचे. नका-नका म्हणां आणी पायली भर आंबिळ चखां. पूरणाच्या पोळीचे जेवन असल्यामुळे हे सर्वजन एक-मेकांना खूपच आग्रह करु-करु जेवत होते.त्यात भरपुर तुप.काही तुपाची कमी नव्हती. वधु कडील लोकांचा या मेना घेवुन जाना-यांना फार आग्रह होत होता. गाडग्या सोबत नळाची यात्रा. शेवटी त्यांचे जेवन झाले. आता नवरदेव-नवरी सोबत मेण्यात बसुन आपल्या गांवी जायला निघाले होते. अगदी समोर काही घोडेस्वार सुरक्षेतेसाठी तर काही शेवटी होते. मध्ये मेणा व समोर –मागे अन्य वराडी आपल्या रेंगी-छकड्याने चालत होते. हिवाळ्याचे दिवस होते. त्यामुळे भराभर तापमान सारखे घसरत चालले होते.मेणा वाहुन नेणा-यांच्या पोटातील तुप हे थिकटत चालले होते. त्यामुळे पोट सारखे फुगत चालले होते. आवश्यकते पेक्षा तुपाचे व पुरणाच्या पोळीचे जेवन झाल्याने पाचन तंत्र सुरळीत कार्य करत नव्हते. व त्यात पोटात तुप थिकटल्याने व्यवधान निर्मान झाले होते. त्यामुळे ते चारही मेणेवाले सारखे क्षमता नसतांनाही फेंगडत-तेंगडत चालत होते.शेवटी असाह्य झाला वर त्यांनी मेणा खाली ठेवला होता. व तीथेच लोळण घेवु लागले होते. सर्वीकडे झुंमड उडाली होती. हाच त्रास थोड्या फार प्रमाणात अन्य वराड्यांना पण होत होता. लगेच काही तज्ञ लोकांच्या हे लक्ष्यात आल्यामुळे त्यांनी तिथेच शेकोट्या पेटवल्या होत्या. मेणेवाल्यांना प्रत्येक्षात शेकोटिच्या आगे वर काही अन्य माणसे झुला देत होते. त्यामुळे पोटातील थीकटलेले तुप पातळ होईल असे त्यांना वाटत होते. व गरम पानी व चहा वैगरे घेवुन समोर जाण्या साठी सज्ज होत होते.अती थंडीमुळे हा प्रसंग वारम-वार घडत होता.शेवटी सकाळी-सकाळी वरात आपल्या घरी सुखरुप पोहचली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract