Varsha Kendre

Action Inspirational

3  

Varsha Kendre

Action Inspirational

पुष्करची सावधानी

पुष्करची सावधानी

1 min
230


 सदाशिव हा त्याची पत्नी व आठ महिन्यांच्या मुला सोबत नारायण पाटलांच्या शेताच्या बाजूलाच असलेल्या झोपडीमध्ये वास्तव्यास होता. तो नारायण पाटील यांची शेती बटाईने करून देत असे. नारायण पाटलांचा शेताजवळ भला मोठा वाडा होता. सदाशिव ने त्याच्या झोपडी पुढील कडुलिंबाच्या मोठ्या झाडास एक झोका आपल्या बाळासाठी बांधलेला होता.' पुष्कर' हा नारायण पाटलांचा दहा वर्षाचा मुलगा त्याची शाळा सुटली की शेताकडे फेरी मारत असे. सदाशिव हा त्याच्या बाळास झोक्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत ठेवून पत्नीसह शेतीकाम करण्यात मग्न झालेला होता.

            नेहमीप्रमाणे पुष्कर शेताकडे फेरी मारण्यास निघाला तेव्हा त्यात एक दोन हात लांबीचा साप झाडावरील  फांदीला पिळा घालून बसलेला दिसला. त्याने पाहिले की साप ज्या फांदीला  पीळा घालून बसलेला आहे त्याच फांदीस एक झोका बांधलेला आहे आणि त्या झोक्यामध्ये एक बाळ झोपलेले आहे. सदर बाब वडिलांना सांगण्यासाठी पुष्करने वाड्याकडे धाव घेतली. दारातूनच पुष्कर मोठ्याने म्हणाला," बाबा. . बाबा. . इकडे या".

 त्यावर नारायण पाटील म्हणाले," अरे पुष्कर काय झाले?, तू एवढा का घाबरलेला आहेस?". पुष्कर म्हणाला," बाबा झाडाच्या फांदी वर खूप मोठा साप आहे आणि खाली झोक्यामध्ये बाळ झोपलेले आहे". नारायण पाटील व पुष्कर धावत धावत झोक्या जवळ आले, वर पाहू लागले तर तो साप तसाच फांदीवर बसलेला दिसला. नारायण पाटलांनी डोक्यातील बाळास उचलून घेतले आणि सर्पमित्रस सापाबद्दलची माहिती दिली. तेवढाच एक कामावरून सदाशिव व त्याची पत्नी आले आणि सर्व बाब नारायण पाटलांकडून त्यांना कळली. नारायण पाटलांनी छोटा बाळास सदाशिवकडे दिले.

                  सदाशिव व त्याच्या पत्नीने नारायण पाटील यांचे आणि पुष्कर चे आभार मानले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action