STORYMIRROR

Varsha Kendre

Classics Inspirational

3  

Varsha Kendre

Classics Inspirational

शारदा झाली निडर (लेख)

शारदा झाली निडर (लेख)

2 mins
177

शारदा योगेश व स्वाती या आपल्या दोन अपत्यांना घेऊन तिच्या पतीसह म्हणजेच राजीवसह अतिशय आनंदाने संसार करत असे . राजीव त्याच्या सुंदर सोज्वळ पत्नी शारदास आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता भासू देत नसे. शारदा ही जितकी दिसण्यात सुंदर तितकीच स्वभावाने गोड होती. तिचे खळखळून हसणे आणि कोणासही आपल्या गोड वाणीने आपलंसं करण्याची विलक्षण कला अगदी कौतुकास्पद होती.

          पती राजीव त्याच्या दोन अपत्यांना पूर्ण वेळ देऊन जीव लावत असे. शारदा एक शिक्षिका आणि कवयित्री होती. पती राजीव तिला तिच्या लिखाणाच्या कार्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असे. त्यामुळे पत्नी शारदा हिस आकाशच ठेंगणे वाटत असे. अन्यथा कवयित्रीना घरातून सहाय्य क्वचितच मिळत असते. शारदा तिच्या कविता लिखाणाच्या विश्वात इतकी गुरफटली होती की घरातील सर्व जबाबदाऱ्या पती राजीवने पेलण्याची वेळ येत असे. अशाप्रकारे शारदाचे कुटुंब हे तिच्यासाठी स्वर्गच भासत असे. पती राजीव आपली चतुर्थ कर्मचाऱ्यांची नोकरी सांभाळत घरातील स्वयंपाकाचेही काम करी. मुलांना जेवू घालने, मुलांचा अभ्यास घेणे हे पती राजीवचे नित्याचे काम असे. शारदास काव्यक्षेत्रात पूर्णपणे झोकून देण्यास वेळ काढण्यात पती राजीवची खूप मदत होई. शारदा च्या साहित्य क्षेत्रातील प्रगतीवर राजीव खूप खुश असे. पण का कुणास ठाऊक शारदाचे दैवाला सुख पाहवले नाही. पती राजीव हा एके दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच्या शारीरिक वेदना पाहून शारदा पूर्णपणे घाबरून गेली. मैत्रिणींच्या सहाय्याने तिने तिच्या परीने पती राजीव यांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. तिच्या प्रयत्नांना यश आले नाही. राजीव यांना लवकरात लवकर बेड उपलब्ध झाला नाही. जेव्हा बेड उपलब्ध झाला तेव्हा फार उशीर झाला होता. एमडीसीवीअर औषधाचा तुटवडा भासू लागला आणि तेवढ्यात औषधाच्या अभावामुळे राजीवचा दुर्दैवी मृत्यू झाला. शारदा आपल्या पतीस आणि दोन मुले आपल्या पित्यास मुकली. नियतीने शारदा च्या आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर निर्माण केला.

     भावनिक , सतत हसरी खेळती शारदा आपल्या पतीच्या आकस्मिक निधनाने कोलमडून पडली. मैत्रिणींच्या सहकार्यामुळे आणि सखी कडून मिळवलेल्या मनोबल व पाठबळामुळे शरद आणि आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न केला आणि धीट व खंबीर मनाने आपल्या अपत्यांना मोठे करण्यासाठी ती सज्ज झाली.

    कोरोनाने केला कहर

     झाले आयुष्य जहर

     मैत्रिणींच्या सहकार्याने

     झाली शारदा निडर

जगभरातील अशा लाखो जीवन संकटात सापडलेल्या शारदा सारख्या स्त्रियांना तिच्या सखींचे सहकार्य मिळायला हवे आणि स्त्री ही स्त्रीची शत्रू असते हे वाक्य मोडीत निघायला हवे. हाच एकमेव उद्देश या लेखामागे आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics