Varsha Kendre

Others

4.0  

Varsha Kendre

Others

प्रेम तुझे-माझे

प्रेम तुझे-माझे

1 min
321


 प्रेम तुझे-माझे

 भिडे आकाशास

 वय पडे कमी

 अंगाई गाण्यास. . 1


 सागर मायेत

 रक्षण छायेत

 पावित्र्य लाडात

 सुरक्षा कवेत. . 2


 संस्कार हिताचे

 रीत-भात त्यात

 नकोत दुरावे

 शील वागण्यात. . 3


 विचारांचे गान

 गाव दोघी छान

 मांगल्याचे देणे

 सान मान-पान. . 4


 रुसवे-फुगवे

 माझ्यासवे सारे

 होशी राज राणी

 नवेच सहारे. . 5


 जोडशी माणसे

 गोड संस्कारच

 जगी नाव मोठे

 आम्ही तुझ्यातच. . 6


Rate this content
Log in