Varsha Kendre

Action Children

3  

Varsha Kendre

Action Children

नदीस पत्र

नदीस पत्र

2 mins
156


विषय- नदीस पत्र


 प्रिय सरिता,

       सप्रेम नमस्कार! पत्र लिहिण्यास कारण की तुझी फार आठवण येत आहे. तुला भेटण्यासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वेळ काढणार आहे. तुलाही मला भेटण्याची ईच्छा होत असेलच! माहेरची आठवण म्हणून तुला हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेले आहे. तुझी व माझी भेट हि सुट्ट्यांमध्ये होते. शेताच्या कडेला झुळझुळ वाहणारी तू. . . माझी अगदी जिवलग मैत्रीण आहेस. मला जसे कळते तसे मी तुला पहात आलेली आहे. अमराईच्या उजव्या बाजूने वाहणारी तू आम्हा सर्व कुटुंबीयांची प्राणप्रिय आहेस. तुझ्यामुळे सर्व राने हिरवीगार दिसतात. किती सारे पाईप्स तुझ्या पात्रांमध्ये पाणी वाहण्यासाठी टाकले जातात, तुला किती ओझे होत असेल त्याचे... परंतु तू कुठेच काही तक्रार करत नाही. वधू पावसामध्ये तुझी पात्र गुडघाभर पाण्याच्या खोली ने भरून वाहते, त्यात कितीतरी लहान- मोठी मुले पोहण्याचा आनंद घेतात आणि तो आनंद तू त्यांना भरभरून देतेस. तुझ्या पाण्यामध्ये जलचर प्राणी किती किती मस्ती करतात, जीवनाचा आनंद घेतात याचे सर्व श्रेय तुला जाते. तुझ्या मध्ये दातृत्व गुण अगदी टीचून भरलेला आहे. तुझ्या पाण्यात आम्ही आमचे प्रतिबिंब पाहून आनंद लुटतोत. तुझ्या स्थिर पाण्यामध्ये एखाद्या छोटा दगड टाकताच अनेक पाण्याची तरंग उमटतात ते चित्रण मात्र मनास आकर्षून नेते. तुझ्या पात्राच्या कडेला एकांती बसून राहावेसे वाटते. तुझ्या पाण्यामध्ये पाय टाकताच किती गार गार वाटते. निसर्गातील पशुपक्षी तुझे पाणी पिऊन तृप्त होतात. आणि जणू त्यांच्या आशीर्वादाने तू तुझ्या ऐटीमध्ये मधुर आवाजाचे स्वर संगीत ऐकवत वाहत असतेस. तुझ्या खोल डोहामध्ये पोहण्याचा आनंद आम्ही मनुष्य लुटत असतोत. मला माहित आहे तुझ्या शहरांमधील बहिणी मनुष्यावर रागात आहेत म्हणूनच की काय पावसाळ्यामध्ये त्या रोद्ररूप धारण करत कित्येक गावांना वाहून नेतात तेव्हा मात्र एक मनुष्य म्हणून माझ्यातील आत्मा बोलतो की सरिते चे पात्र मानव आणि अस्वच्छ केलेले आहे.  तुझ्या पाण्यामध्ये शहरातील घाण, कचरा, कारखान्याची पाणी ,यामुळे जलप्रदूषणास तुला तोंड द्यावे लागत आहे. मी माझ्याकडून तुला एक वचन देते की  तुझे पात्र मी अस्वच्छ करणार नाही. आणि इतरांनाही करू देणार नाही. सरिता तुला आनंदाची गोष्ट सांगते की गेली बरेच वर्ष मी गणपती बाप्पाचे विसर्जन घरातील हौदतच करत आहे.

  शेवटी एवढेच की माझ्याकडून काही चुकले असेल तर मला क्षमा कर, तेवढा दयाभाव तुझ्यामध्ये आहे हे मी जाणते.

             तुझीच,

              वर्षा


Rate this content
Log in

Similar marathi story from Action