VARSHA's poems

Action Others

2  

VARSHA's poems

Action Others

मंगलबाई

मंगलबाई

1 min
205


  मध्यम बांध्याची, गौरवर्णाची, जुडा व भरलेला पदर घेऊन धुन्या भांड्यांची कामे, लेकरे सांभाळणे, साड्या विकणे, फराळाचे पदार्थ तयार करून देणे अशी अनेक कामे मंगल बाई करायची. दोनी हातामध्ये बांगड्या भरून असायच्या. . . स्वच्छता, टापटीपपणा तिच्यामध्ये होता. पुण्यासारख्या ठिकाणी..... लिफ्ट नसलेल्या चौथ्या माळ्यावर ती नियमित माझ्याकडे कामाला यायची. स्मितहास्य गालावर. . . मोजकेच कामापुरते बोलणे असा तिचा स्वभाव. . .


   माझ्याकडे पाच वर्षे ती कामाला होती. माझ्या घरातील भाज्या निवडण्यापासून ते संडासरूम धुणेपर्यंतचे सर्वच कामे ती करत असे. कामामध्ये काहीही तक्रार असायची नाही. कामामध्ये  मागे सरणे नसे. तिचे पती मृत पावलेले होते. तिला संतांनही नसल्याने तिचा सबंध दिवस इतरांची घरकामे करण्यातच  जायचा. फारच आध्यात्मिक बाई होती खरोखर मंगलबाई सारख्या कामवाल्या बाया मिळणे कठीणच! विठ्ठल भक्त मंगल बाई आषाढी एकादशी वारीतील वारकऱ्यांसाठी माझ्याकडून शेंगदाण्याचे लाडू बनवून नेत असे. वारकऱ्यांना केळी वाटप करण्यासाठी तीन डझन केळीचे पैसे माझ्याकडून घेऊन जायची. महाशिवरात्रीच्या दिवशी भजनातील सर्व लोकांना चहा पाजण्यासाठी माझ्याकडून चहा पत्ती, साखर व दूध घेऊन जात असे. माझ्याकडून अध्यात्मिक लोकांची काही ना काही प्रकारे सेवा घडते याचा मला खूप आनंद व्हायचा आणि तो अध्यात्मिक आनंद मला सुखद आणि अनुभूती देऊन जात असे.

 

आपणही आपसुकच अशा भल्या व्यक्तीस खा -पे ,बस अशी वागणूक देतो. भांडेवाली आपल्या घरातील सदस्य समजून तिच्याशी मवाळ रूपात वागत असतो. सणावाराला मंगलबाईस आम्ही कपडे घ्यायचो. योगायोगाने पुण्यातून आमची बदली झाली आणि आम्हाला सोलापूरला यावे लागले. मंगल बाईचे आणि आमचे संबंध दुरावले. राजे आम्हाला मंगल बाईची आठवण येते  पण तशी भली स्त्री मिळणे कठीणच!

 अशा या दुर्गा रूपातील कष्टाळू, अध्यात्मिक मंगलबाईस वरील लेख अर्पित. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action