STORYMIRROR

Varsha Kendre

Children Stories Inspirational

3  

Varsha Kendre

Children Stories Inspirational

धाडसी संध्या

धाडसी संध्या

1 min
388

 अगदी प्रेमळ सुसंस्कारी होतकरू कुटुंबात संध्या चा जन्म झालेला होता.10 वर्षाची संध्या आईस मोठ्या आवाजात म्हणते," आई मी शेळके काकुनकडील मोगऱ्याची फुले देवासाठी आणते ग". आईने होकार देतात संध्या शेळके काकूंकडे गेली. शेळके काकूंना नेहमी चा आवाज कानी पडतो." काकू मी फुले घेत आहे". शेवटी काकूंना तो आवाज कोणाचा आहे कळताच शेळके काकू त्यावर म्हणाल्या," हो हो घे हो संध्या". संध्या फुलांचा टोपलीत फुले घेऊन घराकडे परतली. देवघराजवळ फुलांची टोपली ठेवली . तेवढ्यात आईने संध्या साठी जेवणाचे ताट वाढले आणि म्हणाली," संध्या ..अगं शाळेसाठी उशीर होईल.. जेवण करून घे". संध्या आईचा गोड आवाज ऐकत जेवणासाठी बसली. संध्याचे जेवण होतच आलेले तेवढ्यात बाहेर तिच्या मैत्रीणीने तिला शाळेला जाण्यासाठी आवाज दिला," संध्या. . चल ग शाळेला. . "आले बरं मानसी "संध्याने आवाज दिला. संध्या व मानसी अगदी आनंदाने शाळेत जाण्यासाठी निघाल्या.

      रस्ता ओलांडतेवेळी  संध्यास एक भरधाव ट्रक रस्त्यावरील चार वर्षीय खेळत असलेल्या मुलाकडे धावत असलेला दिसला. संध्या काहीही विचार न करता हातातील शाळेची बॅग खाली फेकत रस्त्यावरील मुलास कवेत घेऊन रस्त्याच्या बाजूस आली. हे दृश्य आजूबाजूच्या लोकांना दिसले. सर्वांनी संध्याचे कौतुक केले. संध्या शाबासकी दिली. ज्या मुलाचे प्राण वाचवले त्या मुलाची आई डोळ्यात पाणी आणत संध्या कडे पाहत म्हणाली," बाळा तू माझ्या मुलाची प्राण वाचवलेस देव तुला दीर्घायुष्य देवो".


Rate this content
Log in