Varsha Kendre

Tragedy

4.0  

Varsha Kendre

Tragedy

नंदा

नंदा

5 mins
798


7000 च्या जवळ लोकसंख्या असलेल्या आणि सुशिक्षितांची संख्या जास्त असलेल्या, शिक्षणास प्राधान्य देणाऱ्या खेडेगावातील सुसंस्कृत, चारित्र्य संपन्न कुटुंबात जन्म घेतलेल्या नंदा नावाच्या मेहनती स्त्रीची कथा. चार बहिणी व दोन भाऊ असे एकूण सहा भावंडे नंदास होती. सर्व बहीण-भावंडांत फारच हुशार, कोणत्याही कार्यात चपळ अशी नंदा शालेय शिक्षणातही भावंडांना मागे टाके. शिक्षणात त्या काळी मुलींना दुय्यम दर्जा मिळत असे . नंदा मोठ्या हाडाची असल्यामुळे तिचे लवकर लग्न  करायचे वडिलांनी ठरवले. नंदाचा वडील भाऊ व नंदा यांचे एकदाच लग्न लावायचे ठरवले. भाऊ नोकरदार असल्यामुळे त्यास हुंडा चांगला आला.  नंदाचे वडील शेतकरी असल्यामुळे त्यांना पैशाची चणचण भासे नंदाच्या वडिलांनी मुलाचा आलेल्या सर्व हुंडा नंदाच्या लग्नासाठी खर्च केला. नंदाचे श्रीमंत घरी बीए शिक्षित मुलाशी लग्न लावले.

              विवाहानंतर नंदा सासरी गेली. नंदाच्या आईचा मात्र हात  आकडल्यागत झाला..

 नंदाची आई नंदाच्या जिवावर घरकाम ठेवून शेती उद्योग पहात असे. कामात चपळ असलेली नंदा आपल्या बहिण भावंडांवर खुप प्रेम करायची. श्रीमंत सासर मिळूनही नंदाच्या नशिबी सासरी कामच काम पडत असे. सासू- सासरे, दीरे, पती असा तिचा 6 व्यक्तींचा छोटा परिवार. नंदन नसल्याने आणि पहिली व मोठी  सून या नात्याने नंदास सासरी मानपान भरपूर मिळे. नंदाचे सासरे माध्यमिक शिक्षक, सासु मात्र कडक स्वभावाची, दोन दिरे शिकत असत. पती मात्र व्यसनी निघाला. या कारणाने नंदास घरकाम करणे नशिबात आले. पतीस नोकरी नाही म्हणून नंदास सासू-सासऱ्यांचा पुढे पुढे करावे लागे. जेवढे श्रीमंत घर तेवढे त्या घराचे कामकाजही मोठे असते. शेती जास्त असल्याने सासूही शेती बघायची. नंदास मात्र शेती काम मिळाले नाही भलेही ती माहेरी शेती उद्योग केलेली असली तरीही. . सासऱ्यांच्या जेवणाचा डबा, दीराच्या जेवणाचा डबा, धुणं-भांडी, साफसफाई अशी कामे नंदा करायची. येणार जाणार या कामांची नेहमीच घाई असायची. नंदा तिच्या जबाबदाऱ्या अगदी मनापासून करायची. त्यामुळे सासू-सासर्‍यांची ती आवडती सून होती. तिच्या गुणी प्रेमळ कष्टी स्वभावामुळे तिने सासरी सर्वांची मने जिंकून घेतलेली होते.

          नंदाच्या सासुस मात्र नंदाच्या  माहेरहून सणा वारास काय काय येते त्याची उत्सुकता असायची. नंदाचे दोन्ही भाऊ शिक्षक असले तरीही त्यांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. नंदाच्या आई-वडील शेतीव्यवसाय करत. भावांना अन्य चार बहिणी. . नंदा सकट पाच बहिणींना सणावारास आणणे, त्यांना करणी- धरणी करणे हे नेहमी शक्य व्हावयाचे नाही. इतर बहिणींच्या करणी धरणीचा त्रास नंदाच्या आई-वडिलांना नसायचा पण नंदास मात्र सासुरवाशीन असल्याने फुल नाही पाकळी तरी या हिशोबाने करणी- धरणी असायची मात्र नंदाच्या सासूस ते पटायचे नाही. तुझ्या माहेरची तुला करणी धरणी जास्त का करत नाहीत? यावर नंदाला बोलणे खावे लागायचे असे वारंवार व्हायचे.7 वी पास नंदा अशी हकिकत माहेरातिला आई-वडील , भावंडांना सांगायची. नंदाचे आई वडील आणि भावंडांना त्याचे फार वाईट वाटायचे . सर्व बहिणी मध्ये श्रीमंत घर पाहून देऊनही आपल्या गुणवान बहिणीस सासरी बोलणे खावे लागत म्हणून नंदाच्या भावांच्या आणि आई-वडिलांच्या मनातून नंदाची सासू उतरलेली होती.

        पतीस नोकरी नसल्याकारणाने, पती व्यसनी असल्या कारणाने नंदास सासू-सासर्‍यांचे बोलणे खावे लागायचे. नंदास बाळंतपणासाठी माहेरी जावे लागायचे. पहिलं बाळ वेडसर जन्माला आले म्हणून सासू नंदास चांगली बोलत नसे. दुसरे अपत्य मुलगी जन्माला आली. तिसरे अपत्य मुलगा जन्माला आला. आता मात्र नंदाच्या शरीरातील ताकद कमी झालेली होती. घर कामाचा बोजा, तीन लेकरांचे संगोपन यामुळे नंदाचे शरीर कमजोर बनले होते. त्यात पोटात चौथा गर्भ राहिला. तिसऱ्या डिलिव्हरी नंतर नंदास डॉक्टरांनी कुटुंबनियोजन ऑपरेशन करण्यास सांगितले होते. चौथ्या गर्भधारणेमध्ये धोका उद्भवू शकतो असे सांगितले होते. नंदाच्या पतीचे तिच्याकडे लक्ष फारसे नसायचे. यातच नंदास चौथी गर्भधारणा झाली. सासू-सासरे आणि पतीच्या दुर्लक्षामुळे नंदास दवाखान्यात जाण्यास उशीर झाला तरी आईने तिला चौथा गर्भ ठेवावा लागला.

 नंदाच्या गुणी स्वभावामुळे नंदा तिच्या बहिणींची आणि भावांची खूप प्रिय होती. नंदाही सगळ्यांना खूप जीव लावायची. माहेरी असते वेळी नंदाने मोठ्या बहिणीच्या डिलिव्हरीमध्ये बाळांचे संगोपन केले होते. नंदाच्या सासु चे म्हणणे असे होते की चौथी बाळ मुलगी असेल तर गर्भ खाली करा.   

 नंदाच्या गर्भास चार महिने झाल्याने तिच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. नंदाने आपल्या पतीला विश्वासात घेऊन चौथा गर्भ राहू दिला. नंदाच्या सासूने मात्र चौथे बाळंतपण माहेरीच करण्यास सांगितले. नंदाच्या घरी सासूचा शब्द सर्वांसाठी प्रमाण असायचा. नंदाने सासरी आठ महिने कामे केली. नवव्या महिन्यामध्ये नंदा बाळंतपणासाठी माहेरी आली. माहेरी मात्र नंदाचा भाऊ पत्नी मुलासह वेगळा राहायचा. नंदाचे आई-वडील स्वतंत्र राहावयाचे. नंदा आपल्या आई-वडिलांसोबत रहावयाची. नंदा आपल्या भावास व भावजईस आपला त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची. आईसही कामे करू द्यायची नाही. नंदाचे दुसरी बहीण पाटलीन माहेरात दिलेली असल्यामुळे गावातच राहायची. ती नंदासाठी निरनिराळे पदार्थ खायला घेऊन यायची. रात्रीच्या वेळेस नंदा, नंदा ची बहिण, नंदाचे आई वडील आणि नंदाच्या बहिणीची मुले ही सर्व बसून गप्पा मारत असत.

 नंदा चे आई-वडील शेतकरी त्यात खेडेगावात बाळंतपणाची सुविधा नाही अशा परिस्थितीत नंदाचे बाळंतपण घरीच करायची आई-वडिलांनी ठरवले.

 नंदाच्या भावांना भावजया खर्च करू देणार नाहीत हे नंदा व तिच्या आई-वडिलांना कळून चुकले होते. नंदास बाळंतपणाच्या सात दिवस आगोदर डोळ्यांना अंधुक दिसू लागले होते. तेव्हाच दवाखान्यात नेऊन तपासणी करणे आवश्यक होते. पण पैसे आई-वडिलां जवळ नसल्याने आणि गावातील भावाने नंदाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नंदास दवाखान्यात कोणीही नेऊ शकले नाहीत. नंदाच्या पोटात अचानक दुखायला लागले आणि नंदा च्या बहिणीच्या मुलाने नंदास तालुक्याला नेले. नंदाचे दुर्दैव असे की तालुक्याचे डॉक्टर ने ताबडतोब चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले तेवढ्यात नंदाच्या आईवडिलांनी नंदाच्या सासरी फोन लावून तिच्या पतीस व सासू-सासरे यास सदर बाब सांगितली. नंदाच्या सासरची मंडळी गाडी घेऊन ताबडतोब नंदा ज्या दवाखान्यात आहे तेथे गेले आणि तिला घेऊन मोठ्या दवाखान्यात गेले तेथे तिची बीपी शुगर वाढल्याचे सांगितले. तेथे तिला सलाईन लावण्यात आले . नंदाची नॉर्मल डिलिव्हरी झाली खरी पण ब्लडिंग होऊन रक्त कमी पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रक्त चढवण्यासाठी नंदाची बहिण तयार झाली , रक्त काढून आणि पर्यंत नंदास शुगर चा अटॅक आला त्यापूर्वी नंदाच्या दिराने नंदा बद्दल हळहळ व्यक्त करत तिच्या तोंडास येणारा फेस रुमालाने पुसु लागला... किती भावजई बद्दल बद्दल आदर आणि आपुलकी. रक्त येईपर्यंत नंदाचे प्राण गेलेले होते. नंदाच्या शवाजवळ गोरीगोमटी मुलगी होती, सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले होते. काळजाचा तुकडा गेल्यागत नंदाच्या बहिणीचे हाल झाले. ती धाय मोकलून रडायला लागली. . तिचा पती ढसाढसा रडायला लागला.

सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकलेला तो क्षण. . लहान बाळास सासूने घेतलेले होते. नंदाचे दोन्ही दीर वहिनी! वहिनी! असे म्हणून रडत होते. नंदा कोणासही बोलणार नव्हती. . तिची फक्त अचल मुद्रा सर्वांना दिसत होती. चार दिवस दवाखान्यात झुंज देत माय माऊली अनंतात विलीन झालेली होती.

                      भरल्या सुवासिनीचे प्रेत सासरे नेण्यात आले होते. . चिल्यापिल्यांचा आई . . आई . . ., उठ ना ग. . आई. . . म्हणत आरडाओरडा सुरू होता. मोठमोठ्याने रडत असलेल्या बाया माणसांचा जमाव पाहून मुले घाबरलेली होती. मुलांना त्यांची आई दुधासाठी नाश्ता साठी हवी होती.  नवजात बाळ सासूच्या हाती होते. सासु रडून-रडून स्तब्ध झालेली होती. लहान लहान लेकरं आईच्या ममतेस पोरकी झालेली होती. सर्व लोक मोठ्या संख्येने जमली होती. भरल्या सुवासिनीची 'नंदाची' अखेरची आंघोळ झाली. आरडाओरडा सुरू होता तेवढ्यात नंदाचा नांदेड चा शिक्षक भाऊ हातामध्ये हिरवी साडी घेऊन झपाझप पाऊले टाकीत. . . अश्रूंनी भरलेले लालबुंद डोळे घेऊन आपल्या प्रेमळ ,गुणवान बहिणीस भिंतीस टेका देऊन पाटावर बसलेल्याअवस्थेत पाहताच नंदा. . . . असे मोठ्या आवाजात हंबरडा फोडत तिच्या मांडीवर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडायला लागला. . . काहीही न बोलणारी तिची मुद्रा पाहून नाही नाही ते बालपणाततील क्षण डोळ्यांपुढे आणत रडू लागला.

       सर्वांचे डोळे पाणावले. . आरती केली. . मृतदेह उचलला गेला. . गावाचे स्मशानभूमीत सरण रचले गेले. . नंदाच्या पार्थिव फुलांच्या माळांनी सजलेले होते . . हिरव्या साडीतील मृतदेह आज पतीने अग्नी दिला. . नंदास अखेरचा निरोप देण्यात आला. लेकरांना घरीच ठेवण्यात आले होते. चार चिमणी पाखरं पोरकी झाली होती. गावामध्ये सर्वत्र शोककळा पसरली होती.

 ईश्वरा.. असे मरण कोणासही देऊ नको! ज्या मरणाने जग पाहताच लेक आईच्या मायेच्या पदरास मुकली गेली . . .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy