मी फुलवलेली बाग
मी फुलवलेली बाग
मोगरा फुलला
मोगरा फुलला. . .
खरोखर जेव्हा-जेव्हा मोगरा फुलतो आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो तेव्हा तेव्हा वरील गाणे गुणगुणले शिवाय राहवत नाही. हा फुललेला मोगरा मात्र आपणास छोट्या किंवा मोठ्या बागेतून पहावयास मिळतो. अशी बाग फुलवते वेळी जे कष्ट करावे लागतात ते बाग फुलवणाऱ्यास ठाऊकच असते.
कोणतीही बाग फुलवतेवेळी विविध कारक कौशल्य सोबत थोडी कल्पकता व बुद्धीचा वापर करावा लागतो. मी फुलवलेल्या बागेची जागा ही बाल्कनी आणि टेरेसनेही व्यापलेली आहे. बाल्कनीमध्ये मी कुंड्यांचा हँगिंग रूपात वापर केलेला आहे. अंगणामध्ये काळी माती घालून बाग फुलवलेली आहे. तेथे कुंड्यांचाही वापर केलेला आहे. अंगणा मधील जागेत ठेवलेल्या कुंड्या रंगवलेल्या तर आहेतच पण त्याबरोबर त्यावर काही सांकेतिक चित्रे रेखाटलेली असून त्याखाली स्लोगन्स लिहिलेले आहेत. टेरेस वरील जागेमध्ये ही मी बाती पसरवून आणि मोठ मोठ्या कुंड्या वापरून पेरू, चिकू आंबा, पपई अशा प्रकारची झाडे लावलेली आहेत. अंगणातील जमिनीवर सावलीसाठी कडूलिंबा सारखी आणि शोसाठी अशोकाची झाडे लावलेली असून बोर, सीताफळ, रामफळ अशी फळझाडे आणि पारिजातक, नंदी वाहन, कर्दळ ,काटेरी गुलाब कोरांटी, अशी फुलझाडे लावलेली आहेत. तसेच मनीप्लांट, जुई ,मोगरा, चमेली यांच्या वेलीही लावलेल्या आहेत.
