STORYMIRROR

Arun Gode

Action

2  

Arun Gode

Action

प्रथम साक्षात्कार

प्रथम साक्षात्कार

7 mins
58

      एका चिमुकल्या गांवात, एक साधारण कुंटुंबा-मधे एक होतकरु मुलगा होता. घरात तोच सर्वात लहान होता. गांवातील शाळे-मधेच त्याने आपले बारावीं पर्यंतचे शिक्षन पूर्ण केले होते. बारावीं नंतर काय करायचे ते आधी ठरले नव्हते. इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल इतके अंक त्या प्राप्त झाले नव्हते आणी इंजिनिअरिंगला झेपणारा खर्च पण करण्याची आर्थीक संपन्नता परिवाराची नव्हती. म्हणुन शेवटचा पर्याय म्हणुन त्याने गणित व विज्ञान विषय घेवुन स्नातक होण्याचे ठरविले होते. त्याने ती पदवी आपल्या गांवावरुन रोज जाने-येने करुण मिळवली होती. आता त्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करतांना तबल तीन वर्षाचा जाणे-येणे करण्याचा अनुभव झाला होता. त्याची इच्छा सायंस मधे स्नातकोत्तर करण्याची होती. त्यासाठी त्याने नागपुरच्या सायंस कॉलेज मधे दाखला घेतला होता.पदवी अभ्यासक्रम रेल्वे ने जाने-येने करुन करने फार अवघड होते. पण नेहमीच हिम्मत करणा-यांचेच दैव मदत करित असते. म्हणुन त्याने त्या दिशेने प्रयत्न सुरु केले होते. स्नातकोत्तर अभ्यासक्र्म पूर्ण करतांना तो अनेक स्पर्धा परिक्षांची पण पूर्व तयारी करण्यात लागला होता. स्नातकोत्तरच्या अंतिम वर्षा मध्ये असतांना त्याला एक-दोन ठिकानी केंद्र सरकारच्या कार्यालयत नियुक्ती पण मिळाली होती. पण त्या नियुकत्या पर-प्रांतात फार दूर त्याच्या माय-राज्या पासुन होती. तरी त्याने संबंधीत विभागांना काही महिण्यांची नौकरी वर रुजु होण्यासाठी वाढिव मुदत मागितली होती. तसे संबंधीत कार्यालयांना अर्ज पण केले होते. स्नातकोत्तरची अंतिम परिक्षा होत असतांना त्याला भारत मौसम विज्ञान विभागात वैज्ञानिकच्या जागेवर नागपुर मधेच नियुक्ती मिळाली होती. आता यामुळे त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग उपलब्ध झाला होता. नागपुरलाच राहुन आपन या पेक्षा चांगल्या स्पर्धा परिक्षांची तयारी करु शकतो असा त्याला दृढ विश्वास झाला होता. त्या दिशेने त्याने आपली वाटचाल सुरु केली होती. इतका लांब शिक्षणाचा प्रवास पूर्ण केल्या नंतर त्याच्या रोजच्या भाजी-भाकरीची व्यवस्था सुनिश्चित झाली होती. थोडा विसावा घेवुन मग जोमाने तैयारी सुरु करण्याची मानसिकता तैयार झाली होती. तसे त्याच्या मधे जडत्व पण निर्मान झाले होते. काही महिण्याच्या अंतरा नंतरच कार्यालयाने त्याला एका विशेष प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठविले होते. दिल्ली वरुन परतल्या नंतर त्याची बदली दुस-या राज्यात एका अधीनस्थ कार्यालयत करण्यात आली होती. आता त्याच्या जवळ विशेष विकल्प उरले नव्हते. नौकरी सोडुन अन्य स्पर्धा परिक्षेची तैयारी करने हे काही शाहानपनाचे लक्षण नव्हते. तेव्हा पण शिकलेल्या तरुणांना नौकरी मिळने एक दिव्य स्वप्नच होते. तेव्हाच्या आणी आताच्या परिस्थितित फारसा बदल घडलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांने नविन ठिकानी बदली वर जाण्याचा निर्धार केला होता.पण त्याला आपली चूक लक्षात आली होती. जो थांबला तो संपला याची जाण त्याला झाली होती. 

       मुलगा तसा आता वयात आला होता म्हणुन त्याचे लग्न करुण दिले पाहिजे असा विचार त्याच्या आई-वडिलांनी केला होता. एकटा मुलगा दुस-या राज्यात इतक्या दूर ठिकानी एकटा कसा राहिल याची चिंता आई-वडिलांना सारखी भेडसावत होती. मुलाने पण आई-वडिलांच्या विचारांशी सहमती दाखवली होती. आता तो नविन ठिकानी कार्यालींयन कामा सोबत घर संसारात पण व्यस्त झाला होता. आता त्याच्या वर परिवाराची अतिरिक्त जवाबदारी पडली होती. तरी ही त्याने विभागीय स्पर्धा परिक्षा पास करुन पुढची बढती वेळेच्या खुपच आधी मिळवली होती. आता तो दुस-या ठिकानी बढती वर गेला होता. बदली होने ही काही विशेष विलक्षण बाब त्यासाठी उरली नव्हती. आता त्याला पहिले सारखी धास्ती पण बसत नव्हती. जशी मृत्युच्या मुखातुन वापस आलेल्या मनुष्याला मरणाची कधीच भिति वाटत नाही. तोच प्रकार त्याच्या सोबत बदली विषयी झाला होता.

     अनेक असेच उन्हाळे-पावसाळे पाहिल्या नंतर अशी मानसिकता तैयार झाली होती कि संपूर्ण देश आपालाच आहे. कुठेही राहिल तरी विशेष फरक पडत नव्हता.आता आपल्या मातीची ओढ हळु-हळु कमी- कमी होत चालली होती. अचानक उंटाने कड घेतला होता. त्याच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली होती. त्याला पदोन्नोतिवर नागपुरला तैनाती मिळाली होती. कदाचित बारा वर्षांचे तप संपले होते. संपूर्ण परिवारचा आनंद गगणात मावेनासा झाला होता.जुनी ती उर्जा संपूर्ण एकजुटुन रक्तात संचार करु लागली होती. तो ब-याच काळानंतर आपल्या माय प्रदेशाला आपल्या जन्मगांवाच्या जवळ –पास आला होत.

      नागपुरला आल्यानंतर त्याची तैनाती मौसम पूर्वानुमान अनुभागात मधे झाली होती. तीथे तो आता फार रुची आणी मनापासुन कार्य करित होता. त्याचा होतकरुपना आणी कामा विषयची जिद्द आणी समर्पण पाहुन बॉसने त्याला एक महत्वपूर्ण आनी संवेदनशिल सीट दिली होती. ताचा आणी बॉसचा आता जास्त संपर्क येने सुरु झाले होते. हळू-हळू त्यांचे विचार आणी मन एक-मेकाशी जुळु लागले होते. बॉस संपूर्ण मध्यावर्ती भारताचा प्रमुख मौसम पूर्वानुमानकर्ता होता. त्यामुळे त्यांची मौसम संबंधी माहिती घेण्यासाठी बहुतेक मीडियाकर्मि आणी पत्रकार नहेमची साक्षात्कारासाठी कार्यालयात येत होते. त्यामुळे त्या अधिका-याची ओळख पण त्यांच्या सोबत चांगलीच झाली होती. बॉसच्या बाईट साठी लागणारी आवश्यक तेवढी हवामानाची माहिती जमा करुण बॉसला देने हे काम त्याच्या कडे होते. बाईट होण्यापूर्वी बॉस सोबत नेहमिच सखोल चर्चा होत होती. यामधे त्याला क्षात्काराच्या अनेक बारिक-बारिक सुचना शिकायला मिळत होत्या. बहुतेक वेळेस बॉसची बाईट चालु असतांना तो तीथेच उपस्थित राहत होता. त्यामुळे बॉस मीडिया कर्मिंना कसे हाताळतात याची जाण त्याला होत होती. बॉसच्या संपर्कात राहुण तो मौसम संबंधी साक्षात्कारशी चिर-परिचित झाला होता. हे सर्व काही कार्यालियन दिवसात होत होते. पण मीडिया कर्मिनां माहिती होते की मौसम कार्यालयाची सेवायें ही रात्र-दिवस सुरु असते.

    अचानक एके दिवसी बॉसला आठवडा शेवटी म्हणजे रविवारी महत्वपूर्ण घरघुती काम आले होते. नेहमीच्या सवई प्रमाने ते शनिवार-रविवारी सकाळी लवकर येवुन आपले मौसम पूर्वानुमानाचे महत्वपूर्ण कार्य करुन निघुन जात होते. बॉसला अधिकृत अशी कोनचीच सुट्टी राहत नव्हती. त्या रविवारी पण ते आपले कार्य करुन निघुन गेले होते. अचानक कर्तव्य अधिका-याला दुपारी फोन आला होता. काही मीडियाकर्मि बॉसचा बदलत्या मौसम संबंधी बाईट घ्यावयाची होती. येण्याची वेळ मीडिया कर्मिंनी दिली होते. नियमा प्रमाने कर्तव्य अधिका-याने बॉसला तशि सुचना दिली होती. बॉस आता सापळ्यात सापडला होता. तो बाहेर असल्यामुळे येने शक्यच नव्हते. म्हणुन त्यांनी त्या अधिका-याला विचर-पुस केली होती कि अजुन कोणचे अधिकारी कार्यालयत उपस्थित होते. तेव्हा त्याने साहेबांच्या गूड-बूक मधील अधिका-याची माहिती दिली होती. साहेबांनी त्याला संबंधीत अधिका-याला फोन करण्यासाठी सांगितले होते. संबंधीत अधिका-याने लगेच साहेबांना फोन केला होता. तेव्हा त्यांनी त्याला महत्व पूर्ण काही सुचना दिल्या होत्या आणी बाईट देण्याचा मौखिक आदेश दिला होता. कदाचित त्यांनी मीडिया कर्मिंना तशा सुचना पण केल्या असाव्यात. ठरलेल्या वेळे वर सर्व मीडियाकर्मि कार्यालयात दाखल झाले होते. ते सर्व त्या अधिका-याची विचार-पुस करित होते. त्या अधिका-याने पहिलेच आपली पूर्व तैयारी केली होती. अक्षरशः तो आतुन फार घाबरला होता. तो बॉसला नाही म्हणु शकला नाही. पण तेव्हा पासुनच त्याचे हात-पाय लट-लट कापत होते. त्याने मोठ्या हिम्मतेने स्वतःला स्थिरावले होते. आलेया भोगाशी असावे सादर म्हणुन मोठ्या हिम्मतेने मीडिया कर्मिशी औपचारिकता निभवत होता. आता बाईट देण्यापूर्वी त्याने त्यांना संबंधीत प्रश्नाची प्रश्नावली मागितली होती. तीला एक दा बघितल्या वर तो स्वतःला म्हणलां बाजारात तुरी आणी भट भटनीला मारी. घाबरण्या सारखे काहीच हे विचारनार नाही आहेत. त्याने त्यांना बाईट देने सुरु केले होते. उपस्थित अन्य अधिकारी व अधिनस्थ कर्मचारी मोठ्या उत्सुकतेने त्याला बघित होते. तो एक-मागुन एक अशा सर्व प्रश्नांची सटिक आणी चौख उत्तरे देत होता. त्याचा आत्मविश्वास आणी क्षमता बघुन मीडिया कर्मिंनी त्यांना नेहमी भेडसावनारे किरकोळ प्रश्न पण विचारु लागले होते. त्या सर्व प्रश्नांची तो समाधानकारक उत्तरे देत होता. बाईट संपल्यावर त्यांनी त्या अधिका-याला धन्यवाद दिला होता आणी ते निघुन गेले होते. त्यांना हा अधिकारी पहिल्यांदाच बाईट देत आहे याची त्यांना भनक पण लागली नव्हती. त्यांना असे वाटले की बॉस च्या अनुपस्थिति मधे त्याला ती कार्यालयाने जवाबदारी दिली असावी. कार्यालयातिल कर्मचा-यांनी पण त्याचे चांगले, व्यवस्थित आणी सटिक बाईट दिल्या बद्द्ल खुप प्रशंसा केली होती. आता तो स्वप्न पाहु लागला होता. आज मी बॉस सारखा सर्व टेलीविजन वर दिसणार ! . मला अनेक दूर-दर्शनचे दर्शक बघतिल !. आज मला माझे जुने-पुराने मित्र, नाते-वाईक व गांवातील गांवकरी पण बघतिल याची कल्पना करुण लागला होता. तशे तो हवेत कागजी घोडे मनतल्या मनात उडवत होता.

   संध्याकाळी अचानक बॉसचा फोन आला होता. भिती मुळे तो फोन उचण्यासाठी मागे-पुढे पाहत होता. त्याच्या डोक्यात एकच विचार सारखा घोळ घालत होता. जर त्याने काही चुकीचे सांगितले असेल तर मीडियाकर्मि त्याच्या बॉस आणी कार्यालयाची घोर निंदा केल्या शिवाय सोडणर नाही. त्याचे काही चुकले म्हणुन तर बॉसने फोन केला तर नाही ना ?. मोठी हिम्मत करुन त्याने फोन उचलला होता. हॅल्लो म्हणतांच बॉसने छान, झकास साक्षात्कार दिल्या बद्द्ल मनपूर्वक त्याचे अभिनंदन केले होते. तो साहेबांनी केलेल्या अभिनंदानामुळे भारावुन गेला होता. तो स्वतःशी विचार करु लागला होता जर आज मी हिम्मत दाखवली नसती तर हे आनंदाचे क्षण त्याच्या पदरी कधीच पडले नसते. त्याने त्याचा साक्षात्कार आपल्या मुलांना व अर्धांगीणीला पण टी, वि सुरु करुन दाखवला होता . मुलांना आपले बाबा टी. वि. स्टार झाल्याचा अभिमान वाटत होता. जी बायको आपल्या नव-याला जगातील सर्वात निक्कमा मानव समजत होती. ती पण त्या प्रसंगामुळे भारावुन गेली होती. गांवातील परिचित मित्र-मंडळीला आणी गांवक-यांना पण खुप गौरव वाटला होता. त्यांच्या समोर बोलतांना नेहमी तो नाकातुन सारखा शेमबुड पुसत होता. आणी टी.वि. वर एखादया भाषणकर्ता सारखा ठण-ठणीत बोलत होता. मुलाने आपल्या गांवच्या मातीची किंमत वाढवली याचा त्यांना अभिमान वाटत होता. त्या दिवशी जर त्याने पायवाट काढली असती तर तो बॉसच्या नजरेतुन तर उतरला असताच आणी जो गौरव त्याचा वाढला त्याला पण वंचित झाला असता !. मिळलेली संधी कधी पण हातुन जाऊ देवु नये. मिळालेल्या संधीचे मोठ भांडवल करता येईल तीतके करावे !.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action