Jyoti Dharap

Children

4.0  

Jyoti Dharap

Children

परी

परी

4 mins
322


 छोट्या स्वप्नालीला आजी रोज झोपताना गोष्ट सांगायची. गोष्ट ऐकल्या शिवाय ती झोपायचीच नाही

  एकदा तीन वर्षाच्या स्वप्नालीला आजी परीची गोष्ट सांगत होती. स्वप्नाली अगदी झोपेला आली होती. झोपता झोपता स्वप्नालीने आजीला विचारल,

'अग, आजी परी मला भेटेल का ग?'

आजी मजेत म्हणाली,' हो. तू झोप आता लवकर. मग परी तुला भेटेल.'

    स्वप्नालीचे डोळे अगदी मिटत होते नि आजीचे शब्द तिच्या कानावर पडले. नि बघता बघता एक परी उडत उडत स्वप्नालीच्या पुढ्यात हजर झाली. अगदी आजी गोष्टीत वर्णन करायची, टी.व्ही. वर बघितली होती तशीच... पांढरा फ्रिलचा झगा. दोन पंख. दिसायला एकदम छान. 

  स्वप्नालीला परीला बघुन खूप आनंद झाला. तिने टाळ्या वाजवत विचारल, 'परी तू मला भेटायला आलीस. कित्ती छान! '

  परी म्हणाली,' स्वप्नाली, तुझी काय फर्माइश आहे ती सांग.'

त्यावर स्वप्नाली म्हणाली,' मला तुझ्या पाठीवर बसवुन मस्त आकाशात भरारी मारायचेय.'

 परीने स्वप्नालीला पाठीवर घेतली नि आकाशात भरारी घेतली. स्वप्नालीला खूप आनंद झाला. वर वर जायला लागल्यावर पृथ्वीवरील झाड,घर सगळं छोट छोट बघायला स्वप्नालीला गंमत वाटत होती. आपण पण पक्षांसारखेच आकाशात भरारी घेतोय असं तिला वाटलं. चंद्र, चांदण्या एकदम जवळच आहेत असं वाटल. खाली येता येता स्वप्नाली परीला म्हणाली आम्हाला शाळेत चाॅकलेटच्या बंगल्याच गाणं शिकवलय तसा मला चाॅकलेटचा बंगला दाखवशील का ? परी उडत उडत स्वप्नालीला एका बंगल्या जवळ घेऊन आली. चाॅकलेटचा बंगला बघुन तिचं भानच हरपल. किटकॅट, डेरी मिल्क, फाईव्ह स्टार कॅडबरींच्या भिंती होत्या. टाॅफीचे दार होते.बाॅर्न ,बाॅर्न सारख्या, क्रिमच्या बिस्किटांच्या खिडक्या होत्या. जेम्सच्या गोळ्यांचे आतमधे ढीग होते. चाॅकलेटच्या राशी होत्या. परीने स्वप्नालीला सांगितल की तुला पाहिजे तेवढ्या कॅटबरी, चाॅकलेट, बिस्किटं घे. स्वप्नाली म्हणाली ,'मला जास्त नको. जास्त चाॅकलेटं, बिस्किटे खाऊन दात किडतात, पोटं बिघडतं .म्हणून मी थोडचं घेते मला.'

  चाॅकलेटचा बंगला बघुन झाल्यावर परी स्वप्नालीला खाली घेऊन आली. खाली आल्यावर परीने विचारल,' आता काय करायचय तुला?'

स्वप्नाली म्हणाली,' मला सिंड्रेला बनायचय.'

परीने सांगितल, 'डोळे मिट.' स्वप्नालीने डोळे मिटल्यावर परीने टाळी वाजवली नि तिला डोळे उघडायला सांगितले. डोळे उघडल्यावर परीने स्वप्नालीला आरशात बघायला सांगितल. स्वप्नाली आश्चर्य चकित झाली. छान सिंड्रेला सारखा ड्रेस, पायात बुट. स्वप्नाली खूपच छान दिसत होती. ती सिंड्रेला बनुन बागडू लागली. परीने विचारल, 'सिंड्रेलाच्या गोष्टीतल्या सारख्या राजकुमाराला तुला भेटायला जायचय का ?'

त्यावर परी लाजुन म्हणाली,' मी किती लहान आहे. सिंड्रेलाच्या गोष्टीत एक परी येऊन तिचं रुप बदलायचीना. त्याची आठवण झाली म्हणून सांगितल. आवडल हे रुप मला. पण आता मला पहिल्यासारख स्वप्नालीच बनव.'

त्या बरोबर परीने पल्लवीला तिच्या मुळ रुपात आणलं आणि विचारल पुढची फर्माइश सांग. 

  स्वप्नालीने सांगितल की सोन्याच अंड देणारी कोंबडी मला दाखवशील का ? पण तिला तर अति लोभाने त्या माणसाने कापुन टाकलं होतं ना? 

परी म्हणाली,' मी तुला दुसरी सोन्याच अंड देणारी कोंबडी दाखवते.'

लगेचच सोन्याचं अंड देणारी कोंबडी पुढे आली. 

परीने स्वप्नालीला विचारल,' तुला सोन्याची किती अंडी हव्येत?'

स्वप्नालीने सांगितल, ' एक मला, आईला एक, बाबांना एक आणि आजीला एक.'

परीने कोंबडीला चार सोन्याची अंडी द्यायला सांगितल.मग कोंबडीने तिला चार सोन्याची अंडी दिली.

स्वप्नाली म्हणाली,'अति मोह चांगला नाही. मला एवढीच सोन्याची अंडी बास. आता या कोंबडीला जाऊ दे.'

त्यावर परीने कोंबडीला गायब केलं.  

  स्वप्नालीने सांगितल, ' परी, मिडास राजासारखं 'हात लावीन तिथे सोने' हा वर मला मिळवुन देशील का ? कोरोनामुळे माझ्या बाबांची कंपनी बंद पडलेय. आई, बाबा, आजीला खूप टेन्शन आहे. आता आमच्या कडचे पैसे पण संपत आलेत. मग मला थोड्या गोष्टी सोन्याच्या मिळाल्या तर आमच्या घरचे सगळे खुश होतील. ते विकुन आम्हाला पैसे मिळतील. '

परी म्हणाली ,' हो.डोळे बंद कर.'

मग परीने टाळी वाजवली आणि स्वप्नालीला डोळे उघडायला सांगितले. 

स्वप्नालीने प्रथम तिच्या गळ्यातील मोत्याच्या माळेला हात लावला. लगेच ती माळ सोन्याची झाली.मग तिने हातातल्या बांगड्यांना, पायातल्या पैंजणांना हात लावला. ते पण सोन्याच झालं. स्वप्नालीला खूप आनंद झाला. पण आजीने सांगितलेली मिडास राजाची गोष्ट तिला आठवली. अति लोभ केल्याने त्याची मुलगी पण सोन्याची झाली नि मग त्याला पश्चाताप झाला. ते आठवुन स्वप्नाली घाबरली नि ओरडू लागली ,'नको,नको मला हा वर नको. मला माझी आई, बाबा ,आजी हवेत. '

परी म्हणाली ठीक आहे. घाबरु नकोस. तुझे आई,बाबा, आजी सोन्याचे होणार नाहीत. 

मग स्वप्नाली परीला म्हणाली,' परी, आम्ही कोरानाने सगळे हैराण झालोय. शाळा बंद.कुठे जाता येतं नाही. कित्येक जणांचे नातेवाईक बाप्पा कडे गेले. कित्येक जणांच्या नोक-या गेल्या. काही जणांना पोटभर जेवायला पण मिळतं नाही. तर तू गोष्टीतल्या सारखा एखादा राक्षस आण ना. त्याला सगळे कोरोनाचे विषाणूच मारुन टाकायला सांग. '

परीने टाळी वाजवली. एक अक्राळ विक्राळ राक्षस पुढ्यात आला. तो राक्षस बघुन स्वप्नाली घाबरली. ती किंचाळून म्हणाली ,'नको, हा राक्षस आम्हाला पण मारेल. नको ह्याला गायब कर.'

स्वप्नालीचं असं बडबडण ऐकुन तिच्या आजीने तिला हलवल नि म्हणाली ,' स्वप्नाली, अग जागी हो. काय झालं? काय हे बडबडतेस ?'

आजीचा आवाज ऐकून स्वप्नाली जागी झाली. बघतेय तर ती गादीत झोपलेली होती. मग तिला कळल की आपल्याला स्वप्न पडलं होतं. हसत हसत तिने आजीला परी बरोबरची सगळी गंमत सांगितली.

  आजी ऐकुन खुश झाली.तिने स्वप्नालीला शाबासकी दिली आणि म्हणाली, 'तुला सांगितलेल्या गोष्टी तू लक्षात ठेवतेसचं. शिवाय तुला कथेतन काय बोध घ्यायचा ते कळलय. लोभाचे फळ वाईट असते हे तू लक्षात ठेवलस. ' असं म्हणत आजीने स्वप्नालीला जवळ घेऊन तिची गोड पप्पी घेतली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children