STORYMIRROR

komal Dagade.

Abstract Tragedy Inspirational

3  

komal Dagade.

Abstract Tragedy Inspirational

पितृपक्ष...

पितृपक्ष...

3 mins
381

            रतन आणि मारुतीचा संसार कष्टातून उभा राहिला होता. रतनला दोन सुना आल्या.घर भरलं गोकुळ झाल,पण हे सुख तिच्या कमीच नशिबी होतं. कारण दोन्ही सुनांचा होणारा वादविवाद पाहून दोघीनाही रतनेने वेगळ्या चुली मांडून दिल्या . थोरली सून जरा जास्तच आगाऊ होती.तिने ठणकावून सांगून टाकले, मी सासू -सासऱ्याचे करणार नाही. रतन आणि तिचा नवरा धाकट्या सुनेकडे राहू लागले.


धाकटी सून सासुसासऱ्यांसाठी करायची पण तेही नाकीनऊ आल्याप्रमाणेच.रतनाला हे समजत होतं,पण हात पाय थकले असल्याने तिच्याकडे पर्याय ही कोणता नव्हता....!


मारुतीला चहाची खूप आवड पण चहाचा कप देईलाही सु्नांना नको होई. एकदा तर थोरलीच्या घरी तिच्या माहेरकडून पाहुणे आले त्यांना तिने सर्व हसमुख केलं, पण बाहेर बसलेल्या म्हताऱ्या सासऱ्याच्या डोळ्यासमोर शिल्लक राहिलेला चहाचा कप ओतून देताना तिचं मन जराही धिजलं नाही.


रतन आणि मारुती एकमेकांकडे बघून दिवस काढत होतें. जे घर कष्टाने उभे केले त्याच घरात पाहुणे म्हणून वावरू लागले. तरीही म्हातारपणी दिवस घालवण्यासाठी शेतामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली.


रतनचा आज संकष्टीचा उपवास होता. स्वयंपाकघरात पाहतेय तर उपवासाचा काहीच सुनेने केलं नव्हतं. शेवटी रतनेने उपवासाचा फराळ तळायला घेतला, तर तिच्या थरथरत्या हाताने तेल सर्वत्र सांडलं. ते बघताच सुनबाईंचा पारा चढला नाही तशी म्हातारीची खरडपटी सुनेने काढली. एवढं बोलून ती थांबली नाही तर,दोघांना नवऱ्यासमोर वृद्धाश्रमाची पायरी चढायला सांगितली . रतन च्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. हे दिवस बघण्यासाठी मुलांना जन्म दिला काय आपण...? असा स्वतःच्याच मनाला प्रश्न ती करत होती...?


दोघंही अपराधीपणाने जगत होतें. मुलांच्या तोंडून मात्र आईवडिलांवर होणारा अन्याय दिसत नव्हता. अशा मुलांना जन्माला घातल्याचा पच्छाताप दोघांच्याही नजरेतुन दिसत होता.


सकाळचे नऊ वाजत आले होतें. मारुतीला अजूनच जाग आली नव्हती. रतन उठवण्यासाठी गेली.


रतन, " आहो उठा सकाळचे नऊ वाजून गेलेत... एवढा उशीर झोपून राहिलात शेतात जायचं नाही का...??


रतन शेजारी बसून मारुतीला आरोळी देऊन जागं करत होती, पण मारूती मात्र उठण्याचं नावंच घेत नव्हता.


रतनेने अंगाला हात लावला तर शरीर थंड पडले होतें. ताट झालेले शरीर हालतही नव्हते. श्वास पहिला तर थांबला होता. रतने ने घाबरून पोरांना बोलावले.


डॉक्टर आले त्यांनी चेक करून पाहिले तर He is no more. असे शब्द सगळ्यांच्या कानावर पडले. रतन पोरांना विचारात होती. " अरे डॉक्टर काय म्हणाले....??" मला सांगा. तर एकाने सांगितलं आई बाबा नाही राहिले गं... ते हे जग सोडून गेले आहेत . त्यांना झोपेतच सायलेंट अटॅक आला. हे ऐकताच रतनला धक्का सहन न झाल्याने तिचीही प्राणज्योत मालवली. तीही तिच्या नवऱ्याबरोबर शेवटच्या प्रवासाला निघून गेली. त्याला एकटं न सोडण्याकरिता....!!


दोघांच्या जाण्याने घरामध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. म्हतारपण असलं तरी घराचं मोठं आधारवड होतं हे दोन्ही सु्नांना गेल्यावरच समजलं. दोघींच्या डोळ्यात अश्रू होतें पण नक्की दुःखाचे की सुखाचे कोणालाही समजत नव्हतं.

10 वर्षाचा अनय येऊन म्हणाला, "आईबाबा तुम्ही खूप वाईट वागला आजी आजोबांशी....!! मी ही तुमच्याही असच वागलं तर चालेल ना....!!


दोघे नवरा बायको एकमेकांकडे आवाक होऊन बघत राहिले. अनय च्या आईला तर हुंदका आल्याशिवाय राहिला नाही. आता पण रडून काहीच उपयोग नव्हता. वेळ माफीची आणि पच्छातापाची दोन्ही निघून गेली होती.


वर्ष सरत होतं. पितृपंधरवडा सुरु झाला. दोन्ही सुना एकत्रित जेवण बनवत होत्या. अगदी त्यांना सासुसासऱ्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ आठवत होतें. तेही त्या अगदी आनंदात करत होत्या. केळाची पाने आली. दोघांच्या फोटोला हार लावला. पूजा झाली.


दोघी सुनांनी सासुसासर्यांना हात जोडले. केळाच्या पानावर पदार्थांची अंगत पंगत सजली होती.दोघीही अगदी मन लावून देवाघरी गेलेल्या सासुसासऱ्यांसाठी करत होत्या. केळाच्या पानावर पुरणपोळी, आमटी, वरण- भात, भजी, पापड, भाज्यांचे विविध प्रकार, खीर,वरणावरून रेघळणारे तुपाचा खमखमाट सुटला होता. ताटामध्ये अक्षरशा जागा राहिली नव्हती. एवढे पदार्थ दोघीनी केले होतें. सासर्यांना लागणारा चहाचा कप आवर्जून ठेवण्यात आला.


दोघांच्या फोटोच्या समोर नानाविध पदार्थांनी भरलेले ताट ठेवले होतें. त्यानंतर कावळ्याला बोलवून घास देण्यात आला. हात जोडले.


हे खूप उशीर अनय पाहत होता. शांत असणारा अनय बोललाच, " तुम्ही हे सगळं जिवंतपणी केलं असतं तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच समाधान मिळालं असतं....!! आज तुम्ही एवढं त्यांच्यासाठी केलंय पण ते बघायला आणि खायलाही नाहीत. तुमच्यासारखे दुर्दैवी माणसं मी अजून पहिली नाहीत. जीवनपणी हे सुख दिलं असतं तर ते सुख-समाधानाने आणि चांगले आशीर्वाद देऊन गेले असते.


"काय चुकीचं बोलत होता अनय...? जिवंतपणी कधीही त्यांची कदर केली नाही, आणि मेल्यावर एवढं करून काय उपयोग...? मेल्यावर आत्म्याला तृप्त करण्यापेक्षा जीवनपणी चार घास देऊन चांगला आशीर्वाद घेतलेला कधीही चांगला...!! त्यामुळे जीवनपणी वृद्ध लोकांची किंमत केली पाहिजे. मेल्यावर तर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येत. म्हातारपण अडगळ समजू नका तर आधारवड म्हणून बघा. कारण तुम्ही कसा वागता त्यावरून देव तुम्हाला परडफेड करतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract