पितर गांव
पितर गांव
उन्हाळ्याचे दिवस, त्यात तो मे महिना आणी संत्रा नगरितील दुपारचे गरम तापत्या हवेचे लपटे घेत मी न टाळत्या येणारे काही अनिवार्य कार्या साठी बाहेर गेलो होते.काम इतके आवश्यक आणी महत्वपूर्ण होते कि त्यासाठी मी एक दिवसाची रजा घेतली होती. जीवापार परिश्रम व धक्के खात–खात काम पूर्ण केले होते. जरी काम करण्यात यश मिळाले होते. तरी त्याचा आनंद या उनेच्या तडाकामुळे मावळला होता. घरी आल्यावर थोडा आराम करण्यासाठी पंखा लावुन बसलो कि श्रीमती ने जेवन करण्यासाठी बोलावले होते. गृहमंत्र्यांचा आदेश आणी अन्नाला पाठ दाखवु नये म्हणुन इच्छा नसतांनाही कसे- बसे दोन घास घेवुन जेवन आटपले होते. थकुन चुर-चुर झालेले शरिर आता आराम केला पाहिजे असे सारखे संकेत देत होते. दुष्काळात तेरावा महिना. बेड वर पडण्याच्या बेतातच होतो कि तितक्यातच दाराची घंटी वाजली होती. मन म्हणतं होते अरे ऐवढया उन्हात आता भर दुपारी कुठला पाहुंना येवुन ठेपला आहे. हे बघाण्यासाठी दार उघडले होते. समोर खाकी वर्दित पोस्टमॅन काका दिसले होते. मला बरेच दिवसानंतर बघुन त्यांची मसकरी करण्याची इच्छा झाली होती. ते म्हणाले उन फार आहे. म्हणुन सुट्टी वर आहेत वाटते साहेब. नाही ,मला आज एक अत्यंत महत्वाचे जीवन विमा कार्यालया मधे काम होते. म्हणुन सुट्टी घेतली होती. आताच तुझा समोरच घरी परतलो होतो. तीतक्यातच त्यांनी मला एक लग्नाची निमंत्रन पत्रिका हाती दिली होती. आणी गमंत करत म्हणाला सासर कडील पत्रिका दिसते. आली खर्च करण्याची वेळ. मी त्यावर सहज गंमतीने उत्तर देत म्हणालो. असल्या पत्रिकांची डाक आण्या पेक्षा काही धनादेश वैगरीची डाग आणावी !. त्या वर तो भाष्य करित म्हणाला साहेब जीवन विमा पॉलिसीचे धनादेश मीच तर आणतं असतो !. तो हसतं- हसतं निघुन गेला होता.मी इच्छा नसतांनाही पत्रिका उघडुन बघितली होती. माझ्या पितर गांवा वरुन एका जवळच्या पुतन्याची लग्नाची पत्रिका आली होती. त्या परिवाराची परिस्थिति म्हणजे खायला कोंडा अन झोपायला धोंडा अशीच होती. तरी काकांना मान देण्यासाठी आठवणीने त्याने पत्रिका पाठवली होती. जरी त्याने काही आर्थीक मदत मागितली नव्हती तरी त्याला काही मदत अपेक्षीत होती. आपण काही तरी मदत केली पाहिजे असे मन म्हणतं होते.पत्रिका वाचत-वाचता व मनात उठलेले मदतीच्या वादळामुळे माझे थकलेले डोळे हळु-हळु, छोटे-छोटे होत चालले होते. नेमेचि येतो मग पावसाळा, आणी पूर्वजांच्या आठवणी करता-करता मी गाढ झोपत स्वप्न बघु लागलो होतो.
मी नौकरी लागण्या पूर्वी वडिल हयात असतांना कधी-कधी वडिलांन सोबत वाडवडिलांच्या गांवी जात होतो. वडिल आणी अन्य नातेवाईक नेहमी सांगत होते की हेच आपल्या पूर्वजांचे गांव आहे. इथेच आपल्या वंशाचे वटवृक्ष उभे झाले होते. त्यांच्या अनेक शाखा बदलत्या परिस्थितिनुसार इकडे-तिकडे पसरल्या आहेत. हे सगळे प्रसंग एका मागे एक असे सारखे धावत होते. मी माझ्या लग्नानंतर एक वेळा आपल्या पूर्वजांचा गांवी गेलो होतो. जेव्हा मी माझ्या गांवाच्या सरहद्दित शिरलो होतो. तेव्हा त्या मातीचा सुगंध मला सारखा भास करित होता कि माझी नाळ ही या मातीशी जुळली आहे. याच धुंधीत मी सारखा गांवा कडे ओढला जात होतो. चालता –चालता मला जो-याने एक ठेस लागली होती. माझा तोल गेला होता.स्वतःच कसा-बसा मी तोल सांभाळला होता. तोच मला एका वृध्द आजोबांचा आवाज ऐकु आला होता. लहान पाटिल हे गांव आहे. इथे मुलायम सडका शहरा सारख्या नसतात , जरा सांभाळुन चाला. त्या वृध्द आजोबांनी मला ओळखले होते. त्यांना पाहुन मला पण थोडी-थोडी त्यांची ओळख पटु लागली होती. मी त्यांना प्रश्न केला कि गांवात सगळ काही ठिक-ठाक आहे ना आजोबा ?. ते म्हणाले गांवात काही अजुन दुसरा पर्याय थोडी असतो !. जे काही निसर्गाने दिले असते त्यातच भागवावे लागते. जे आहे, त्यातच समाधान मानावे लागते. आमच्या पूर्व जन्माची कमाई असे समजा आणी आनंदाने जीवन जगा हाच गांवाल्यांचा गुरु मंत्र आहे.शेती मधील खरिप पिक निघाले की आम्ही बस, काम न धाम अन भुईला भारच असतो. गांवात काही अजुन पैशे कमवण्याचे साधन नसते.
मी आजोबांना विचारले की आमची शेती कुठे आहे. ते म्हणाले लहान पाटिल जीथे तुम्हाला ठेच लागली तिथुनच तुम्हच्या पूर्वजांची शेति सुरु होते. त्यांना मी पीक- पाण्या बद्दल विचारले होते. ते म्हणाले सर्व काही निसर्गावर अवलंबुन असते.चांगला पाउस-पाणी वेळवर आला तर पिके साधतात. नाही तर दुबार पेरणी करु-करु नाकी नव येतात. व शेतक-याचे अष्टकोणी वाटोळे होते. कर्ज घेवुन दुबार पेरणी केल्यावर ही धोका सारखा नेहमीच असतो. ऐवढे करुन ही शेति साधली तर नंतर पुराचा व अतिवृष्टिचा तडका आहेच !. याच्यातुन समजा कधी-काळी निसटलो, तर मग रोग –राईचा प्रादुर्भाव. कसी-बसी पिके ऐवढे करुन उभी राहली की मग गारपीटाचा मारा. घरचे झाले थोडे अन व्यहांनी पाठवले घोडे. शेतक-याला एक सारख्या नैसर्गिक घटनांचा मारा बसतच असतो !.
ऐवढ्या संकटातुन शेवटी जे काही अरजले की मधे दलाल असतोच !.किंवा सगळ्यांना चांगलं पिकिच साल पडले की भाव नाही. ऐवढे करुन हाती काही लागले तर सावकार आणी बैंकेची देनदारी. याच्यातुनही काही गवसले की वाड्यांची मरमत्त आनी मुला-मुलींचे लग्न असं सारख राहट-गाडग चालुचं राहणार !. गांवक-याची व्यथा, पावसाने भिजलेली अन नवर्याने झोडपलेली तर सांगनार कोणाला बाई सारखी नेहमीच असते.
हे सर्व चित्र माझ्या समोरुन सारखे धावत होते. तितक्यातचं माझ्या श्रीमतीचा अजुन झोप झाली नाही कां ?. किती वेळ अजुन झोपुन राहणार आहेत. चला उठा, चाहा आणला आहे. हे ऐकताच माझी झोप-मोड झाली. व मी उठुन अंथरुना वर बसलो.माझ्या पत्निने चाहाचा कप समोर केला होता. आणी आदेश पण दिला होता. चाहा घेतल्या बर तुम्हाला सांगितलेल्या वस्तु आणी काम आजच करुन टाका. नंतर तुम्हाला वेळ नसतो.सुट्टीचा सदोपयोग करा. हे सांगुन ती निघुन गेली होती. पण पत्रिका बघुन माझा मनात एक लालसा उत्पन्न झाली होती कि सर्व कुटुंब मिळुन एक्दा तरी वाडवडिलांचा गांवाला पुतण्याच्या लग्नाला जावुन येवू !.
