Sanjay Phadtare

Children

3  

Sanjay Phadtare

Children

पहिलं वहिलं घड्याळ

पहिलं वहिलं घड्याळ

2 mins
239


अशोकदादा माझ्या पेक्षा अभ्यासात हुशार.त्याच्या सातवीच्या प्राथमिक बोर्डाच्या परीक्षेपूर्वी वडिलांनी त्याला १९७२ मध्ये सेकंड हँड घड्याळ घेऊन दिले होते.

   मी मात्र अभ्यासात साधारण गडी होतो.त्यामुळे परीक्षेवरून परत आल्यावर मला विचारले जायचे,"आज तुझे किती प्रश्न सोडवायचे राहिले"? माझे २ किंवा ३ प्रश्न हमखास राहिलेले असायचे. त्यावेळी, मी उत्तर येत नव्हते असे म्हणण्यापेक्षा वेळच पूरला नाही असे म्हणायचो.यासर्व बाबी विचारात घेऊन ना मी कधी घड्याळ मागायचा हट्ट केला,ना मला घड्याळ मिळाले.

   अशा रीतीने मी बिन-घड्याळाची दहावी,बारावी बोर्डपरीक्षा पुरी केली.तद्नंतर केवळ मित्रानी फॉर्म भरले म्हणून मीही कृषी महाविद्यालयाचा फॉर्म भरला.माझ्या सुदैवाने कोल्हापूर येथेच प्रवेश मिळाला. माझे सर्वात लहान काका पै.विष्णू फडतारे हे मोतीबाग तालमीत पहिलवानकी करीत होते.त्याकाळी त्यानी सातारा,सांगली,कोल्हापूर, कर्नाटकातील बरीच कुस्ती मैदाने गाजवलेली होती.खासबागच्या मैदानात तर मानाच्या सव्वा किलो चांदीच्या गदेसह 'कोल्हापूर केसरी'पदाची एक नंबरची कुस्ती त्यानी जिंकलेली होती.

   मी कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्यांना माझे फार कौतुक वाटायचे.कॉलेजच्या 'पालक दिनास' पहिलवान काकाच त्यांचे जोडीदार दोन पहिलवान मित्रासोबत हजर राहिले होते.

   काका कर्नाटकात १९८१ मध्ये कुस्त्यासाठी गेले होते.त्यांनी 'एचएमटी-अविनाश' हे निळ्या डायलचे घड्याळ बेंगलोर येथे माझ्या साठी खरेदी करून दिले.माझी तब्बेत एकदम लुकडी असल्याने घड्याळ स्टीलच्या पट्टात शेवटच्या कडीत बसवले तरी ते मनगटावर ओघळायचे.काकाकडून माझ्या अनपेक्षितपणे मिळालेले हे लाडाचं घड्याळ मी जीवापाड जपले.

     पदवीदान समारंभात मी डिग्रीसह एक कलर फोटो काढला होता.चि सौरभने अल्बम चाळताना त्या फोटोतील व सध्या माझे हातातील घड्याळ एकच असल्याचे ओळखले होते. मी कित्येक वर्ष हेच घडयाळ वापरत आहे याचं त्याला फार नवल वाटलं होते.

   काकांकडून मिळालेले 'पहिलं वहिलं' घड्याळ मी जिवापल्याड जपलं आहे.सकाळी आंघोळीनंतर सर्वप्रथम घड्याळास चावी दिली की ते त्याचे काम चोख बजावते.चि. सौरभला नोकरी लागल्यावर माझ्या परस्पर माझं घड्याळ जुने झाले म्हणून भारी घड्याळ घेतले.पण मी मात्र सध्याचे घड्याळ बिघडल्यावर घालीन म्हणत सेवानिवृत्त झालो तरी जुनेच लाडाचं घड्याळ माझे मनगटावर मिरवत आहे.विनातक्रार सोबत करणारे हे घड्याळ अचूक वेळ दाखवताना वेळोवेळी कै.काकांचीआठवण मात्र करून देते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Children