Sanjay Phadtare

Others

2  

Sanjay Phadtare

Others

नयनरम्य माथेरान

नयनरम्य माथेरान

1 min
29


  पुण्याहुन हमरस्त्याने शंभर किमी अंतरावर नेरळ रेल्वे स्टेशन आहे.तेथून २१ किमी चा प्रेक्षणीय प्रवास करत मिनी ट्रेनने माथेरानला पोहोचते.नेरळ रेल्वे स्टेशन नजीकच हॉटेल राही येथे चारचाकी पार्किंग व्यवस्था आहे.

   माथेरानचा शोध सन १८५० मध्ये तत्कालीन कलेक्टर ह्युम पोंटज मालेट यांनी लावला.तदनंतर अब्दुल हुसेन आदमजी पीरभाई यांनी १९०१ ते १९०७ या कालावधीत सुमारे ₹१६ लाखात या मिनी ट्रेनचे कामकाज पूर्ण केले.

   मिनी ट्रेनची क्षमता केवळ ९० शीट एवढी आहे. नेरळ येथून सकाळी ८.४० ला पहिली ट्रेन सुटते.पण या प्रवासाचे ऑनलाइन तिकीट सुविधा नसल्याने बुकिंग सकाळी ८ वा सुरु होते.प्रत्येकी केवळ चारच तिकिटे मिळतात. जनरल प्रवासास रु ९५/- फर्स्ट क्लास रु ३४०/- व वातानुकूलित व्हीस्टा डोम साठी रु ७५०/- प्रत्येकी असा तिकीट दर आहे.मुंबईहुन बहुसंख्य पर्यटक पहिल्या ट्रेनने सकाळी साडे सहालाच नेरळ येथे पोहचताच माथेरान तिकीटासाठी रांग लावतात.त्यामुळे तिकीटांचा कोटा चटकन संपतो. शनिवार,रविवारी नेरळहून साडे दहा वाजता एक जादा ट्रेन सोडली जाते.

   ट्रेन तिकीट न मिळाल्यास नेरळ येथून शेअर कारने प्रत्येकी शंभर रुपयात अमन लॉज पर्यंत व तेथून रिक्षाने माथेरानला पोहोचता येते.पण किमान जातांना मिनी ट्रेनचा प्रेक्षणीय प्रवास हा अनुभवायलाच हवा.नेरळ पासून ठराविक अंतराने झुम्मा पट्टी,वॉटर पाईप,दस्तुरी व अमन लॉज असा थांबा घेत अडीच तासात माथेरान नयनरम्य डूगुडुगु प्रवास संपतो.

   माथेरान दर्शन पायी किंवा घोड्यावरून करता येते.लेक,इको पॉईंट,लॉर्ड पॉईंट,किंग जॉर्ज पॉईंट, रामबाग अशा बऱ्याच स्थळांना भेट देऊन सायंकाळी ४ च्या ट्रेनने परतता येते;अन्यथा दस्तुरी येथून कारने परतत किमान एक दिवसाची सहल अनुभवता येते.


Rate this content
Log in