Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Mitesh Kadam

Abstract Tragedy Inspirational


4.2  

Mitesh Kadam

Abstract Tragedy Inspirational


नऊ महिने नऊ दिवस...

नऊ महिने नऊ दिवस...

5 mins 813 5 mins 813

आज पहिलाच दिवस आईच्या गर्भात असल्यासचा अनुभव झाला. बाहेरच जग कस असेल हे काही ठवून नाही पण हृदयाचे ठोका पहिल्यांदा धडकला. सुरवात झाली मृत्यूलोकात जन्माला येण्याची. बाबांना बातमी कळताच ते सुद्धा तितकेच आनंदी झाले. पण तो आनंद काही काळा पुरता असावा. कारण आई गरोदर राहिली की त्या आनंदा पेक्षा सर्वात मोठी चिंता लागते ती म्हणजे मुलगा होणार की मुलगी??? 

कारण मुलगी म्हटलं की परक्याच धन आणि मुलगा म्हटलं की वंशाचा दिवा. नक्की दिवा की दिवटा हे वयात आल्यावर कळत. पण ९९.९९% सर्वांना मुलगाच पाहिजे. आपण थोडा विचार करूया की मुलगा हा वंशाचा दिवा कशावरून असावा. जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा ती परक्या घरी जाते आणि तिथे जाऊन बाळाला जन्म देते मग ती कोणाचा वंश वाढवत असावी हे अज्ञानी लोकांनी जरा विचार करावा की मुलगा वंश वाढवतो की मुलगी. पण आपल्या पूर्वजांनी आपल्या डोक्यात विष पेरून आणि ठोसून ठोसून सांगितलं आहे की फक्त मुलगाच वंश वाढवतो तर ही अगदी चुकीची गोष्ट आहे. बाळ जन्माला घालण्याची कुवत ही देवाने फक्त आईला दिली कारण त्याला माहित आहे की त्या साठी होणारा त्रास हा पुरुष कधी सहन करू शकतच नाही. पुरुष शरीराने जरी ताकदवाण असला तरी आतून तो ठिसूळ असतो पण शरीराने स्त्री जरी कमकुवत असली तरीही देखील तिच्या कडे ती क्षमता आहे. कारण वयात आल्या पासून ती प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदना सहन करत असते परंतु पुरुष कधीच त्या वेदना सहन करू शकत नाही. म्हणून मातृत्व हे फक्त आईला मिळत.

बघता बघता पहिला महिना सरला की गर्भात हळू हळू शारीरिक वाढ होत होती अजून काही अवयव तयार झाले नव्हते. पण बाहेरच्या जगाशी असलेलं नात तेवढं कळत होत. आईशी नाळे सोबत जोडल्यानंतर काहीही झालं तरी आई पाठीराखा असतेच. 

दुसऱ्या महिण्यात वाढ होत होत कान,डोळे, ह्रदय, हात तयार होत होते. माझ्या शरीराला इजा होऊ नये म्हणून सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेत सुद्धा पोटाला जपत जपत राहायची. आणि महत्त्वाचे म्हणजे या जगात जन्माला येण्याआधी जर कुणी तुमच्यावर स्वतःच्या जीवापाड प्रेम करत असेल तर ती आई ही एकमेव व्यक्ती असते. तू कसे दिसता कसे वागता काहींचा विचार न करता ती आपल्याला जीव लावत असते. तिला कधी अपेक्षा सुद्धा नसते ही जे मुल आज तिच्या गर्भात वाढत आहे भविष्यात ते मला सांभाळेल की नाही की कोणत्या वृद्धाश्रमात नेऊन टाकेल. कशाचीही पर्वा न करता आई तीच प्रेम आपल्याला देत असते. काही असतात ज्यांना तरुण आणि सुंदर पत्नी मिळाली की त्यांचं आयुष्य फक्त पत्नी साठी असत पण त्यांना ही जाणीव नसते की एकेकाळी आपण लहान होतो आईच्या गर्भात असताना पासून आईने आपल्याला तळहातावरील फोडा सारख जपलं आणि आज त्या वयोवृद्ध आईला जेव्हा आपल्या मदतीची गरज असते तेव्हा तिला आश्रमात सोडून येतो म्हणजे जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा सुद्धा आपली मुल आपलं अनुकरण करतील. 

तिसऱ्या महिन्याला सुरवात होताच एका जागी झोपुन झोपून कंटाळा यायला लागला मग काय आईच गर्भाशय हेच खेळाचं मैदान खेळायचं आणि झोपायचं खेळायचं आणि झोपायचं. हा नित्य दिनक्रम असायचा.

आणि कधी कधी बाबा मायेचा हात पोटावरून फिरवायचे तेव्हा तो हात सुद्धा माझ्याशी बोलायचा तुझ्या साठी कष्ट चालू आहेत या कष्टाचं तू मोठा होऊन चीज कर आणि आम्हाला या दारिद्र्यातुन बाहेर काढ आमच्या साठी तू एक वरदान म्हणून जन्माला ये.


चौथ्या महिन्यात आणि आईचा आवाज सतत कानी पडत होता. एकट्याला कंटाळा येऊ नये म्हणून आई सतत माझ्याशी बोलत असायची तिला सुद्धा आता माझी सवय झाली असावी. मला त्रास होऊ म्हणून तिच्या इच्छा मारत जेवत असायची. आपण एक दिवस आपलं मन मारू शकत नाही पण आई आपल्या पोटच्या गोळ्यासाठी नऊ महिने नऊ दिवस सतत मन मारून जगत असते त्या कालावधीत ती आपल्या कित्येक इच्छांचा त्याग करते ते एक आईच जाणून घेऊ शकते.

पाचव्या महिन्यात डोळ्यांची उघड झाप होत होती आणि गर्भाच्या आतून बाहेर दिसणारं मंद लालसर जग आणि नाळे सोबत खेळताना एक वेगळाच आनंद हात आणि पायांची रचना वाढत होती आणि बाहेरील बायकांच्या चर्चा स्पष्टपणे कानावर पडत होत्या. हे खात जा ते खात जा. आईला दिले जाणारे उपदेश हे माझ्या शारीरिक वाढी साठीच होते. पण मी जन्माला येण्यासाठी आईने घेतलेले कष्ट हे शब्दात सांगता येणार नाहीत.


सहाव्या महिन्यात फुटबॉल खेळायला शिकलो होतो आईच्या पोटात पळा पळी खेळत, लाथा मारत आईला त्रास देने हा तर बाळाचा हक्कच आईच्या पोटावर उठणारे ते पायांचे ठसे आई आजही आठवण करून देते. आईच्या गर्भात असताना बाळ जन्माला येणार याच्या तयारीला सुरवात होते सातवा महिना सरला की ओटी भरन करून आईला माहेरी पाठवण्याची तयारी कारण आईला आरामाची गरज असते. आपण विचार करतो बाळंतपण म्हणजे काही नाही. जरा विचार करावा आणि एक प्रयोग करावा एक पूर्ण दिवस आणि रात्र दोन किलोचा गोळा पोटाला बांधून वावरून दाखवावं. आपण एक तास भर सुद्धा सहन नाही करू शकत पण आई नऊ महिने आणि नऊ दिवस तोच गोळा घेऊन फिरते आणि आपल्याला जपते उठता बसता येत नाही तरीही आई आपल्याला जन्म देते. 

आठव्या महिन्यात संपूर्ण शरीराची पटकन वाढ होत होती कारण मला बाहेर येण्याची आणि जग पाहण्याची आतुरतेने वाट बघत होतो आई सतत सांगायची तू मुगली असलीस तरीही मी तुला तेवढंच प्रेम देईन आणि मुलगा असलास तरीही मी तितकच प्रेम देईन तुला नऊ महिने पूर्ण झाल्या नंतर दिवसा गनिस दिवस गेले आता बाहेर येण्याची वेळ आली होती आतुरता लागली होती पहिल्यांदा आईला पाहण्याची बाहेर येताच डॉकटरने उलटा करून पृष्ठभागावर फटके मारायला सुरुवात केली म्हणजे त्यांचा उद्देश चांगला होता की आता ही सुरवात आहे आयुष्यात तुला असे फटके सतत खावे लागणार आहेत

जन्म झाल्यानंतर आई बाबांना गोड बातमी मिळाली की मुलगा झाला

आणि माझ्यासारख्या गोंडस मुलाचा जन्म झाला.


आईने माझ्यासाठी नऊ महिने नऊ दिवस नरकवास भोगला आहे. पण आता उतरत्या वयात तिला स्वर्गात असल्याचा अनुभव नक्की देऊ शकतो. आपण आजकाल नवीन लग्न करून येणाऱ्या मुलींना वयोवृद्ध सासू सासरे नकोत, पण त्यांना स्वतःचे आईवडील तेवढे प्रिय असतात. अश्या मुलींनी जेवढा आपल्या आई वडिलांचा आदर करतो तितकाच त्यांनी मुलांच्या आई वडिलांचा देखील करावा. ते सुध्दा त्या सेवेचे हकदार आहेत.


Rate this content
Log in

More marathi story from Mitesh Kadam

Similar marathi story from Abstract