Mitesh Kadam

Horror Inspirational Thriller

4.4  

Mitesh Kadam

Horror Inspirational Thriller

कोरोना एक अविशाप...

कोरोना एक अविशाप...

10 mins
673


नमस्कार

मी एक सामान्य समाज सेवक आणि आमची आई अंगणवाडी मध्ये मागील २५ वर्ष झाले सेविका म्हणून कार्यरत आहे त्यादिवशी केंद्र सरकार कडून आलेले धान्य वाटप करण्यासाठी मी आणि आई अंगणवाडी मध्ये गेलो... २३ एप्रिल रोजी सदर महिला आमच्या संपर्कात आली आणि २५ एप्रिल रोजी सदर महिला कॉविड १९ पॉझिटिव्ह आली.

त्यामुळे २६ तारखेला मला आणि माझ्या परिवाराला महानगरपालिका इस्पितळात चाचणी करण्यासाठी सकाळी ९ च्या सुमारास नेण्यात आले सोबत एकूण २७ संशयित आणि ७ लहानमुले असे सर्व शेजारील लोक होते. इस्पितळात नेताना सर्व लोक सर्कस मधील जनावरांना नेताना जसा आनंद घेत होते आणि मोबाईल काढून व्हिडीओ काढत होते माझ्या जीवाला चटका लागला आपण समाजासाठी एवढे जीवापाड मदत करतो पण त्याच्या मोबदल्यात अशी परत फेड मिळते असो. त्यानंतर आमच्या सर्वांच्या चाचण्या घेत ४ वाजले तिथे ना पाण्याची सोय नाही जेवणाची सोय सर्व लहान मुले भुकेने कळवळत होती. तिथल्या काही अधिकाऱ्यांनी कळवलं की विलगीकरण कक्षात पोचल्यावर तुम्हाला जेवण देण्यात येईल, त्यानंतर १४ वर्षाच्या लहान मुलांच्या सोबत एक पालक वाशी येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आणि बाकीचे २० सशीयीत विलगीकरण कक्षात एकाच अँबुलन्स ने नेण्यात आले. सदर अँमबुलन्स ची क्षमता ४ संशयित नेण्याची असताना त्यात वडाप भरल्या सारखे भरगच्च २० व्यक्ती कोंबण्यात आले. सायंकाळी ५ च्या सुमारास विलगीकरण कक्षात पोहचविण्यात आले. सकाळ पासून सर्व संशयित उपाशी काहीही न खाता आणि पिता या आशेत होते की लवकरच काहीतरी खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी पाणी मिळेल काही तासांनी मी तेथील कर्मचाऱ्यांना विचारपोस केली असता लवकरच काहीतरी देण्यात येईल अशी आशा दाखविण्यात आली परंतु रात्रीचे ९ वाजले परंतु पाणी सुद्धा मिळाले नाही जसे कारागृहात कैद्यांना बसवले जाते तसेच काही आमच्या सोबत देखील घडले. इमारतीच्या एका कोपऱ्यात सर्व संशयित बसून होते ४ तासानंतर एका कर्मचाऱ्यांची नजर पडली त्याने आश्वासन दिले की लवकरच तुम्हाला खोली आणि जेवणाची सोय केली जाईल अशी आशा दाखवली. रात्रीचे १० वाजले ५ तासानंतर सुद्धा पाणी नाही जेवण नाही भुकेने पोटात गोळा येत होता सदर वागणुकीने त्रस्त होऊन मी पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांचे उत्तर माझ्या कानातून रक्त येण्यासारखं होत "इतक्या लवकर काही मिळणार नाही तुम्ही काही आमदार खासदार नाही किंव्हा आमचे कुणी नातेवाईक नाहीत की तुम्हाला इथे पाहुणचार मिळेल आणि असच १४ दिवस कुत्र्यासारखा राहण्याची तयारी ठेवा" आणि "तुम्हाला कुत्र देखील विचारणार नाही अशी उत्तर मिळत होती" तेव्हा आमच्या सर्वांच्या आशा एकाच व्यक्तीकडे होत्या तो म्हणजे तेथील पोलीस निरीक्षक माझे वडील पोलीस बांधवाकडे मदत मागण्यांसाठी त्याच्याकडे गेले असता त्याने वडिलांना शिवीगाळ करत म्हणाला "म्हाताऱ्या तिकडे लादिवर झोप नाही तर एक खानाखाली देईन" असे उत्तर जेव्हा माझ्या कानी पडले तेव्हा माझा पारा चढला.. काय करू काय नको असे झाले होते. आपण ज्यांना आपले रक्षक म्हणतो तेच आपले भक्षक असतात हे त्यावेळेस मला कळलं. आपण त्यांना आपले मित्र म्हणतो आपले रक्षक म्हणतो परंतु दुर्दैवाने ते त्यातले नाहीत हे त्यादिवशी स्पष्ट झाले आणि मी ट्विट करण्याचा निर्णय घेतला रात्री १०:१५ च्या सुमारास मी ट्विट केलं की..

""'' मागील १३ तासापासून आम्ही उपाशी आहोत आम्हाला नाही पाणी मिळाले आहे आणि नाही जेवण खोली मिळण्याची सुद्धा आशा नाही आहे. माझे आई वडील वयस्क आहेत त्यांची दुरवस्था होत आहे आई एक स्त्री असल्याने त्यांना होणारा त्रास काही सहन होत नाही"""" जमल्यास आपली मदत मिळावी सदर ट्विट करताच ट्विटर वरील #मायमराठी कुटुंबातील सर्व सदस्य ट्विट चा पाठपुरावा करत मदतीचा हात मागत होते त्या एका ट्विट ला खुप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सर्व जनतेकडून आणि राजकारणातील नेत्यांच्या कडून मदतीचे हात हाथ पुढे येऊ लागले.

तिथे एकूण दहा इमारती होत्या प्रत्येक इमारत २९ मजली प्रत्येक मजल्यावर एकूण ३० खोल्या होत्या अश्या एकूण दहा इमारती होत्या त्यापैकी तीन इमारती मध्ये आधीच काही संशयित ठेवण्यात आले होते आणि दहा पैकी दोन इमारती पॉझिटिव्ह रुग्णांकरिता ठेवण्यात आल्या होत्या.

त्या नंतर मध्यरात्री ११:४० च्या सुमारास खोली मिळाली प्रत्येकाला स्वतंत्र खोली देण्यात आली परंतु अजूनही पाणी आणि भुकेने व्याकुळ झालेले पोट काही ऐकत नव्हते तेव्हा माझे बोलणे नुकतेच नवी मुंबई कमिशनर सोबत झाले होते की लवकेच जेवण मिळेल कारण माझ्या ट्विटला सर्वानी पाठिंबा दिल्या नंतर १२.१५ च्या सुमारास जेवण मिळाले, पण पाणी पिण्यासाठी वापरलेल्या मोकळ्या बाटल्या दिल्या आणि सांगितले एक पाणी पिण्याची मशीन आहे. त्यातून सर्वानी पाणी भरावे एका मजल्यावर ३० खोल्या आणि एक पाणी भरण्याचे मशीन अश्याने सामाजिक अंतर कसे पाळावे हा मोठा मुद्दा होता त्यानंतर सर्वानी ट्विटला दिलेल्या प्रतिसादाने रात्रभर राजकारणी लोकांचे फोन सुरू झाले ""मी मदत करतो - मी मदत करतो"" माझे आभार व्यक्त कर माझे नाव ट्विट कर असे अनेक फोन आले .. राष्ट्रवादी, काँग्रेस , मनसे कार्यकर्त्यांनी फोनचा रात्रभर पाऊस पाडला. त्यानंतर पहाटे ३ च्या सुमारास नवी मुंबई पोलीस कंट्रोल रूममधून फोन आला की तुम्ही दिल्लीला तक्रार केली आहे, परंतु वास्तविक मी कुठेही तक्रार नोंदवली नाही. मी केलेल्या ट्विट मध्ये जनतेने इतक्या प्रमाणात सर्व राजकीय शासकीय त्यानंतर बातमीदार सर्वांना गुंतवले होते की सर्वांनी मला फोन केले आणि पोलीस मला जाब विचारत होते ते मदतीच्या हेतूने बोलत होते की दमदाटीच्या हेतूने बोलत होते हे काही कळेना. दिवस भर उपाशी पोटाने त्रास दिला होता आणि आलेला थकवा काही थांबत नव्हता त्यानंतर पोलिसांनी पहाटे ४-५ च्या सुमारास पोलिसांची एक तुकडी पाठवली माझ्या मदती करीता आणि मला खाली बोलवण्यात आले त्यांनी विचारपोस केली तक्रार करण्याचे कारण काय आम्ही इथे आहोत वर पर्यंत तक्रार का केली असा जाब विचारत होते ..परंतु जेव्हा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीचा हात मागितला तेव्हा ते केकसत होते आणि नंतर आलेले पोलीस कर्मचारी आम्ही आहोत ना वर पर्यंत तक्रार का केली हा जाब विचारत होते नक्की सामान्य माणसाने करायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यानंतर काही त्रास असल्यास आम्हाला मदत माग वर पर्यंत तक्रार जाता कामा नये असे ठासून सांगितले. सकाळी आणखी काही वरिष्ठ मंत्र्यांच्या ऑफिसातून फोन आले आम्ही मदत करू असे आश्वासन देण्यात आले परंतु खोली मध्ये अत्यावश्यक वस्तूंची सोय नव्हती (उदा; पाण्याची बदली, झोपण्यासाठी बेड, उशी, पिण्यासाठी पाणी, जेवणासाठी थाळ्या, इ.) त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागला, त्यानंतर पहिला दिवस उजाडला सकाळचे १० वाजून गेले नाष्टा आणि चहा सुद्धा आला नाही. आदल्या दिवशी उपाशी पोटाने हाल केले आणि आजची परिस्थिती सुद्धा सारखीच असेल का या भीतीने लोक खोलीत बसून होते. दुपारी १२.१० च्या सुमारास कंत्राटी कामगार चहा देण्यासाठी आला परंतु चहा घेण्यासाठी ग्लास घरून घेऊन यायचे असते असे तेव्हा कळले. त्या नंतर दुपारी जेवणाची वाट बघत सायंकाळ उजाडली. सायंकाळी ४.४५ च्या सुमारास जेवण आले त्यावेळी कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता तुम्ही आला आहात याची त्यांना कल्पना नव्हती त्यामुळे जेवण दिले नाही अशी बाब समजली आणि तोही दिवस निघून गेला तो वनवसातील पहिला दिवस होता. त्यानंतर जे काही लोक माझ्या संपर्कात आले होते ते ‌स्वार्थी लोक सतत फोन करत होते.. त्यांना माझ्या प्रकृती बद्दल चिंता नव्हती तर काही व्यक्तींच्या संपर्कात मी आलो असल्यानं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. परंतु चाचणीचे अहवाल कधी मिळतील याची कल्पना कुणालाही नव्हती तिसऱ्या दिवशी अत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले, तोवर ओंजळीने अंघोळ करण्याचा लाभ घेतला आणि लादिवर झोवण्याचा अनुभव असल्यामुळे ते काही जड गेले नाही चौथ्यादिवशी अहवाल येतील अशी आशा देण्यात आली होती परंतु अहवाल काही आले नाही परंतु पाचव्या दिवशी आमच्या सोबत आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे सर्वांच्या मनात भीतीने घर केलं. कारण चाचणी घेतल्यानंतर आम्ही सर्व २० संशयित एकत्र एकाच गाडीने आलो होतो, त्यामुळे नवी मुंबई चे नोडल ऑफिसर आणि कमिशनर यांना ई मेल द्वारे पत्र दिले की आमच्या सर्वांची दुसरी चाचणी त्वरित घेण्यात यावी... परंतु त्यावर विचार करावा लागेल असे उत्तर त्यांच्या कडून मिळाले त्यामुळे अस्वस्थता वाढली. त्यानंतर त्याच रात्री आईची प्रकृती खालावली आणि माझ्या मनात भीतीने घर केलं.. मी कावरा बावरा झालो होतो जेव्हा वेळ आपल्यावर येत तेव्हा खर दुःख कळत. ही खोटी गोष्ट नाही त्यानंतर मी थेतील डॉक्टर यांची मदत मागितली असता त्यांनी मला ऑनलाईन तक्रार करा अशी माहिती मिळाली. त्यानंतर मी ऑनलाईन वेबसाईटवर नवी मुंबई मुख्य कार्यालयातील संपर्क शोधला आणि त्वरित त्यांना फोन केला. रात्री १२ ते १ च्या सुमारास डॉ. उज्वला ओतुर्कर या कार्यरत होत्या मी आजही त्यांच्या कार्याला सलाम करतो एक स्त्री असूनही त्या रात्री रुग्णांच्या सेवे करीता रुजू होत्या यांनी त्वरित डॉक्टरांना फोन करून साहाय्य करण्याचे आदेश दिले आणि मला त्वरित मदत मिळाली. त्यांचे आभार मी आयुष्यात कधी विसरणार नाही आणि त्यांनी आश्वासन दिले की आणखी काही मदत लागल्यास नक्की कळवा अशी विनंती केली

२ तारखेला आलेल्या अहवालात सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आला त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले नव्हते किंवा इतर काही औषध उपचार सुद्धा सुरु करण्यात आले नव्हते त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्ती मानसिक दबावाखाली आला होता. त्याला ५ वर्षाची लहान मुलगी त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर जबाबदार कोण असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता त्यावर असे उत्तर मिळाले की आम्ही मोजकेच अधिकारी कुठे कुठे पाहणी करणार परंतु सतत पाठपुरावा घेत असल्यामुळे अखेर ६ दिवसानी त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह आरक्षित इमारती मध्ये हलविण्यात आले. परंतु १४ दिवस उलटून गेले तरीही दुसरी चाचणी घेण्यात आली नाही तेव्हा मी तेथील अधिकारी आणि डॉक्टर यांना जाब विचारला असता टोलवा टोलवीची उत्तर मिळाली परंतु सोबतच असे काही व्यक्ती आले की जे तिथे २८ दिवसापासून विनवणी करत होते की केव्हा त्यांना सोडण्यात येईल बाकी सर्व बेलापुर, नेरुळ, घणसोली, तळवली, ऐरोली दिवा गाव येथील संशयित असून काहींना १४-१८-२२-२८ दिवसापासून तेथेच अडकून होते. परंतु जेव्हा जेव्हा ते जाब विचारायला जात असत त्यांना हुरकवून लावण्यात येत होते.. परंतु ९ तारखेला सर्वांचा प्रतिक्षेचा बांध तुटला आणि १०० ते २०० व्यक्ती खाली उतरले आणि त्या जमावाने अधिकाऱ्यांना धारेवर धरले आमच्या पैकी अर्धे इमारतीच्या खिडकीतून तमाशा बघत तसेच होते मी त्वरित नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना फोन करून सूचना दिली त्यानंतर पोलीस आयुक्त तेथे आले येताना त्यांनी स्वतःचा फौज फाटा घेऊनच आले जसे की आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार आहोत परंतु मी आणि माझ्या सोबतच एक युवक होता आम्ही दोघांनी त्याच्या सोबत चर्चा केली त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली.. तेव्हा त्यांनी आश्वासन दिले की आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत घरी सोडण्यात येईल तेव्हा सर्वानी सुटकेचा श्वास घेतला आणि आप आपल्या खोलीत निघून गेले परंतु दिलेल्या आश्वासन नक्की खरे आहे का यावर मनात शंका निर्माण झाली परंतु संध्याकाळी अचानक ७ च्या सुमारास लोकांची झुंबड उडाली घरी जाण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या घरी जाण्यासाठी आतुर होता आणि गाड्यांची व्यवस्था कमी असल्याने काही लोकांना दुसऱ्या दिवशी सोडण्याचा निर्णय घेतला. ८ च्या सुमारास काही इमारतीच्या दरवाज्याला टाळा लावण्यात आला कारण खुप मोठ्या प्रमाणात लोक घरी जाण्यासाठी निघाले होते आणि तिथे सोशल डिस्टन्स चे पार बारा वाजवले होते लोकांनी तरीही आम्ही विचार केला की एवढ्या गर्दी मध्ये घरी जाण्यापेक्षा एवढे दिवस थांबलो तर आणखी एक दिवस थांबुयात परंतु तेवढ्यात एक व्यक्ती माझ्या मजल्यावर सांगण्यास आला की ज्यादा गाड्या सोडत आहे. जर तुम्हाला घरी जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही खाली जाऊ शकता तेच रात्री ११ च्या सुमारास खाली गेलो असता तेव्हा चित्र वेगळंच पाहायला मिळालं २० ते २५ डॉक्टरांची फौज तैनात होती मागील १४ दिवसात एकही डॉक्टर नजरेने दिसला नव्हता. रुग्णांची चाचणी सुद्धा कंत्राटी असलेले कामगार घेत होते आणि आज निघायच्या वेळी एवढी फौज दिसणे आश्चर्यच होते आणि काही अक्कल शून्य माणस पालिकेने दिलेल्या अत्यावश्यक वस्तू म्हणजेच बादल्या,चादर,जेवणाची ताटे घरी घेऊन चालली होती.. तेव्हा माझा पारा चढला आणि त्यांच्या सोबत वाद सुद्धा झाला की प्रशासन तुमच्या सोई साठी वस्तू देत आहे घरी नेण्यासाठी नाही काही सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी वस्तू तिथेच ठेवून दिल्या पण त्याआधी बऱ्याच लोकांनी वस्तू पळवल्या सुद्धा आपणच जर आपल्या प्रशासनाला लुबाडले तर नक्कीच तोटा आपलाच आहे हे लोकांना कधी कळून चुकेल देव जाणे

मागील १४ दिवस नक्कीच वनवासात काढले काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या त्यामुळे काही गोष्टी कथे मध्ये नमूद केल्या नाही आहेत

जर प्रत्येकाला आपली जबाबदारी कळली तर नक्कीच असे दिवस कुणाच्या वाट्याला येणार नाहीत आणि शत्रूच्या वाट्याला सुद्धा असे दिवस येऊ नये अशी प्रार्थना करेन, पण खर सांगायचं झालं तर एका विषाणूने माणसातला खरा स्वार्थी माणूस दाखवून दिला प्रत्येक जण स्वार्थी असतो हे कळवून दिले कोण आपलं जिवलग नाही सगळे स्वार्थासाठी जन्माला आले आहेत मित्र नाही आणि मैत्रीण सुद्धा नाही एकटे आलो एकटेच जाणार आहोत हे नक्की आहे

एका मायक्रो कोरोना विषाणूमुळे माणसातल्या खऱ्या स्वार्थी जाती दाखवल्या.

कोण आपले आहेत कोण परके हे कळवून देण्यासाठी कोरोना जन्माला आला असावा. त्याने जेवढं नुकसान केलं त्यापेक्षा जास्त अनुभव दिला. कदाचित पुढे यापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होणार असावी, त्यामुळे ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी आताच घात केला म्हणजे यापुढे प्रत्येकाने माणसे जोडा पण त्याच्या आधी त्यांची परीक्षा घ्या त्यानंतरच जवळ करा. कदाचित आजवर तुम्ही खुप माणसं जोडली असतील पण तुम्हाला कोरोना झाल्यावर ते तुम्हाला काळजी घे अशी मनस्थिती देण्यापेक्षा तू माझ्या संपर्कात का आला? हा प्रश्न विचारतील कारण त्यांना केलेल्या मदतीची किंवा त्यांच्या मैत्रीची जाणीव नसावी अशी माणसं आज उपयोगी नाही आली तर आयुष्याच्या शेवटी कशी उपयोगी येणार पण मी एवढे मित्र मिळाळवले ज्यांनी मला आजवर पाहिलं सुद्धा नसावं त्यांनी फोन करून एवढ्या मानसिकते मध्ये उभं केलं की आम्ही आहोत आपण जगाला हरवू शकतो हा तर इवलासा कोरोना आहे अश्या परिस्थिती मध्ये आर्थिक नाही तर मानसिक धीर देणारे हात हवे असतात.

अजून वेळ चुकलेली नाही अनुभव घ्या मैत्रीतील कोरोना ओळखा आणि सावध व्हा.

घरी रहा, सुरक्षित रहा


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror