Mitesh Kadam

Tragedy Crime

4.7  

Mitesh Kadam

Tragedy Crime

ती निर्भया...

ती निर्भया...

7 mins
2.3K


आजवर लहान मुलींवर लहानपणी त्यांच्या आयुष्याचा खेळी केली जाते आणि ते कोणी बाहेरचे नाही तर घरातीलच नराधम असतात सध्या त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे विश्वासाने जगावं तरी कसं हा मोठा प्रश्न आज अशीच एका निर्भयाची कथा सतर्क राहण्यासाठी मांडत आहे कृपया याचा कथेचा वेगळा अर्थ काढू नये.  मुलगी म्हटलं की सर्व पुरुषांच्या नजरेत भरते ती सुंदर अशी कामुक स्त्री तीच स्त्री लहान असताना गोड गोंडस अशी गुबगुबीत परी अश्याच एका मुलीचा जन्म झाला सर्व परिवारात आनंदाच वातावरण होत तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात त्याने संपुर्ण इस्पितळात पेढे वाटले होते. खुपच सुंदर क्षण होता तो त्या आई साठी आणि त्या वडिलांच्या साठी. लवकरच तिचे बारसे झाले नाव नियती(काल्पनिक) ठेवण्यात आलं असे सुंदर नामकरण करण्यात आले हळू हळू नियती मोठी होत होती तिचे ते बोबडे बोलणे, तुरु तुरु चालणे एक नवलच असते. तिचा तिच्या वडिलांवर खूपच जीव होता आणि प्रत्येक मुलीचा तिच्या आई पेक्षा वडिलांवर खुप प्रेम असत करण प्रत्येक मुलगी तिच्या बाबांच्या साठी ही परी पेक्षा कमी नसते . नियती आता शाळेत जात होती तिला तिचे बाबा दररोज शाळेत सोडायला जायचे आणि आई रंजना (काल्पनिक) शाळेतून घरी आणायची.हा नित्याचा कार्यक्रम असायचा..


नियतीचे बाबा तिला प्रत्येक रविवारी बागेत खेळायला घेऊन जायचे. आज रविवार होता नियती सकाळ पासून बाबा उठा ना बागेत जायचं आहे किती वेळ झोपणार आज मला सुट्टी आहे शाळेला तुम्ही दर रविवारी असेच करता उशिरा उठता आणि मला संध्याकाळी बागेत घेऊन जाता मला खेळायला मिळतच नाही. शेवटी बाबा उठले त्यांच्या नियती चे ऐकून नियती तिच्या घरात जाऊन भांडी घेऊन आली खेळायला तोवर बाबा अंघोळीला निघून गेले बाबांना माहीत होतं खेळण्यात मग्न झाली की दुपार उलटून जाईल तोवर माझी कामे उरकून घेतो असेच काही घडले पण आज रंजनाच्या माहेरून फोन आला संध्याकाळी जेवायला या जावईबापू बाबांनी नक्की केलं आणि नियती ला आवाज दिला नियती मामाच्या घरी जायचं आहे !!!! येणार ना???? नियतीने उत्तर दिले हो!!!! बाबा टला जाऊया लगेच आता नाही रे बाळा संध्याकाळी बाबांनी दिलेलं उत्तर बाबा मग आज बागेत नाही जायचं का???? नाही म्हणून बाबा निघून गेले अंघोळीला नियती पुन्हा खेळण्यात मग्न झाली बाबांनी आई ला सांगितले तुझ्या माहेरून फोन आला होता संध्याकाळी जेवायला या म्हणून आपल्याला जायचं आहे दुपारी निघुयात दुपार झाली नियती तयार झाली आणि आई च्या मागे लागली आई आवर ना ग पटकन मामाच्या घरी जायचय ना.... झालं ग बाई तुला नेहमी घाई असते बाबा चल ना रे हो बाळा कपडे तरी घालू दे मला बाबांनी उत्तर दिलं नियती रुसून बाहेर पायरी वर जाऊन बसली जेमतेम ६ वर्षांची गोरी गोरी पान , फुलांच्या सारखे मखमली गाल, डोळे निळसर घारे, डोक्यावर दोन पोनी बांधलेल्या,डोळ्यांवर केस येऊ नये म्हणून बँड लावलेला त्यावर सुंदर दोन फुलपाखरं बसलेली,खांद्याला पर्स अडकवलेली, जांभळा सफेद फ्रॉक, ओठांना गुलाबी रंगाची लिपस्टिक, कपाळाला सुंदर टिकली , आणि पावडर भरभरून लावलेली मुलींना लहानपणापासूनच सुंदर दिसण्याचा मोह असतो. लवकरच ते सर्व गाडीने निघाले नियती बाबांच्या पुढे बसली ती पर्स सतत खांद्यावरून पडत होती बाबांनी सांगितलं बाळा ती आई कडे दे ती ठेवेल जपून नको ना बाबा तरीही बाबांनी फी काढून रंजनाच्या हातात दिली थोड्याच वेळात ते रंजनाच्या माहेरी पोचले तिथे मुलगी आणि नात येणार म्हणून तयारी चालू होती जेवणाची नियती तिथे पोचल्या पोचल्या आज्जी ने उचलून घेतलं चार पाच मुके घेतले तेव्हा आज्जीला बर वाटल म्हातारी माणस नातवंडं बघून खुप आनंदी होतात एक वेगळाच मोह असतो.


बाबा, सासरे बुवा, रंजना आणि नियती जेवायला बसले जेवून झालं की सर्व गप्पा मारत बसले नियती ची बागेत खेळायची वेळ होती तिचे खेळ चालूच होते या घरातून त्या घरात हे समान काढ ते समान काढ नियती ला बाबा ओरडले काय ग कशाला समान काढतेस परत आणणार नाही तुला इकडे आणि कुठे नेणार सुद्धा नाही नियती रागात वरच्या खोलीत गेली तिथे गौरव बसला होता मोबाईलमध्ये अश्लील विडिओ बघत नियतीने आवाज दिला मामा... मी इथे खेळू का???? त्याने उत्तर दिले हो खेळ गौरव चा फाजिल पणा सुरूच होता तो एकटक विडिओ बघत होता तर एकटक नियतीला पाहत होता कुठे तरी त्याच्या मनातली काम वासना त्याला उनवत होती काही वेळा नंतर त्याने नियतीला जवळ बोलावलं आणि मांडीवर बसायला सांगितलं नियती लहान तिला काहीच कल्पना नव्हती की मामा च्या मनात काही वाईट असेल ती मांडीवर बसली तरीही गौरव विडिओ बघत होता नियतीला त्यातले काही कळले नाही ती तिच्या बाहुल्यांच्या सोबत खेळण्यात मग्न होती गौरवची कामवासना वाढली त्याने नियतीसोबत नराधम होऊन तिची अभ्रू हिरावून घेतली होती नियतीला काही कळेनासे झाले असह्य वेदनांनी थरकाप उडाला ती रडू लागली गौरवने तिचे कपडे नीट करून खाली जाण्यास सांगितले आणि धमकी दिली जर ह्या बद्दल आई बाबांना काही सांगितलं तर मी तुला संपवून टाकेन. नियतीला चालता येत नव्हतं, डोळ्यातील अश्रू पुसत ती खाली गेली रंजनाने विचारलं काय झालं बाळा रडतेस का? नियतीने नकारार्थी मान डोलावली तिच्या मनात भीती होती त्या रात्री ते सर्व घरी परतले पण नियतीच्या सोबत घडलेली ती घटना तिच्या डोळ्या समोरून जात नव्हती. आजवर ती ज्या व्यक्तीला मामा मामा करून त्याच्या खांद्यावर खेळली आज त्याच मामाने तिचा घात केला होता आणि नियती इतकी लहान होती की कुणाला काही समजून सांगू शकत नव्हती सहा वर्षाची पोर ती सांगेल तरी काय तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगबद्दल आठवूनसुद्धा अंगावर शहारे येत होते.


दुसऱ्या दिवशी नियतीला ताप आला तिची अंतर्वस्त्र काढताना रंजनाने पाहिलं की गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. तिने नियतीला जवळ घेतलं तर तिला खूप ताप आला होता. तिला मूत्रविसर्जन करताना असह्य वेदना होत होत्या रंजनाला काही कळेना. पण तिला कळून चुकले होते की नियतीच्या सोबत काहीतरी चुकीचे घडले होते पण नक्की असे करणारं कोण तिने नियतीला खूप वेळा विचारले पण नियतीने कधी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. सर्वांना असेच वाटले की खेळताना काहीतरी लागले असेल पण तो सर्वांचा भ्रम होता डॉक्टर सुद्धा स्पष्ट करू शकले नाही कारण त्यांनी फक्त वरवरून तपासणी केली होती. असेच काही दिवस लोटत गेले आता नियतीला लैंगिक शिक्षणामुळे सर्व कळून चुकले होते की तिच्यासोबत जे घडले होते तो बलात्कार होता आणि समाजात बलात्कार झालेल्या स्त्रियांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं हे तिला कळून चुकलं होत म्हणून सर्व कळत असतानासुद्धा तिने कधीच या गोष्टीचा उलगडा नाही केला.


असेच दिवस लोटत गेले आता नियती वयात आली होती तिला एका मुलाबरोबर शिकत असताना प्रेम झाले काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु नियतीच्या मनात आजही तीच भीती होती की माझ्या सोबत घडलेली गोष्ट जर समाजात कळली तर माझ्यासोबत माझ्या आई वडिलांची समाजात असणारी संपूर्ण मानमर्यादा मातीमोल होईल म्हणून ती चुपचाप विषाचा घोट घेत होती. तिच्या मनात तिच्या असणाऱ्या मामाबद्दल तिरस्कार भरला होता आज तो मरण पावला होता पण तिला काडीमात्र फरक पडला नाही कारण ज्या व्यक्तीने एखाद्या मुलीच्या आयुष्यच उध्वस्त केलं असेल त्याला नक्कीच मरण यायला हवं. नियतीचे प्रेम खूपच वाढलं होतं पण तिला तिच्या आयुष्याची सुरुवात करायची होती पण पुरुषांची मानसिकता असते की जर मुलीमध्ये कौमार्य नसेल तर ती पवित्र नाही असा काहीसा भ्रम संपूर्ण भारतात आहे आपल्याला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे लग्नानंतर नियतीच्या आयुष्यात वादळ येऊ नये म्हणून तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगावंसं वाटलं परंतु नियतीच्या मनात शंकांचं उधाण आल होतं जर हे ऐकून त्यांनी मला सोडून दिल तर काय होईल? माझं प्रेम खर आहे परंतु... जस समाज पीडितेकडे पाहतो तसं पाहायला सुरुवात केली तर सर्व संपून जाईल?


अखेर नियतीने निर्णय घेतला होणाऱ्या पतीला संपूर्ण हकीकत सांगण्याचा पावसाळ्याचे दिवस होते तेवढ्या पावसात नियतीने होणाऱ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं अत्यंत महत्त्वाचे बोलायचं आहे येऊन भेटा... तिचा होणारा पती येऊन उभा होता १५ मिनिटे झाली पण नियतीच्या मुखातून शब्द निघेना ती घाबरली होती तिला तो प्रसंग डोळ्यासमोर येऊन ठेपला होता सांगू तरी कसं डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या त्याला नक्की कळल नाही त्याने विचारलं नियती काय झालं? नियतीने नकारात्मक मान डोलावली पण अश्रू थांबत नव्हते त्याने तिला मिठीत घेऊन दोन्ही डोळ्यातील अश्रू पुसत विचारलं काय झालं सांगशील का? मी सांगेन पण तुम्ही आधी वचन द्या की मी जे सांगीन ते ऐकल्यावर मला सोडून जाणार नाही? तो सुद्धा क्षणभर गांगरला त्याला ऐकायचं होत नक्की कशामुळे नियती रडत आहे त्याने वचन दिले नाही जाणार! कधीच नाही जाणार श्वास असेपर्यंत साथ देईन असे बोलून तिच्या कपाळावर चुंबन घेतलं नियतीने हुंदका फोडत सुरुवात केली आणि घडलेला लहानपणीचा प्रसंग त्याला सांगून टाकला. मागील २० वर्षात नियती कुणालाच या प्रसंगाबद्दल सांगितले नव्हते तो आश्चर्यचकित झाला आणि नियतीला धीर देत म्हणाला अगं यात तुझी कुठे चूक होती का? त्या नराधमाच्या वासनेमुळे तुझे आयुष्य उध्वस्त झाले तू झेललेल्या असह्य वेदना त्यांना तू समोर गेलीस एवढं सगळं तू एकटीने सहन केलंस मग तुला अस का वाटलं की हे ऐकून मी तुझी साथ सोडून देईन जर हीच गोष्ट माझ्यासोबत घडली असती तर तू सुद्धा मला अर्ध्यावर टाकून गेली असतीस का? तिने नकारार्थी मान डोलावली आणि त्याला घट्ट मिठी मारली.


लवकरच दोघांचं लग्न झालं आणि त्यांनासुद्धा एक सुंदर गोड गोंडस मुलगी झाली तिचं नाव एलिझाबेथ ठेवलं आहे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे लहानपणापासून तिला लैंगिक शिक्षण देत आहेत. सध्या मुली स्वतःच्या घरातच सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यावर अत्याचार करणारे दुसरे कुणी नसून त्यांचे नातेवाईकच असतात म्हणून मुलांना लहान वयातच शिक्षण द्या. चांगला स्पर्श वाईट स्पर्श यातला फरक समजवा आणि लहान मुलींना किंवा मुलांना एकटे सोडू नका, नजरेआड होऊ देऊ नका. सर्वांनी काळजी घ्या. समाजात बरेच नराधम मोकाट आहेत. वेळेचा फायदा घेण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पीडित महिला ही स्वतःहून पीडित नसते समाजातील नराधम तिला पीडित बनवतात, ती शिकार होते समाजातील प्रत्येक पुरुषांच्या वाईट नजरेची. घरातून बाहेर पडली की तिला सतत स्वतःला सावरत राहावं लागतं आणि जर कधी नकळत शरीराचा एखादा भाग दिसला तर तिच्यावर वाईट संस्कार झालेत असा शिक्का मारला जातो. सर्वांनी आपापल्या परिवाराची काळजी घ्या. स्त्रियांना समजून घ्या, त्यांना आपलंसं करा, प्रेम द्या, तेव्हा प्रेम मिळेल...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy