दहावीच वर्ष...
दहावीच वर्ष...
आज दहावीच्या शिकवणीला सुरुवात झाली. दहावी म्हणजे सुट्ट्या कमी आणि अभ्यास जास्त असतो नववी ला होतो तर सगळे म्हणायचे हे खुप महत्त्वाचे वर्ष आहे हे निघालं की दहावी चे वर्ष अगदी सुरळीत जाते आणि दहावी ला कसाबसा आलो तर हे वर्ष आयुष्याची पहिली पायरी आहे असं सांगण्यात आलं हे वर्ष काढलं की बारावी उत्तम रित्या निघेल अस सांगण्यात येत आता खर काय नि खोटं काय परंतु शिक्षण ही काळजी गरज आहे हे तेवढं खर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण घेतलं की हक्काची भाकर नेहमी मिळवू शकतो पण तशी साथ मिळाली की नक्कीच यशाचे शिखर गाठता येत यात गैर नाही.
नेहमी प्रमाणे शाळेत गेलो पण नवीन वर्गात गेलो की खोली बदलली असते पण मागचे संपूर्ण वर्ष त्या खोलीत घालवलेल्या आठवणी डोळ्या समोर असतात आणि खोली बदलण्याची इच्छा नसते पण नियम सर्वाना असतात मी खालीच वाट बघत होतो कुणी ओळखीचं दिसत का ????
आणि नेमका माझं नाव कानी पडलं .....
ए गण्या.........??????? दिनू ने हाक दिली
दिनू ......माझा जिवलग मित्र माझीच वाट बघत होता त्याने तिसऱ्या मजल्यावरून आवाज दिला
इथे वर वर बघ मी शोध घेत होतो आवाज कुठून येत आहे
तिसऱ्या मजल्यावरून दिनू आवाज देत होता मी तडक निघाली पायऱ्या कापत हापत हापत वर पोचलो
भावा!!!!! कसा आहेस????
दिनू ने उत्तर दिले कसा दिसतोय मी ?????
कडक!!!!! मी उत्तर दिले....
नेहमी प्रमाणे शेवटचा बाक आमचा ठरलेलाच म्हणजे शिक्का मोर्तब केला होता आणि शाळेत असेच नियम असतात सभ्य मुलं पहिल्या बाकावर आणि आम्ही वळू शेवटच्या बाकावर
शाळेचा पहिला क्लास वर्ग शिक्षकांचा बाकावर बसलेल्या मुलांच्या कडे बघत कुणी आल नाही याचे निरीक्षण करत वर्ग शिक्षिका बघत होत्या माझ्या कडे लक्ष देत म्हणाल्या
आलास का रे बाबा......??????
हो बाई तुम्हाला एकट टाकून कस जमेल.........
३ वर्ष झाले बाईंना सर्व मुलांचे स्वभाव चांगलेच परिचयाचे झाले होते त्यामुळे उलट उत्तर देणे हा मागील बाकावर बसलेल्या मुलांचा जन्मसिद्ध हक्कच जणू काही
हजेरी घेण्यासाठी बाई उठल्या पण त्या आधी नवीन वर्षाचे भाषण दरवर्षी प्रमाणे बाईंनी ऐकवायला सुरुवात केली आणि नाविनवर्षं आणि नवीन अटी आणि शर्ती सांगण्यास सुरुवात केली.....
दहावीचे वर्ष हे आयुष्याची पहिली पायरी असत त्यामुळे प्रत्येक मुलाने आपले भविष्य काय ठरवले आहे त्यावर अवलंबून आहे जेवढा जास्त अभ्यास करेल तोच यशाची किल्ली गाठेल हे आमच्या बाईंच नेहमीच वाक्य होत आणि जो विद्यार्थी उशिरा वर्गात येईल त्याला खाली बसवण्यात येईल वर्गपाठ आणि गृहपाठ नित्य नियमाने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाईल अशी आशा दाखवली जायची दर वर्षी पण बक्षीस काही मिळाले नाही कोणत्याही विद्यार्थ्यांना पण तरीही मुलींची स्पर्धा सुरू होत सर्व तयारीला लागायचे आणि आमचे शेवटचे दोन बाक हे नेहमी प्रमाणे शिक्षकांची टिंगल करण्यात अग्रेसर होते पण जेव्हा अभ्यास सुरू असेल तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यास हा आमचा सर्वांचा नियम
भाषण संपून सर्व शिक्षकांच्या पहिल्या दिवसाचा आरंभ झाला शाळेची घंटा झाली सर्व घराकडे निघाले मी दरवर्षी प्रमाणे सायकल वर शाळेत जात होतो या वर्षी दिनू च्या बाबांनी त्याला शाळेत जाण्यासाठी सायकल घेऊन दिली होती दिनू माझ्या शेजारच्या गावी रहात होता त्यामुळे घरी जाताना आम्ही दोघे सोबतच घरी निघायचो
घरी जाताना चर्चा रंगली अरे ती संजू किती फुगली बघितलिस का तू???? दिनू ने प्रश्न विचारला
हो रे !!!!! पण सुंदर दिसत होती आधी पेक्षा आज छान गजरा आणि गुलाबाचे फुल वेणी मध्ये कोंबून आली होती मी उत्तर दिले
अरे कोंबून नाही रे वेड्या!!!!!!!!दिनू मध्येच म्हणाला
त्याला मळणे अस म्हणतात
मुलींना जन्मापासून सुंदर दिसण्याचा आजार असतो चेहरा काळा जरी असला तरी आरसा जणू काही त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांना बाकी कुणी दिसत नाही त्या आरश्या शिवाय एकट्याच आरश्या समोर बसून केस कुरवाळत असतात
संजू माझं आणि वर्गातील प्रत्येक मुलाचं पहिलं प्रेमच जणू काही!!!दिसायला गोरी गोरी पान , खाकी पावडर सुद्धा फिक्की दिसेल तिच्या समोर अस काही रूप तीच, मन मोहक असे डोळे थोडे निळसर कुणीही बघून प्रेमात पडेल नेहमी केसात गुलाबाचे फुल किंवा रात-राणीच्या फुलांचा0 गजरा मळून संपुर्ण वर्गात त्याचा सुगंध दरवळत असायचा वर्गात प्रवेश करताना जर नाकाला त्याचा सुगंध आला की समजून जायचं वर्गाची परी राणी अवतरली आहे तिला डोळेभरून बघण्याची ओढ असायची. तिच्या गजऱ्याचा एक वेगळा अर्थ सुद्धा होता तो काही सांगता येणार नाही मंडळी.... पण तुम्ही तो मला कळवू शकता
उत्तराची प्रतीक्षा असेल मला???
दहावीच्या वर्गात असताना घरी अभ्यास करता येत नसे सतत काहीतरी अडचण येत असायची माझी बुद्धी जशी बुरशी लागलेली तिचा कधी वापर झालाच नाही सगळं डोक्यावरून जात असायचं मग बाबांनी शिकवणी लावली शिकवणीचा खर्च उचलण्याइतपत आम्ही काही श्रीमंत नाही बाबा पिठाच्या गिरणीवर काम करायचे तेव्हा दोन आणे शेर पीठ मिळायचे आणि शिकवणी ची फी दोन रुपये इतकी आणि शिकवणी चे गुरुजी एकदम हिटलर सारखे त्यांना बघूनच सर्व मुलं घाबरून जायची दिसायला अगदी खुंखार रात्रीच्या स्वप्नात जरी आले तर सकाळी अंथरून ओल ओल झालेलं असायचं एक वेगळीच दहशत होती त्यांच्या आवाजात आणि शिकवणीला जाण्याची इच्छा नसायची पण योगा योगाने संजू सुद्धा तिथेच शिकवणी घेण्यासाठी येत असे.
शालेय शिक्षणात मी फारसा काही हुशार नव्हतो आणि चित्रलेत तर अगदीच भोपळा घेऊन येत आणि चित्रकलेचे गुरुजींनी मला भोपळा नावच ठेवले होते पण माझा मित्र दिनू नेहमी माझी समजूत काढायचा आणि माझं कौतुक करायचा मी नापास जरी झालो तरी दिनू मला हसवायचा आणि म्हणायचा अरे मी आहे ना तुझ्या जोडीला कशाला घाबरतो आणि खर म्हणजे हा दिनू खुप लबाड होता याने मला एकदा येऊन सांगितले की संजूला तू खुप आवडतोस आणि संजूला जाऊन सांगितले की गण्या ला तू खूप आवडते म्हणजे दोघांच्या रेल्वे सुरू करून दिल्या दिनू ने पण आम्ही कधी हिम्मतच केली नाही एकमेकांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची आम्ही दिवस भर एकमेकांना डोळे भरून बघत असायचो कधी ती मला गपचूप बघत असायची आणि मी फळ्याकडे बघत गुरुजींना त्रास देत असायचो आणि कधी मी तिच्या कडे एकटक बघत असायचो जेव्हा तिला कळायचे तेव्हा एक झलक देत गोड असे स्मित हास्य करायची नकळत हळू हळू संपुर्ण वर्गातील मुलांना ही बातमी समजली पण शाळेतली मुलं शेवटी कधी सुधरणार्यातली नसतात हे माहीतच आहे त्यांनी लगेचच मला संजू च्या नावाने चिडवायला सुरुवात केली आणि संजूला माझ्या नावाने त्यांना एक भलताच आनंद मिळत असावा पण मला ते सहन होत नव्हते माझा राग आवाक्याबाहेर जाऊ लागला आणि प्रेम वैगेरे काही नसतं फक्त आकर्षण असत हे स्वतःलाच समजावू लागलो .
परीक्षा तोंडावर होती आणि माझं लक्ष विचलित होत होते आणि त्याच काळात संजूने तिच्या प्रेमाचे पत्र आणून दिले मला काही कळेना संजू चांगल्या घरातली आणि मी मध्यम वर्गातील सुद्धा नाही मी तिच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार संपुर्ण आयुष्य कस काढणार या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर सापडलं की या सर्व गोष्टीला कुठे तरी आळा बसला पाहिजे मी ते पत्र न वाचताच संजू ला परत दिल आणि तिला समजावून सांगितलं आयुष्य खुप मोठ आहे क्षणिक आकर्षणाने आयुष्य खर्ची जाऊ नये म्हणून योग्य वेळेतच मार्ग बदलायला हवा आणि तो माझा आणि संजू च्या आयुष्यातील शेवटचा दिवस निघाला त्यानंतर संजू ने मला तिचा चेहरा कधी दाखवला नाही आणि मी सुद्धा तिचा चेहरा बघण्यासाठी कधी गेलो नाही हृदयात तिच्यासाठी खुप भावना होत्या पण त्यांचा नाईलाजाने अंत करावा लागला कदाचित तो चांगल्यासाठी सुद्धा असेल हरकत नाही
जर आपल्या एखाद्या निर्णयाने समोरच्या व्यक्तीचे नुकसान टळत असेल तर तो निर्णय घेण्यात हरकत नाही आणि आपण सुद्धा कधी स्वार्थी विचार करू नये अशी माझी भावना आहे
लवकरच दहावीच्या परीक्षा कालावधी सुरू झाला मी अजून सुद्धा संजूच्या विचारातून बाहेर निघालो नाही मी तिला शरीराने लांब तर केले परंतु तिचे विचार अजूनही डोक्यात घर करून होते दिवस रात्र नजरे समोर तीच तीच आणि फक्त तीच त्या मुळे अभ्यासात काही लक्ष लागेना आणि अखेर परीक्षा सुरुवात झाली आणि योगा योगाने दिनू माझ्या पुढील बाकावर आला मला वाटलं जणू देव माझ्यावर प्रसन्न झालाच असावा पण त्या दिवशी मला दिनू चा खरा चेहरा जाणवला मराठीचा पेपर आणि मानसिक त्रासाने वाचन काही लक्षात राहीलं नाही आणि प्रत्येक परीक्षेत असा एकही विद्यार्थी नसेल की त्याने रिकाम्या जागा स्वतः पाठ करून लिहल्या असतील रिकाम्या जागा विचारूनच लिहतात बहुतेक त्यातील मी सुद्धा एक
मी दिनू ला विचारलं दिनू उत्तरे सांग ना ?????
जर मी तुला उत्तरे सांगितली तर तू माझ्या पुढे जाशील आणि मला ते कदापि सहन होणार नाही स्वतः चा अभ्यास स्वतः कर आणि उत्तरे लिहून पास हो !!!!! दिनू ने उत्तर दिलं
मला हे उत्तर ऐकून जरा धक्काच बसला माझा जिवलग मित्र मला अशी उत्तरे देतो म्हणजे नक्कीच मी माणसे ओळखण्यात कुठे तरी चुकतो
त्यानंतर संपूर्ण परीक्षेत दिनू सोबत एकदाही बोलणे झाले नाही आणि दिनू ने दहावीच्या परीक्षेत ८०% मार्क मिळवले पण मी कुठे तरी कमी पडलो भरकटलो आणि ३९% मार्क घेऊन निराशेने घरी आलो तेव्हा मला कळून चुकले की.......
आयुष्यात आपले लक्ष विचलित करणारे खुप क्षण येतात आणि आपण त्यांच्या सोबत भरकटले जातो त्यामुळे आपल्या शैक्षणिक आणि पारिवारिक जीवनावर त्याचा ठसा उमटला जातो जो कधीही पुसता येणार नाही जणू असा काही आणि त्यामुळेच एकच ब्रीद वाक्य लक्षात ठेवावे "एकटा जीव, सदाशिव"