एक कल्पना
एक कल्पना


ती कशी असेल ही एक कल्पनाच आहे दररोजच एक कल्पना मनात येते कशी असेल. ती दररोज माझ्याशी बोलते पण बोलत असताना त्याच मन वेग वेगळ्या कल्पना रंगवत म्हणजे नक्की कस ते पुढे सांगतो सुरुवात झाली बलिप्रतिपदा या दिवशी चाळीत एक पाहुनी मुलगी आली कळत नकळत दोघांनी एक मेकांना पाहिलं जास्त काही बोलणं झालं नाही पाहिल्याच क्षणी एकमेकांच्या नजरेला नजर भिडली आणि मग काय सुरू झाले एक नवीन पर्व!!!!!!! एकमेकांचे नंबर तर घेतले पण पहिल्यांदा फोन करण्याचे धाडस कोण करणार? असेच दिवस लोटत गेले. एके दिवशी एक फोन येतो समोरून अतिशय कोमल असा आवाज येतो! कसा आहेस? मला नक्की कळलेच नाही नक्की कोण? मी विचारले आपण कोण? उत्तर आले तुझी मैत्रीण! विचारात मग्न असताना तिकडून प्रश्न आला विचार काय करतोस बोलणार आहेस की नाही? नंतर ओळख पटली.
ती त्याला दररोज फोन करू लागली एकमेकांच्या आवडी निवडीची विचार पोस चालू झाली त्या दोघांच्या मध्ये खूपच साम्य होत जी गोष्ट मुलाला आवडते तीच गोष्ट मुलीला सुद्धा आवडायची दोघांच्या मध्ये या गोष्टीवरून खूप गप्पा रंगायच्या अगदी पायाच्या नखापासून तर केसापर्यंत साम्यता निघायला लागली पण जेव्हा सर्व गोष्टी आपल्या मना सारख्या असल्या की त्या गोष्टीला किंमत राहत नाही हे खरं आहे त्या मुलाला ती खुप आवडू लागली दोघांनी भेटण्याचे ठरवले पण दोघांच्या मध्ये एकमत होत नव्हते नक्की भेटावे तरी कधी आणि मी कावरा बावरा होत चाललो होतो खर म्हणजे आज काल मुली अस काय व्यसन लावतात मुलांना की मुले वेडी होऊन जातात त्यांच्या मागे माझे कोणत्याही मुलीचे मन दुखवण्याचा उद्देश नाही कथा काल्पनिक आहे याचा कोणत्याही जिवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही असल्यास तो निव्वल योगा योग्य समजावा मी तिला धमकवून भेटण्यास बोलावले आम्ही एका चहा घेण्यासाठी एका हॉटेलात गेले. तेव्हा मी तिला सांगितले की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आपण लग्न करूयात का? एवढा भोळेपणा मुलीने या आधी कधीच पहिला नव्हता तिने त्याला सांगितले की तू खुप घाई करतोस इतकी घाई नको करुस आपले पूर्ण आयुष्य पडलंय हे वय आपलं मौजमजा करण्याचं आहे आणि मला इतक्यात लग्न नाही करायचं मला खूप मोठा धक्का बसला त्याला नक्की कळेना की चाललंय काय? होतंय काय? मी तिला विचारलं की तू मस्करी करतेस ना माझी? तिने नकारार्थी मान हलवली. माझे हातपाय थंड पडले मला सुचेनासे झाले होते. तिने माझी समजूत काढली की हे वय लग्न करण्याचे नाही तर एन्जॉय करायचे आहे. या वयात एन्जॉय नाही करणार तर कधी एन्जॉय करणार आम्ही दोघे चहा न घेताच बाहेर पडलो मला कळत नव्हते काय करू तरीही मी स्वतःला सावरत तेथून घरी आलो.
आईने ओळखलं चेहरा पडला होता नक्की काहीतरी घडले होते पण मी आई ने काही विचारण्याच्या आधी घरातून बाहेर निघून गेलो बाहेर जाताच मित्राला फोन केला त्याने विचारलं काय रे? आवाज असा का येतोय तुझा? मी... काही नाही भाऊ जरा टेन्शनमध्ये आहे त्याने खुले आमंत्रण दिले चल मग तुझे टेन्शन कमी करण्याच्या ठिकाणी जाऊ या आम्ही निघालो मद्यप्राशन करायला इंद्र देवसुद्धा स्वर्गात सोमरस घेतात म्हणे आम्ही सुद्धा घेऊ एक एक प्याला घरी गेल्यावर आईला सुगंध येऊ नये म्हणून सुगंधी वेलची हा एकमेव साधन. बेवड्यांचा घरी पोचल्यावर आईला समजलेच शेवटी पोरगा दारू पिऊन आलाय म्हणून शेवटी आई ती तिनेच जन्म दिलाय तिला कळणार नाही असे होणारच नाही दिवस लोटत गेले माझा आणि तिचा संपर्क संपत आला होता मला सावरायला वेळ लागला पण मी सावरेन लवकरच पण ती कशी आहे याची कल्पना नव्हती जर प्रेम म्हणजे एन्जॉय असेल तर ती कल्पना नकोच असेल मला कायमस्वरूपी पण लवकरच माझ्या आयुष्याची ध्येय माझ्यासमोर येऊन ठेपली मी पुन्हा मार्गस्थ झालो सध्या ती तिच्या आयुष्यात सुखी आहे आणि ती कायम सुखात राहावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.