अर्धवट...
अर्धवट...
पहिल्यांदा पाहताच कुणी प्रेमात पडत का??
हा प्रश्न मी नेहमी स्वतःला विचारत असतो आणि त्याच उत्तर नकळत कधी सापडत सुद्धा नाही.
कारण मला माहीत आहे मी प्रेमात पडलो होतो.
कामावरती पहिला दिवस नेहमी सारखाच घरातून डब्बा घेतला आणि चालत निघालो आणि कंपनीच्या दारावर सुंदर देखणी ती उभी होती. कुणाची तरी वाट बघत असावी. आणि नेहमी प्रमाणे मी गेट मधून आत जाण्या आधीच तिने आवाज दिला.
अहो!!!!!! तिने आवाज दिला
माझ्या मनात कॅडबरी चे दोन्ही लाडू एकत्रच फुटले.
नकळत गुलाबाचं फुल उमगलं. कदाचित क्षणिक असेल पण तो क्षण मनाला मोहनारा होता.
मी उत्तर दिलं "बोला"!!!
"आज माझा कामावर पहिला दिवस आहे आणि आत कशी जाऊ हे काही कळत नाही
भीतीने हात पाय गार पडलेत तुम्ही मला आत पर्यंत सोबत याल का"??? तिने मला विचारलं
हे वाक्य ऐकून मी स्वप्नात तर नाही ना असा भ्रम पडला. सकाळी उठून अंघोळ तर केली होती. पण स्वप्नात सुद्धा एवढा भयंकर प्रसंग कधी घडला नव्हता.
मी मिलिंद स्टोर मॅनेजर आहे. इथे "मी" ओळख करून दिली.
मी प्राजक्ता रिसेप्शन डेस्क साठी आले आहे.
तिला बघताच मी तिच्या प्रेमात पडावं हा मोह आवरेना मला.
तीच शब्दात वर्णन करण्यायोग्य ती नाहीच मुळी,
गोरी गोरी पान, हिरव्या पैठणीच्या कापडाने शिवलेला चुडीदार ड्रेस, कानात घंटी असलेले लांब कानातले, उजव्या हाताला अडकवलेली नवीन कोरी पर्स, डाव्या हातात प्लास्टिक ची पिढवी पोटाला धरून, माथ्यावर लाल गंध, आणि मखमली ओठावर साजेल अशी लिपस्टिक, आणि कोवळ्या कोवळ्या पायात नवीन अशी सँडल. अश्या रुपात कोण भुलणार नाही सांगा.
मी तर पाहता क्षणीच भुललो.
ओळख झाल्यानंतर प्राजक्ताला विचारलं इथं पर्यंत कसे आलात???
"बाबा सोडून गेले" तिने उत्तर दिलं.
कंपनीतल्या दोन चार मुलींच्या सोबत तिची ओळख करून दिल्या नंतर प्राजक्ताचा एकटेपणा कमी वाटू लागला. पण माझा आणि तिचा जेवायला जायचं वेळ ठरलेला असायचा. आधी मी एकटा जेवायला जायचो पण जेव्हा पासून प्राजक्ता माझ्या आयुष्यात आली आणि माझं उभं आयुष्य बदलून टाकलं.
दुपारी दोन च्या सुमारास दररोज एकत्र जेवायची सवय एक दिवस मी डब्बा नाही आणला आणि जेवायला जायची इच्छा नसल्याने कामात गुंतून राहिलो. तिने १० मिनीटे वाट बघिल्यानंतर मला शोधत शोधत माझ्या स्टोर पर्यंत येऊन पोहचली.
मी तिला बघताच शब्द निघेनासे झाले.
चला जेवायला मी केव्हाची वाट बघत बसले तिकडे???? प्राजक्ताने कठोर आवाजात विचारलं.
मला काही उत्तर सुचल नाही.
डब्बा नाही आणला मी!!!
चला मी आणलाय आपण जेऊया. अस म्हणून माझ्या हाताला धरून तिने मला ओढत कँटीन मध्ये घेऊन गेली.
पुरण पोळ्या आणल्या होत्या माझ्यासाठी आणि मी आज डब्बा आणायला विसरलो होतो.
संपूर्ण कंपनी मध्ये चर्चा रंगली होती आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्या चर्चे मधला सार मला आवडत होता. मला प्राजक्ता आवडत होती. मला तिने जगण्याची उमेद दाखवली होती. आयुष्यात कुणासाठी तरी जगावं अशी ती होती.
तिच्या सोबत जगताना आपल्या आयुष्यात दुःख नाहीच असा भास होत असायचा पण कदाचित क्षणिक असावा.
मला पुरण पोळ्या चारत असताना तिने विषय काढला.
आई बाबानी माझ्या साठी मुलगा बघितला आहे. सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कामाला आहे ५०-६० हजार रुपये पगार आहे. आणि मला सुद्धा तो आवडतो. तू माझा जिवलग मित्र आहेस मला काही सुचेनासे झाले आहे.
पुरण पोळीचा अर्धा घास तोंडात आणि अर्धा घास हातात. तिच्या चेहऱ्यावर जराशी पण चिंता दिसत नव्हती पण माझ्या चेहर्यावर बारा मात्र नक्की वाजले होते. तिने एवढा मोठा निर्णय मला सांगण्यामागचं कारण काय असाव हे मी जाणून घेण्याआधीच निथुन निघालो.
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती विचार केला की सोमवारी भेटून तिला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगून टाकेन कारण वेळ हातात होती.
सोमवारी कंपनीच्या दरवाज्यावर वाट पाहिली पण प्राजक्ता काही आली नाही.
मला वाटलं लग्न ठरलं म्हणून तिने कदाचित नोकरी सोडली असावी म्हणून मी पण तिला विसरण्याच्या मार्गावर निघालो . पण राहून राहून तिने दिलेल्या प्रेमळ आठवणी सतत डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या म्हणून कंपनीच्या क्लर्क ला सांगून पत्ता मिळवला.
उद्या सुट्टी घेऊन तिच्या घरी जायचं ठरलं. सकाळी नित्यनेमाने कार्यक्रम पार पाडून निघालो.
तिच्या दारात मांडव घातला होता. वाटलं लग्नासाठी घातला असावा. मनात हूर हूर वाढत होती पाऊले जड होत होती तरीही तिच्या दाराजवळ पोहोचलो. पण तिथे वेगळंच दृश्य होत. कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. मी एका काकुला विचारलं काय झालं इथे???.
काकूने उत्तर दिलं
प्राजक्ता गेली!!!!!!!!!!
माझ्या पायाखालची जमीन हादरली. डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. तिच्या बाबांनी घरातून पाणी भरून तांब्या आणला आणि माझ्या डोळ्यातील अश्रुधारा सुरू झाल्या. मी काय बोलू आणि कशी सुरुवात करू मला काही सुचेना.
तिच्या बाबांना विचारलं नक्की त्रास काय होता तिला???
त्यांनी उत्तर दिलं "कंपनीत एका मुलावर प्रेम होतं तिचं"
बस एवढं ऐकून कान शांत पडले.