Mitesh Kadam

Children Stories Crime Inspirational


3.5  

Mitesh Kadam

Children Stories Crime Inspirational


डोरूक...

डोरूक...

4 mins 269 4 mins 269

नमस्कार मंडळी...

सादर करत आहे एक लहानशी कथा...


कथेची सुरुवात होते एप्रिल १९९३ ला शालू गर्भवती होती, ७ महिने झाले होते. घरची परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे शालूला बाजूच्या गावी कामासाठी जावं लागतं होते. डोरूक गर्भात असताना काही कल्पना नसावी बाहेरच्या जगात काय चालू आहे याची पण लवकरच बाहेरच्या जगाशी सामना होणार होता.

सुरुवात झाली अमावस्येच्या दिवशी शालू रात्री कंदील घेऊन बाजूच्या गावी जात होती तेव्हा घरोघरी मातीच्या चुली असायच्या. माणूस बाहेर गेला की येताना लाकडांचा भारा घेऊनच येत असायचा म्हणजे जिवंत झाडे तोडावी लागणार नाहीत याची खात्री घेतली जात होती. परंतु सध्या झाडे लावली कमी जातात आणि तोडली जास्त जातात.

काही काळानंतर एक वेळ अशी येणार आहे की येणाऱ्या पिढीला झाडे काय होती हे फक्त इतिहासाच्या पुस्तकात पाहायला मिळतील आणि श्वास घेण्यासाठी कृत्रिम बाटल्यांचा वापर केला जाईल. माझे सर्वांना निवेदन आहे की दर महिन्याला एकतरी झाड लावून त्याची पोटच्या मुलाची जशी काळजी घेतो तशी काळजी घ्यावी. जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला येईल.


तर झाले असे की शालू कंदील घेऊन रात्रीच्या अंधारात बाजूच्या गावी जात होती. तेव्हा पाऊलवाटा असायच्या. रस्त्याला विजेचे खांब नसायचे. कंदील हातात घेऊन जावे लागत असे. शालू घरातून संध्याकाळी ७ च्या सुमारास निघाली. दोन गावात मिळून एक किराणा दुकान असायचे. त्यामुळे काही लागल्यास बाजूच्या गावी जावे लागत असे. संध्याकाळी तेल संपलं असल्यामुळे शालू बाजूच्या गावी निघाली. जाताना शेतातून येणारी माणसे आवाज देत जात होती.

शालू कुठे निघालीस एवढ्या रातच्याला???

तेल संपलंय घेऊन येते गावातून, असे म्हणून शालू पुढे निघाली.


तेव्हा गावी पाऊलवाटा असायच्या त्यामुळे दुसऱ्या गावी जात असताना शालूला रस्त्यात एक काथ्याची गोणी दिसली. कुणीतरी लाकडे भरून ठेवलेली असावी, असा तिच्या मनात विचार आला. ती त्या गोणीला ओलांडून गेली. परत जाताना चूल पेटवण्यासाठी लाकडे घेऊन जाऊ. कोणी नेणार तर नाही एवढ्या रात्री, कोण येणार इकडे म्हणून...

वजन घेऊन शेजारच्या गावी जाण्यापेक्षा आधी तेल घेऊन येते मग जळण घेऊन जाते.


शालू तशीच चालत चालत बाजूच्या गावी जाऊन परतली. येताना रस्त्यात माणसांचा घोळका दिसला. कंदिलाच्या पुसट उजेडात कुणी स्पष्ट दिसत नव्हते.

त्यावेळी सर्पदंशाच्या घटना खूप घड्याच्या. अशीच एखादी घटना घडली असावी, त्याकरीता शालू पुढे सरसावली आणि घोळक्याजवळ पोहचली. तिने ते दृश्य पाहताच तिच्या पायाखालची जमीन निसटली. तिने बघितलं मघाशी ज्या गोणीला शालू जळणाची गोणी समजत होती, त्यामध्ये एका तरुण मुलीचा मृतदेह त्या गोणीत बांधून ठेवला होता. शालूला धसका बसला तिला कळलेच नाही की नक्की झालं काय...


शालू तशीच पटापट पाय टाकत घरी गेली. पण किती केल्या त्या निरागस मुलीचा चेहरा सतत डोळ्यासमोर येत होता. काही दिवसांनी बातमी आली. शेजारच्या गावातील काही टवाळक्या पोरांनी तिची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती. शालूला जरा धक्काच बसला होता. तिला खूप वाईट वाटत होतं त्या निरागस मुलीसाठी...


काही दिवसांनी शालूला मुलगा झाला. एकदम गोरा गोरा पान देखणा अगदी चाफ्याच्या फुलासारखे गाल होते त्याचे. शालू खूपच आनंदी होती त्याच नाव डोरूक ठेवलं होतं. डोरूक नेहमी एकट्यात हसायचा, एकट्यात खेळायचा. शालूला कधी कधी शंका यायची की आपलं मूल एकट्यात का हसतं????


खरंतर ती निरागस मुलगी त्या डोरूकसोबत खेळत असायची. ती फक्त डोरूकला दिसायची, त्याच्यासोबतच खेळायची. हळूहळू डोरूक मोठा होत होता आणि शालू त्याला नेहमी विचारायची, बाळा तू कोणाशी बोलतो, कोण आहे तिकडे... डोरूकला जास्त बोलता येत नसायचे तो फक्त ताई बोलायचा...

असेच दिवस लोटत गेले आता डोरूक शाळेत जात होता. तो त्या निरागस मुली सोबत बोलत असल्यामुळे शाळेत सर्व त्याला चिडवायचे, त्याला वेडा वेडा म्हणायचे. शाळेतून अनेक वेळा शिक्षकांनी शालूला निरोप दिला की, तुमचा मुलगा डोरूक एकट्यात बडबड करत असतो. त्याच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना???


तरीही शालूने मनोरुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतला. डोरूकला औषधोपचार सुरू केले. परंतु, त्याचा काहीही उपयोग होईना. डोरूक शिक्षणात खूपच हुशार होता. त्याला प्रत्येकवेळी वर्गात प्रथम येण्याचा नेम कधी चुकलाच नाही. कालांतराने डोरूक ने १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली.


एकदा डोरूकने त्या निरागस मुलीची कथा ऐकण्याचे ठरवले. आता डोरूक सज्ञान झाला होता आणि त्याला योग्य अयोग्य यातील फरक उत्तमरित्या समजत होता. त्याने ताईला विचारलं, ताई तू फक्त मलाच का दिसतेस... आईला दिसत नाही...


तिने सुरुवातीपासून कथा सांगण्यास सुरुवात केली...


१९९३ साली तिच्यासोबत जे जे घडलं तिने सविस्तर सांगितलं आणि कसं शालूची आणि तिची भेट झाली. जेव्हा शालू तेथून जात होती तेव्हा त्या निरागस मुलीमध्ये जीव होता. परंतु, शालूला गैरसमज झाला असावा. त्यानंतर ती शालूसोबतच आली. डोरूकच्या जन्मापर्यंत ती शालूसोबतच होती. त्यानंतर ती डोरूकसोबत खेळायला लागली आणि तेव्हा तिला कळलं की डोरूक मला पाहू शकतो आणि त्यानंतर तिने ठरवलं की माझ्यासोबत ज्या लोकांनी चुकीचं केलं त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. तिने डोरूकला सर्व हकीकत सांगितली.


डोरूकने निर्णय घेतला की त्या टवाळखोर लोकांना कायद्याने शिक्षा देईल.


डोरुकने त्या निरागस मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलीचे शिक्षण घेतले.


पण बरेच वर्ष उलटून गेल्यामुळे ती टवाळखोर पोरं आता वृद्ध झाली होती. तरीही आपल्या ताईला मुक्ती मिळावी म्हणून त्याने न्यायालयात खटला दाखल केला. परंतु काहीच पुरावा नसल्यामुळे डोरूकला खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं. पण आज त्याला खरे पुरावे सापडले. त्या निरागस मुलीने डोरुकला सांगितल्याप्रमाणे ती हत्यारे जमिनीत पुरून ठेवलेली सापडली आणि त्या सर्व नराधमांना वयाच्या ५० व्या वर्षी तुरुंगात टाकण्यात आले. आणि अखेर त्या निरागस मुलीला न्याय मिळाला.


Rate this content
Log in