Shrikant Kumbhar

Abstract Classics Inspirational

4.5  

Shrikant Kumbhar

Abstract Classics Inspirational

नागपंचमी

नागपंचमी

1 min
238


    नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेलेत।

   १. नागराजा अनंत (शेष)

   २. नागराजा वासुकी 

   ३. नागराजा तक्षक

   ४. नागराजा कर्कोटक

   ५. नागराजा ऐरावत


     ह्या पाच ही नाग वंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती.


     यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.


     त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरो पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.


    तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.


    चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.


    पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.


    ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या.


    पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या जन्म स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोकांनी "नागपंचमी" दिन दरवर्षी साजरा करीत असत.


    कालांतराने वैदिक ब्राम्हणी यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर जमिनिवर सरपटणार्या सापात करुण टाकले.

     त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या सापांची पंचमी म्हणून ओळखली जावू लागली आणि वास्तविक नाग वंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली.


    आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही.


    हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटनारे सर्प नव्हेत.


    आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract