Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shrikant Kumbhar

Others


5.0  

Shrikant Kumbhar

Others


एका मुलीचे आदर्श विचार

एका मुलीचे आदर्श विचार

2 mins 924 2 mins 924

👇🏼असे विचार असलेल्या मुलीला.

   माझा एक मानाचा मुजरा🙏🏼


बाबा - " बाळा तुला हे स्थळ पसंत आहे ?"


मुलगी - "हो बाबा छानच आहे. नावं ठेवण्यासारखं काय आहे तिथं ?"


बाबा - "हो, पण घर बघितलंस का, कसलं साधं आहे ? दगडमातीचं ! त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत."


मुलगी - "म्हणून काय झालं ?"


बाबा - "त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे ? एवढा मोठा बंगला, नोकर चाकर, २/३ गाड्या ! नुसता आरामच आराम !"


मुलगी - "ते स्थळ नको."


बाबा - "का ?"


मुलगी - "मी त्या मुलाशी बोललेय. त्याचे काही प्लॅनच

नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी. तिथं गेले तर

माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेलच असे नाही. सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलंय. नवीन काय करायचं

म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही ही शंका ! त्याचं स्वतःचंच अजून काही ठरलेलं नाही...


त्याउलट आजचं स्थळ बघा ना ! सगळ्या गोष्टी अजून

प्राथमिक स्टेजला आहेत. चांगलं घर नाही, घरात

कुठल्याही सुखसोयी नाहीत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव !" 


बाबा - "पण रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल. धारा काढाव्या लागतील, गोबरगॅसमध्ये शेण घालावं लागेल."


मुलगी - "मला आवडेल... स्वतःचा संसार उभा करायचा तर कामं ही करावी लागणारच. यश आणि सुख हे सहजासहजी मिळत नाहीत."


बाबा - "अगं, पण सगळं सुख तुला तयार मिळेल ना, 

परवाच्या स्थळाचा विचार केलास तर !"


मुलगी - "तेच तर नकोय... मी केवळ इतरांनी मिळवलेल्या ऐश्वर्याचा उपभोग घेत राहिले तर माझं अस्तित्व कुठं राहिलं ? "


 बाबा - म्हणजे ?"


मुलगी - "मलाही श्रीमंत व्हायचं आहे पण ते स्वतः

प्रामाणिकपणे कष्ट करून आणि ही संधीही सर्वत्र मिळत नाही. हा मुलगा चांगला आहे. निर्व्यसनी आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा आहे. लहानपणी वडील वारले ही खूप मोठी हानी झाली त्याची. बापाचं छत्र नसतानाही तो डगमगला नाही, भरकटला नाही. स्थिर राहिला. एक दिवस जगात माझंही नाव करून दाखवीन म्हणाला. सगळे माझे विचार... एकमेकांचे विचार जुळले की संसार सुखाचाच होणार. 


एक बैल कामसू आणि दुसरा आळशी झाला की चांगली मशागत कधीच होणार नाही. तसंच संसाराचंही आहे. आता त्याच्याकडे किंवा माझ्याकडे काहीच नाही. पण दहावीस वर्षांनंतर आमच्याकडेही गाडी असेल, बंगला असेल; त्यावेळी आम्हांला अभिमानाने सांगता येईल की

यातली प्रत्येक काडी आणि प्रत्येक वीट आम्ही आमच्या कष्टाने मिळवलेली आहे. अभ्यास करून नंबर मिळवण्यात खरी मजा असते ! काँपी करुन पास होण्याला काय अर्थ....? 🤔 नुसतं खाऊन पिऊन लोळणं याला जर कुणी सुख म्हणत असतील तर ते सुख मला नकोय. "


Rate this content
Log in