Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

मराठी_भाषा_दिन

मराठी_भाषा_दिन

3 mins
216


मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी , ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.


लीळाचरित्र हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला.

संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात,


माझा मराठीची बोलू कौतुके।


परि अमृतातेहि पैजासी जिंके।


ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।। 


असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. ज्ञानेश्वरीत कर्म आहे; पण कर्माची कटकट नाही. ज्ञान आहे; पण ज्ञानाचा रुक्षपणा नाही. भक्ती आहे; पण ती भोळ्या अज्ञानाची नाही. असं नितांत सुंदर मराठी भाषेचे रूप ज्ञानेश्वरीत आपल्याला दिसून येते.


सर्वप्रथम संतांनी त्यांच्या साहित्यामधून मराठीचा जागर केला व मराठीचे दालन संत विचारांनी समृद्ध केले. त्यांच्या संत साहित्यामधून समता मानवता. जातीभेद विरोध अंधश्रद्धा विरोध याचा पाया रचला गेला.. 


छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६०[१३] मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.


याच़ काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.


या काळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केलया. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.


मराठी भाषेमुळेच सर्वसामान्यांना आधुनिक भाषेची ओढ व जाण निर्माण झाली. त्यामुळेच राज्यात प्रबोधनाची चळवळ जोमाने वाढली. त्यामुळेच आज महाराष्ट्र प्रगतीपथावर घोडदौड करत आहे. मराठी ही ज्ञानभाषा आहेच तसेच ती तंत्र व विज्ञानाची भाषा देखील हीआहे .मराठीने देश-विदेशातील विविध भाषांमधून अनेक शब्द आपलेसे करून स्वतःची समृद्धी वाढवली आहे. जागतिक क्रमवारीत मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. देशातही मराठी चौथ्या क्रमांकावर आहे. राज्याने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना केली आहे. यामध्ये स्वतंत्र मंत्री व राज्यमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. या विभागाअंतर्गत मराठी भाषा विषयक काम पाहणारे, अनेक साहित्यिक संस्था मराठी विश्वकोश शब्द मंडळ ही कार्यालय कार्यरत आहेत. 1964 च्या नियमानुसार मराठी भाषेचा प्रशासनामध्ये सक्षम वापर करण्यासाठी विभागाकडून विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात येतात सद्यस्थितीत राज्य शासनाचा प्रशासकीय कारभार मराठीत सुरू आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे ही सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीची परंपरा लाभली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी राज्याकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. भाषेची प्राचीन ता मौलिकता आणि सलगता तिचे आधुनिक रूप याचा सर्वांगीण विचार करून अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. नाशिक येथे पार पडलेल्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली होती. विज्ञान कथाकार डॉक्टर नारळीकर यांची निवड करून मराठी भाषेतील विज्ञान विषयक लिखाणाचा एक प्रकारे सन्मानच करण्यात आला आहे. 


महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.[

अशा प्राचीन परंपरा लाभलेल्या विविधतेने नटलेल्या ज्ञानविज्ञानाच्या दालनात सहजतेने विहार करणाऱ्या मराठी भाषेचे भविष्य नक्कीच उज्वल आहे. यामध्ये शंका नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract