STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
140

मराठमोळ्या अविष्काराचा

हुताम्यांच्या बलिदानाचा

ऐतिहासिक वारसांचा

    महाराष्ट्र माझा. !!


प्रेरणादायी इतिहासाचा

प्राचीन अशा संस्कृतीचा

सिंहद्वारातील प्रहरींचा

      महाराष्ट्र माझा. !!


संत-महंत ऋषी मुनींचा

शूरवीरांच्या पराक्रमाचा

त्याग देशप्रेम परंपरांचा

     महाराष्ट्र माझा. !!


हिंदवी स्वराज्य स्थापनेचा

त्या भगव्या झेंड्याचा

उसळणाऱ्या क्रांतीचा

     महाराष्ट्र माझा. !!


समाजसुधारक स्वातंत्र्यवीरांचा

बाणा मराठी साहित्यिकांचा

कणखर स्वाभिमानाचा

       महाराष्ट्र माझा. !!


उत्तुंगतेच्या भरारीचा

योगदानाच्या जाणिवांचा

वैभवशाली प्रगतीचा

      महाराष्ट्र माझा. !!


ग्रंथ आणि संत संस्काराचा

 आदर्श राजा शिवरायांचा

 अप्रतिम निसर्गसौंदर्याचा

         महाराष्ट्र माझा. !!


अभिमान खाद्य संस्कृतीचा

 प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा

 संगम असे हा विविधतेचा

         महाराष्ट्र माझा. !!


लावणी पोवाडे कोळीगीतांचा

 नाटक रंगभूमी नाट्यगीतांचा

राकट कणखर कलाकारांचा

         महाराष्ट्र माझा. !!


ऐतिहासिक वारसा जतनाचा

 गडकिल्ले पर्यटनाचा 

भौगोलिक वैभवाचा 

         महाराष्ट्र माझा.!!


लढणाऱ्या थोर सुपुत्रांचा 

अनेक भाषा संवर्धनाचा

 नात्यातील गोडव्याचा 

         महाराष्ट्र माझा. !!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract