Deore Vaishali

Abstract Romance

2.6  

Deore Vaishali

Abstract Romance

मनकवडा तो कृष्णसखा

मनकवडा तो कृष्णसखा

2 mins
83


कोणी हलकेच तिला ,

छेडिले तो पाठिराखा होतो,

संकटात सोबतीने,

साथ तिला तो देतो...


कधीतरी सहजच तीचे

मन तो घेतो वाचून,

हळहळणार्या तीच्या वेदनेवर

फुकर घालतो हदयातून....


मनकवडा तो कृष्णसखा

तीला हवाहवासा असतो,

समाजासाठी मात्र ती त्याला

एका चोरकप्यात ठेवते...


संग त्याची त्या सईला

देते जादुई रजई,

तोही सुखावतोच जेव्हा

सुखी होता त्याची सई...


किती छान सुरेल असत त्याच व तिच नातं ...मध्यान वयात फुलणार...कधीतरी संशयाच वलय जरी त्याला असलं...पण दोघांच पावित्र्य जपत दोघांनीही जपलेल...

तोही असतो रमलेला त्याच्या संसाराच्या वाटेवर,

तीही रमतेच हो जबाबदारीच्या रस्त्यावर...

दोघांचीही वाट सुखकरच असते...

मनीच्या पटलावर दोघांनाही उणिव एकमेकिंची भासते...

मग एखाद्या वळणार येताच दोघे समोर...

पुन्हा फुलू लागते मैत्रीचा भावविभोर...

कौतुक,काळजी ,सहारा,कधी सुचनाही असतात बर .

दोघांच्याही संसारात एकमेकांची बरीच होते मदत..

कधी रुसलेल्या जीवनसाथीला मनवायची ती देते शक्कल...

बोलता बोलता कधीतरी तोही ओळखतो तीच्या मनातील वेदना तळ...

भावनांचे गाठोडे मग ती सहजच सोडते त्याच्या पुढ्यात...


मनकवडाच असतो तो...!


कधी नटखट कान्हा बनतो छेडतो तीला ...


कधी सारथी बनतो संसाराची सुचवितो लिला...

कधी अचानक आनंदाचे क्षण तिच्या ओजळीत टाकतो..

कधी स्वप्नवत नगरीत तीला गुंतायला लावतो...

कधी सांभाळतो तीला आपल्याच जीवाहुन जास्त..

कधी आवखळ ,खट्याळ लिलांनी खुलवितो जीवन तीचं...


पण काळजी तिचकीच घेतो हं..! तीची ...

बदनामीला तो फार घाबरतो...

त्याच्या कृष्णसखीला तो प्राणाहूनही जपतो...

तिच्या शिलाला ठेच तो कधीच लागु देत नाही ...

मनकवडा तो कृष्णसखा तीला एकटीला कधी सोडत नाही....


संसाराच्या गराड्यात कधी सुटतात सुखाचे क्षण,जबाबदारीचे कोंदण देते दबाब निरंतर..

.कधीतरी तीलाही जरा विरंगुळा हवा असतो...तो मनकवडा ह्या उतारवयात तीची छेड काढत असतो...नसतो काही स्वार्थ त्याचा फक्त तीला सुखात बघायचं असत...सुरकुतलेल्या गालावर हसू पुन्हा फुलवायचं असतं...जे सुटत दोघांच्या नजरेतून ते कृष्णसखा टिपत असतो...तीही त्याच्या जबाबदारीची सतत जाणिव करून देत असते...

दोघेही असतात एका परिपूर्ण वाटेवर ...तीच्याही झोळित असते सुखाची सुरेख अशी सुंदर सर...तोही रमलेला असतो त्याच्या संसाराच्या पसार्यात...पण दोघांचे ही बंध आजही असतात बांधलेले एका सुंदर नात्याच्या धाग्यात...


तो धागा असतो कृष्णसखा किंवा कृष्णसखीचा...!


प्रत्येकाच्या जीवनात कृष्णसखा किंवा कृष्णसखीची जागाच असते हो खास..

कस्तुरी मृगासारखा असतो नात्यांमध्ये वास...

खेळकर,आल्लड,खळाळत राहत जीवन...

दोघेही आपल्या बंद कुपित जपतात एकमेकांच हदय....

प्रामाणिकपणे ,निसिम,पवित्रतेला डाग न लागु देता,जपतात एकमेकांचे शिल ...

समाजात कधी आपली प्रतिमा गढुळ होणार नाही ह्याच एका वचनात नात्याचे पावित्र जपत...

निकंठ मैत्रीचा खजाना अजीवन साठवत...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract