Deore Vaishali

Classics Inspirational

4.0  

Deore Vaishali

Classics Inspirational

जीवनाचा धडा

जीवनाचा धडा

2 mins
253


आयुष्य सुरळीत चालू असतं पण कधीतरी कुठेतरी आपला विश्वासघात होतो.भल्या मोठ्या संकटात आपण फेकले जातो,विश्वासू व्यक्तीचं आपली फसवणूक करतात... 

त्यावेळी आपणं खचतो,....

जवळचीच माणसें, नातलग,मिञ सहकारी सारेच दूर लोटू लागतात.. 

काही जवळ असूनही दुर्लक्ष करतात...

तेव्हा मग मनात एकटेपणाची भावना फोफावते...

एकटं एकटं वाटतं....

संकटांचा महापूर येऊ लागतो...

एक संपल की लगेचच दुसरं संकट दारात उभं असतं...

परिस्थिती समोर जीव हतबल होतो...

नको तेथे गुडघे टेकले जातात....,

नको त्या व्यक्तींसमोर हात पसरावा लागतो...

अपमान, तिरस्काराचा सामना करावा लागतो...

बरेचदा स्वाभिमान दुखावला जातो...

नको तेथे हात जोडावे लागतात...

नको तेथे माफीही मागावी लागते...

गरज पडली तर त्या व्यक्तीसमोर कारण नसताना माघारही घ्यावी लागते ...

मग मन बेचैन होतं..आपली चुक लक्ष्यात येते , आपण टाकलेला अती विश्वास, दाखवलेला आपलेपणा,आपण केलेल्या वेळेचा अपव्यय सारंच मनात खदखदू लागतं....

वेदनेचा भडका होतो...

मनस्वास्थ्य खराब होत...झोप उडते,दिवस रात्र विचारांचं चक्र सुरू असतं... 

डोकं,मन,शरिर सारंच थकतं...

त्याक्षणी वाटतं संपलं सारं.... !!

 दुर कुठेतरी निघून जावं किंवा जगणच असह्य होत...


पण....


एक मन घट्ट असतं, का?करावं असं...

का?द्यावी आपल्यालाच आपण शिक्षा...

तेव्हा वेदना मग बोथट होतात.. सहनशीलता वाढते... 

आणि संकटांवर मात करत चालण्याची सवय होऊ लागते...

भावनांचा निचरा होतो,मन घट्ट होऊ लागतं...

त्यापरिस्थितीशी चार हात करतांना मग ती व्यक्ती पोळून निघते...

आग,धग,घाव, वेदना, सहनशीलता, प्रयत्न ह्यातून तोलून सुलाखुन निघते...त्

या व्यक्तीचं एक वेगळंच रसायन तयार होतं...

हो हो... घडलेल्या घटनांपासून जीवनाचा धडा घेऊन होणारी नवनिर्मिती असते ती ...अजब गजब अशी..

अगदी त्या धारदार शस्त्राला जशी ऐरणीचे घाव सोसल्यावर येते तशीच...

मग 

त्या नवतरीत व्यक्तिमत्वाला ना? कुणाच्या नसण्याचा फरक पडतो ना असण्याचा...

तो आता फक्त आपल्या पुरताच उरलेला असतो....

"मी एकटा आहे व एकटाच लढेन"

ह्या विचारांचा पगडा पाडून घेतो....

तेव्हा तो हारत नाही, अपमान, विश्वासघात, बदनामी, चर्चा यालाही भिक घालत नाही...

आता फक्त आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवून...

बाहुत बळ आणुन पुन्हा शुन्यातून उभा रहातो...

" ऐ जिंदगी तु कितना भी रूला ...हम नहीं हारंगें.."

असं म्हणतं पुन्हा उभारी घेतो....

हे ....शहाणपण तेव्हाच येत ...

जेव्हा तो आयुष्यात जोरात आपटतो...

ठेच लागते.... 

विश्वासघात होतो...

आपल्या माणसांचे खरे चेहरे समोर येतात....

ह्या अनुभवातून तो "जीवनाचा खरा धडा शिकतो".


त्यासाठी जीवनात एकदा वरिल अनुभव यायला हवा...

त्याशिवाय काय?मनाला जखम होईल व मनाची जखम भरायला इतक्या शक्तीनीशी माणुस उभा राहिलं..


आयुष्याचा हा टप्पा शिकवून जातो बरंच काही मग जीवनात हरायची भिती उरत नाही..

ठेच लागल्यावर जिद्दीने उभं रहात...हसत संकटांशी मैञी करत माणुस सावरण शिकतो हाच "जीवनाचा धडा".

एका बाजूचा सारं संपत असतांना नविन प्रवाहात रूळत नविन आयुष्याची सुरुवात होते ..

जीवनाच एक पर्व संपत व दुसरं पर्व सुरू होतं...

त्यामुळे मन जरी रक्तबंबाळ झालं ना?तरी हारू नका..

जीवनाची ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच व यायलाच हवी..

त्याशिवाय मनाला बळकटपणा येत नाही...

पुन्हा स्पुर्तीने,नव्या जोमाने लढायचं बळ त्यानेच तर मिळतं...

हेच तर जीवन आहे मिञमैञिणिंनो...!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics