लोक काय? म्हणतील
लोक काय? म्हणतील
"अगं ये सरला ...समजवं तुझ्या लेकाला , अगं समाजात रहायचं आहे आपल्याला ह्याला काय?दोन बुक शिकला व शहाणा झाला..".
"अहो पण ऐकून घ्या ना?... त्याचं म्हणणं जरा थंड डोक्याने विचारपुर्वक सोडवू शकतो ना?...उगाच घरात वाद नको मला"
"म्हणजे? मी वाद घालतो म्हणायचं का?तुला , अगं तुझ्या त्या गुणी मुलाला बघं...काय दिवे लावतो तो..."
"अहो..जरा शांत व्हा ना?..त्याचंही ऐकून घ्या , लोकांनी सांगायचं व तुम्ही ऐकायचं,जरा मुलांवर विश्वास ठेवा.."
"अगं लोक नाही..माझी माणसं आहेत ती..."
"अहो भाऊ तुमचा ...त्याला मुलांबद्दल कधी बरं प्रेम होतं.."
"आता तु विषय भरकटवू नकोस...तो त्या पोरीसोबत कुठे फिरत होता ते सांग फक्त .."
"हे ...सारंग काय?विचारतो मी ...तु त्या मुलीसोबत इतक्या राञी काय?करत होतास?"
"अहो बाबा ..सायंकाळचे सात वाजले होते... किर्ती एकटी होती..मी तीला घरी सोडायला गेलो होतो बसं.."
"अरे गळ्यात हात टाकून.."
"काय बाबा माझी चांगली मैत्रीण आहे ती..जरा बिनधास्त आहे बसं..मी तीला सोडलं तेव्हा तिच्या घरचे सारेच होते त्यांना विचारा की.."
"अरे पण असं बाईकवर मुलींना बसवून फिरणं चांगलं दिसतं का?...शामाकाका मला काय ?म्हणाला माहित आहे का?".
"अहो बाबा ,मला लोक काय म्हणतील याचं नाही पडलं..तुम्ही काय?विचार करता याचं देणं घेणं आहे बसं.."
"शामाकाकाने जो दंगा घडवायचा तो घडवला ना?..अहो आम्ही आताची मुलं..मुलगा -मुलगी,चांगले मित्र होऊ शकत नाही का?.. किर्ती माझी. मैत्रिणी आहे...हो आहे जरा बिनधास्त,पण तीतकीच हुशार, आपल्यासारख्या मोठ्या समाजातील नाही..पण मला त्या मैञित काही वावगं वाटत नाही बघा...निखळ अवखळ मैञी आमची जशी तुमची व ज्या काकांची तशीच फक्त येथे फरक स्ञीपुरूष यांचा आहे...एक मर्यादा आहे येथेही...दोघांची बदनामी होणार नाही हा विश्वास ही ...पण लोकांच्या नजरेत जर खोट असेल यक्ष आम्ही का?आमची मैत्री तोडायची ...तुमचे संस्क
ार आहेत ना?त्यावर विश्वास ठेवा व बघा ना?... लोकांच्या मानसिकतेचा विचार करणं सोडा, त्यांना चांगलं बघवत नाही, लोकांच्या गोष्टीत नाक खुपसायची सवय असते त्यांना.. तुम्ही तुमचं मत मांडायला शिका, आपल्या मुलांवर विश्वास ठेवा हो...जर शामाकाकाला वाटतं तसं असेलच तर मी तुमच्याशी स्वतः हून बोलेल ना?वडिल आहात तुम्ही माझे..."
सारंग वडिलांना समजवत होता.. त्यांच्या बोलण्याने खरंतर जयदेव जरा शांतच बसले .सारंग लहानपणापासून हुशार व हुन्नहरी होता...शामाचे मुलं तसे सो...सो..मग पुर्वी पासुन कायमचं जयदेवला मुलांबद्दल सुनवणं त्याच काम...कालही तसंच झालं... सारंग व किर्तीला बघितलं.. किर्ती शामाच्या बाॅसची मुलगी व त्यांच्या इगोच दुखावला असणार येवढ्या मोठ्या माणसाची मुलगी गाळाला लागली तर ...काय?असतात ना?राव माणसं नको तो विचार करतात... गोष्ट शिल्लक पण नको तो गैरसमज जयदेव घ्या मनात भरून घरी आरामात बसला व ईकडे वाद सुरू.आता जयदेव नेच ठरवलं लोकं काय? म्हणतील त्यापेक्षा आपल्या संस्कारांवर विश्वास ठेवायचा...करू दे कि मुलांना त्यांच्या मनासारखं चौकटीत बसत असतील त्या गोष्टी करण्यापासून का?आठवायचं त्यांना...उगाच घरात अशांतता परसवायची ...
जयदेव ने सारंगला जवळ घेतलं व मोठ्या मनाने
"sorry"..बोलत म्हणाला.
"सारंग चुकलं माझं.. आजवर लोक काय? म्हणतील ही भिंती होती मनात पण आता ती निवळली बरं माझा माझ्या संस्कारांवर विश्वास आहे....पण काही असेल तर वेळीच सांग हं...भाऊ ..नाहीतर डायरेक्ट गृहप्रवेश.."
सारंग लाजतच म्हणाला,"काय?बाबा येवढ नाही हो करणार "
सगळे जोरात हसलेल...
खरंच ना? लोकांच्या धास्तीने कितीतरी कलह, कितीतरी घरात गैरसमज व नको ते वाद घडून येतात का?उगाच लोकांचा विचार करावा बरं...जरा मनाशी मनाचा संवाद करावा तेच योग्य अयोग्य असे मार्गदर्शन करते कि?लोकांना चांगलं बघवत नाही तस वाईट गोष्टीला टोकल्याशिवाय होतं नाही...हा समाज आहे सहजासहजी जगू देत नाही... बरोबर ना ?
तुमचं मत जरूर कळवा बरं....!
धन्यवाद