Deore Vaishali

Classics Inspirational

3  

Deore Vaishali

Classics Inspirational

ती खंबीर बनली

ती खंबीर बनली

3 mins
157


गौरीचा सासरच्या घरातला पहिलाच दिवस होता .लाडात व ऐश्वर्यात वाढलेली गौरी देवच्या प्रेमात पडली खरी पण ह्या घरी ती जमवून घेईल का ?तीची जागा मिळवेल का?हि धास्ती तिच्या आईवडिलांना होती ...


लग्नाच्या दिवशी तिचा हात देवच्या हातात देतांना गौरीचे बाबा देवला म्हणाले होते,


"जावईबापु माझं सार वैभव व सारी धनसंपत्ती जरी संपली तरी चालेल पण माझ्या गौरीला जपा बर ...काळजापेक्षा जास्त जपलंय मी आजवर तीला .."


देवनेही तेव्हा वचन दिले होते ,"नक्किच बाबा गौरीला मीही जीवापाड जपेन ..कोणतीही तक्रार तुमच्यापर्यन्त येणार नाही .."


देवचाही जीव होता गौरीत म्हणुन तर घरच्याच्यां विरूध्द जात गौरीशी लग्न केल होत व घरच्यांनाही मनवल होत त्याने...


आज सकाळीच उठल्याबरोबर सासूबाईंनी गौरीसमोर कामाची यादी ठेवली होती ...सासूबाई व जावूबाई मिळून गौरीला ह्या घरात टिकू द्यायच नाही असाच प्लाँन करत होती त्याचीच हि सुरवात होती ...गौरी बिच्चारी कधी कामाची सवय नसणारी पण देवच्या प्रेमाखातर त्याची माणस आपलेसे करण्याचे देवला वचन देवून बसली होती व त्यावचनाला तिला खर उतरायच होत..


देव तसा गौरीला म्हणत होता ," झेपेल तितकच कर गौरी नाही जमलसं तर सोड व कोणाच बोलणं मणाला लावून घेऊ नकोस ..."


असच सांगत असे पण गौरी हि साधी भोळी आणि भोळसट ...देव घरातला लाडका मुलगा मग काय देवची बायको म्हणुन कुठेच कमी पडायच नाही हेच तीने मनातून ठरवल होत...हातात येईल व जावू व सासूबाई सांगतील ती काम गौरी खाली मान घालून करू लागली होती ...


तस घरात सार्याच सुखसोयी होत्या .कामवाल्याही होत्या ...पण गौरी कशी देवसाठी बरी नाही हेच सिध्द करण्यासाठी घरात रोज नवा डाव सजत होता ...देवसामागून दिवस सरत होती गौरी तिच्यापरिने सार्यांना खुश करण्यासाठी धडपडत होती ...पण सासुबाई व जावू देवसमोर गौरीच वेगळच चित्र उभ करत होती ...त्याची सुरवात तर कामवाल्या बायांपासून झाली होती ...


गौरीला खरच कामवाल्यांचा प्रोब्लेम नव्हता पण गौरीनेच सांगितल कि माझा वेळ जात नाही मग मिच ती काम करेन अस म्हणतं त्याना नोकरीवरून काढल होत... नवी नविन लग्न झालेली गौरी काम व घरसंसारात पुरती अडकली होती व हौसेने करत होती ...पण ती करत असलेली कामे किती निकृष्ट व त्रासदायक आहेत त्या खोड्या आता सुरू झाल्या होत्या...रोज घरात गौरीवरून नवा वाद सुरू होऊ लागला होता ...


गौरी तर सर्व चांगल्यासाठीच करत होती ..सासुबाई व जाऊबाई म्हणाल्या होत्या ,"आपण तीन बायका घरात कामे किती पटदिशी होतील कशाला हवीत ती कामवाल्यांची नाटक ..व सार गौरीच्या माथी टाकल होत.."


घरात होणारी कोणताही वाईट घटना दोघीही शिताफिने गौरीच्या नावावर खपवत होत्या ...

आजही तसच झाल होत ..देवला त्याच्या मित्रांना पार्टि द्यायची होती ..पण ती बाहेर हाँटेलमध्ये ...जावूबाई गौरीला म्हणाली,"गौरी अग भावजींचा एवढा खर्च होईल त्यापेक्षा घरीच कर पार्टी आम्ही आहोत मदतीला व तुझ्या हातच जेवण जेवलेत तर तुझच कौतुक होईल कि .."


गौरीही भाबडी तीने तसच केल पण ऐन पार्टीच्या दिवशी दोघींनी काम काढुन घरातून बाक्हेर पडायचा प्लाँन केला ...गौरी गोंधळली व सार्या पार्टीचा विचका झाला ...देव गौरीवर चिडला ..आता देवही गौरीच्या बाजुने उभ राहणं टाळू लागला ...


"तुच तुझ झेल सारा शहाणपणा तुच करतेस का?ऐकत नाही आई व वहिनीच ...जरा त्यांच्या आनुभवाचा फायदा घे ..लगेचच सत्ता हवी का ?तुला घरात ..त्यांनाही मान देत जा .."


देव गौरीला आता सुनवू लागला होता .घरातल राजकारण आता गौरी समजून चुकली होती ..आजवर छान छान करणारी व सासूबाई व जाऊबाईच्या पुढे पुढे करणार्या गौरीने तिचा सहनशिलतेचा व चांगुलपणाचा मुखवटा बाजुला सारत नवीन खेळ त्यांच्याच खेळात खेळ्याच ठरवल होत...


दुसर्या दिवशी गौरीने घरकामाला बायांची सोय केली होती ..त्याचबरोबर कामाचीही वाटणी केली होती ..मला एकटीला सार काम जमणार नाही जावूबाई तुम्ही मला मदत करायची आपण खेळीमेळीने करु ना ?...अस म्हणतं तीचच शस्त्र तीच्याच विरूध्द वापरायला सुरवात केली होती ...शांत संयमी लाघवी गौरी आता ...तीच्या अस्तीत्वासाठी खंबिर झाली होती ...


काहीवेळेस आपलीच नाती आपल्याला नको त्या चक्रव्युहात आडकवतात वआपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात....नाती आपलीच असतात आपण त्या गोष्टिंकडे दूर्लक्ष करतो पण कालांतराने आपल्या चागुलपणाच्या ह्या गोष्टींमुळे मनाला आघात होतो आपण खचतो...आणि तीच वेळ असते तो चांगुलपणाचा मुखवटा फेकुन त्या सार्या घटनांचा वचक घ्यायची ...कारण आपल्या चांगुलपणाच्या आड बरिच कटकारस्थाने चालू असतात ..वेळिच ते ओळखुन आपणच मुखवटा बदलायची गरज असते ...बरोबर ना ?..



माझे लेखन -चांगुलपणाचा मुखवटा काढुन फेकला




Rate this content
Log in

Similar marathi story from Classics