Deore Vaishali

Fantasy Inspirational

4.5  

Deore Vaishali

Fantasy Inspirational

आज खरंच स्वातंत्र्य आहे का ती

आज खरंच स्वातंत्र्य आहे का ती

3 mins
283


घरातील शांत वातावरणाचा मृणालला वैताग आला होता .काय?चुकलं कोठे चुकलं ह्यातच ती गुरफटलेली होती .फक्त एका गोष्टीचा निर्णय तिने घेतला होता बस ...तोही तिच्या स्वतःच्याच कमाईचा व स्वतःच्या मर्जीने ...तरिही अस व्हावं...सर्व घरातील मंडळींनी तीला चुकिच समजावं...आज स्वातंत्र्य भारतात लोकशाहीत एखाद्या व्यक्तीला व्यक्तीस्वातंत्र्य नसावं हिच शोकांतिका होती..


मृणाल एक उच्चशिक्षित कमवती तरुणी .एका उच्चभू सोसायटीत सून म्हणुन आली ..मंदारही तसा स्वतःच्या पायावर उभा ...घरची परिस्थिती म्हणाल तर कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हतीच हो ..!पैसा,घर ,बंगला,गाडी सोबत घरातील चौघही जण कमवते ....


मृणाल लग्न करून घरी आली सासूबाई म्हणाल्यात,"मृणाल तु तुझ्या विचारांनी स्वातंत्र्य आहे तुला जे करायचं त्याचा निर्णय तुच घ्यायचा ...येथे सर्वांना सारखाच अधिकार आहे आजवर मीही मला जे वाटल तेच करते ..तुही तसच कर ..फक्त योग्य कि अयोग्य याची कल्पना देऊ शकतो बस...तु तर आताची। मुलगी तु तुझं काय?ते ठरवायचं बर ..!"


मृणालला आनंदच झाला,आईवडिलांकडे साधी गोष्ट करतांना सगळ्यांची मत मतांतरे विचारली जात होती व आज इकडे किती सोपं सार ...


ती सहजच म्हणाली,"मम्मी अहो मी पगारातला काही भाग घरखर्चासाठी देईन ..कारण आजपासून मीही वाढले ना ?घरात.."


सासरे म्हणाले,"नको ग मृणाल मंदार बराच खर्च करतो तुला वाटल ते आणत जा खास पैसे देण्याची काही गरज नाही ..आपल्या घरात असे काही बंधण नाहीत ज्याला जे योग्य वाटत ते करून मोकळ व्हायचं..घरात कशाची खुपच गरज पडली तर ती तु आणु शकतेस हं..!पण सुनेचा पगार वापरण योग्य नाही वाटत.."


मृणालला किती आनंद झाला होता त्यावेळी पण आजची परिस्थिती किती वेगळी होती ...

परवा मृणालच्या बाबांकडे खुप मोठा प्रोब्लेम झाला ..खरतर मध्यमवर्गिय कुटुंबात एखादी गोष्ट घडली तर त्याचा समाज काय ?म्हणेल हाच विचार केला जातो तसच झालं मृणालचा लहान माऊ मयंक शेअर टेर्डिंग करत होता छान पैसे कमवत होता ..व वडिलांना त्याचा आधारही होत होता .मृणालच लग्न करून रिटायर्मेंटचे चार पाच लाख रूपये हिच जमापुंजी होती ..छान आनंदी परिवारात एक वादळ आल आणी गडगडलेल शेअर मार्केट आचानक पडल ..हातातले पैसे डुबलेत खरे पण वरून लाखाचा भुर्दंड बसला ..बाबा तर कोसळलेत आधार देणारी फक्त मृणाल ...ह्या आर्थिक धक्याने त्याना हदयविकाराचा धक्का आला व सारा परिवार कोलमडला भाऊ मयंक स्वतःला दोष देत होता ..त्याची माधसिकता ठासळत होती ...डाँक्टर म्हणाले ,"मयंकला वेळीच सांभाळल नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल ".मग काय बहिण ह्या परिस्थितीला धावून गेली


आजवर मृणालने जवळपास तीन एक लाखाच सेव्हिंग केल होत ..तीने सढळ हाताने आई व मंदारकडे ते सोपवलं ..शिकवल वडिलांनीच होत...सासरचे तसे मुक्त विचारसरणीचे होते ते काही बोलणार नाहीत असच गृहित धरल तीने...परिस्थिती सावरली व डगमगलेला परिवार पुन्हा सावरला ...


पण बाबा मृणालच्या घरच्यांना सहजच बोलले,"खरतर हे जीवन मृणालची देणं आहे तीने वेळिच मदत केली नसती तर आज आम्ही रस्त्यावर आलो असतो .."


आणि ह्याच गोष्टीने घरात शांतता पसरली ..मंदार म्हणाला ,"तुझे पैसे आम्हाला नको पण नवरा म्हणुन मला विचारायला हवं होत..."


सासरे म्हणाले,"एका घरात राहातो एका शब्दाने तुला आमच मत घेतात्रनाही आलं...अग ते पैसे तुझे होते ते तु जसे दान केलेस..आता मंदार व तु एकच ना ?ह्या पैशांवर त्याचाही तितकाच हक्क होता ..."


ती फक्त बोलली ,"आई बाबा व मंदार अरे हे पैसे माझ्या लग्नाआधीच्या सेव्हिंगस होत्या त्या मी खर्च केल्या अस समजा मी नोकरीला आता लागली ..कारण आईबाबांना त्यांची जास्त गरज होती ..तुम्हीच म्हणता ना ?आपल्या घरात सारे सावतंत्र्य आहेत मग घेतला मी निर्णय पैसे माझे होते ..."


मग काय वाद विवाद सुरू झालेत... आणि घरात अबोला आला .खरतर माहेरची जबाबदारी मुलीचीही असते तिने केली मदत तर चुकलं कुठे..पण लग्नानंतर ते सुख व स्वातंत्र्य नसत मुलीला हेच मुलाने केल तर कोणी एक शब्दही बोलला नसता बरोबर ना?...


सगळीकडे स्वांत्र्याचा डिलारा पिटणारे काहीवेळा छोट्या छोट्या गोष्टीत विरोध करतात ...मुलगी असो कि स्त्री तीच्या सर्व निर्णयात एकतर माहेरचे व नंतल सासरचे लुडबुड करतात ...बोलतांना म्हणतात तु स्वतंत्र्य आहे पण आजही ती तेवढी स्वतंत्र्य नाही हं..!



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy