Deore Vaishali

Tragedy

3  

Deore Vaishali

Tragedy

व्यसनाधीनता

व्यसनाधीनता

3 mins
203


गणपत डोक्याला हात लावून बसला होता,कारण ही वेळ त्यांच्यामुळेच आली होती....सरिताला ह्या परिस्थितीत बघून मुलं भांबवली होती...काय? करणार होती ती इवढीशी पोरं आईला फक्त हक्का मारण्यापलिकडे काही नव्हतं त्यांच्या हातात...


सिध्दी व जय सरिताला हालवत जोरजोरात म्हणतं होती,"आई ये आई उठ ना?..., कुणीतरी आईला उठवा ना?.."


पण रोजचाच घरातला राडा बघून कोणी शेजारी-पाजारीही घरात घुसायची हिम्मत करत नव्हते...

शांताने हिम्मत करून दरवाजाच्यातून मुलांना ढुंकून बघितलं तर सरिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती... मुलांचा आक्रोश बघून काही विचार न करता ती पटकन घरात घूसली...जवळ पडलेल्या साडीला फाडत तीने डोक्यावरून वाहणाऱ्या रक्ताला थांबवण्याचा प्रयत्न केला....

"सदा ...रखमे....दादा... तात्या."..अशी सगळ्यांना तीने जोरात अरोळी दिली... शांतीचा आवाज ऐकून आवाजाच्या दिशेने ते सारे धावत आले...सरिता बेशुद्ध पडली होती...


रखमेंने मुलांना आपल्या कावेत घेतलं..सदाने सरिताला हलवून बघितलं..


"आक्के... उठं गं बायें...काय? करून बसली गं,उठ ना?माय..".


तीची कोणतीच हालचाल होत नव्हती..सदाने तीला स्वतःच्या कावेत उचललं...


"शांताक्का...चाल बाय पुढं डाक्टरला उठिव.. तोच काय?ते करू शकतो गं...पोर आईला पारकी होतील गं.."


शांती सदाच्या पुढं पळू लागली..पण सरिताच्या डोक्याला जबर मार लागला होता... सिध्दी व जय आता बापाकडे बघ बोट दाखवून रडत होती...


"आईला बाने मारलं.....आई पैक्क देत नव्हती ना?...शाळला फि भरायची व्हती....आईने दिनभर काम करून कमवलं होत पैक्क...व लपवले होते डब्ब्यात पण बा ला माहित झालं होतं... म्हणून तो ते काढत व्हता व माय ते पैक्क हिसकावत व्हती...बा ला बी पैक्क दिलं व्हत आईनं... अजून दारू प्यायची व्हती त्याला...का?, मारलं रंग बा तु ...तु वाईट आहेस बघं...तु लोटलं ना आईले.. म्हणून आई भिंतीवर पडली व लागलं...जा तु येथून...रखमा मावशी हा आम्हाला बी मारेल नाही रहायचं आम्हाला येथे...".


रखमेने पोरांना पोटाशी धरत तीच्या घरी नेलं... मुलं बिथरली होती.तोवर आजूबाजूची जाणती लोक जमली होती.. मुलांना धीर देत होती..


"सिध्दी, जय..सदामामा आहे ना?गेला ना?तो दवाखान्यात घेऊन आईला बरं वाटलं बघा... आम्ही आहोत ना?नाय मारणार बा तुम्हाला.."


सरिता दवाखान्यात व गणपत जेथे बसला तेथेच बसून होता...त्याची दारू खाडकन उतरली होती... झालेल्या चुकिचा पश्चात्ताप झाला होता... तो उढला हंड्यातून तांब्याभर पाणी घेतलं... डोक्यावर ओतलं व सैराभैरा दवाखान्याच्या दिशेने पळत सुटला...सारी गर्दी गणपतला बघत होती...पण त्याला सरिताला काही होवू द्यायचं नव्हतं...


धापा टाकत तो दवाखान्यात घुसला...डाक्टरांनी डोक्यावर टाके घालते होते पण सरिता बेशुद्ध होती...तो सरिताच्या बेडजवळ गेला व ढसाढसा रडू लागला...


"ये सरिता डोळं उघडं गं....मी आजपासुन नाय लावणार दारूला हात...तुझी शपथ बाय...शांताक्का व सदा हाय साक्षिला तु डोळं उघडं ना माय...पोरांसाठी गं...मी नाय पिणार...लय वाटोळं केलं गं त्या दारून ...आज तुला मरणाच्या दारात नेलं बघं मी....".


शांताक्का व सदा गणपतला धीर देत होती...तोच सरिताचा कहण्याचा आवाज आला...शांता ,सदा व गणपतने डोळे पुसलेत ... गणपत धावतच सरिताजवळ गेला...


"सरिता ...आता नाय पिणार मी ...तुझी शप्पथ बाय..शिवणार बी नाय मी दारूला, पोरांना मोठं करायचं तुझं सपन पुर करू ...तु लवकर बरी हो..."


सरिताने डोळे भरून आले होते पण त्यात गणपतला कळलेल्या चुकीच्या समाधानाने..शांताक्काने सरिताच्या डोक्यावरून हात फिरवला...


"सरि..जे व्हतं ते ब-याकरता व्हतं,आता मागच्या गोष्टी उगाळायच्या न्हायतं...गणपत तु बी सुदर बा...बायको गमवून बसला असता रं पोरा ह्या दारूपायं...लय नालायक असती बघ दारू...आता सरिता वाचली ना?...जातील हे दिस पुढं सुखात रहा रं बाबांनों...".


दोघांनीही मान डोलावली...


व्यसनाधीनता खुपच भयानक गोष्ट,एकदा व्यसन लागलं तर सुटणं अवघड...व्यसन परिवार, इज्जत सारंच नष्ट करत बघा..‌कधीकधी जीवघेणा खेळही खेळत त्यामुळे व्यसनापासून कायमचं दोन हात दूर रहा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy