Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Deore Vaishali

Tragedy


3  

Deore Vaishali

Tragedy


दैव जाणिले न कोणी

दैव जाणिले न कोणी

2 mins 165 2 mins 165

जीवनाच्या लढाईत ,

पाठलाग हा अस्तित्वाचा...

यशाचा डोंगर करुन सर,

पाठशिवणीचा असतो खेळ सुख दुःखाचा....


मानवी जीवन जगणे नसें सोपें ...जिवनाच्या लढाईत सतत सुख दुःखाचा पाठलाग होत असतो . त्यातून स्वतःला सिध्द करण्यासाठी धडपड करत मानव यश मिळवत असतो...पण त्यात कधी तरतो तर कधी अस्तित्व संपतही....


यशोदिप एक मध्यमवर्गीय माणूस एका कंपणीत कारकुन म्हणून काम करत असे...दोन गोड मुल व संजिवनी ही समजदार अर्धांगिनी ...दोघांचीही परिस्थिती साधारण लग्न झाल्यावर आई वडिलांनी यशोदिपला स्वतः च्या पायावर संसार थाटायचा सल्ला दिला...कमी पगार व दोन जीव पण संसार करुन दाखवायचा हे ध्येय ठेवून आनंदाने दोघांनीही घर सोडल व नोकरीच्या ठिकाणी भाड्याने खोली घेतली...संजीवनी ही कष्टाळू.. तीनेही संसारास हातभार लावण्यासाठी शिवणकाम सुरू केले. दोघांची मेहनत रंग घेत होती.. पै पै...जोडत होते.. दोन पैसे मागे टाकून स्वतः चे घर घेणे हे त्याचे पहिले स्वप्न ...ते पुर्ण करण्यासाठी यशोदिप खुपच कष्ट करत होता... त्यातच त्यांना गोड कन्यारत्न प्राप्त झाले...खुशीत आणि आनंदाने संसार करत असताना मुलीच्या पायगुणाने त्यांनी दोन रुमचे घर ..स्वतः चे घर झाले होते... हाती दोन पैसे हाती खेळत होते.... यशोदिपलाही पगारवाढ झाली होती.... संजीवनीच्या हाताखाली दोन बायका कामाला होत्या त्यात मुलाच्या येण्याने परिवाराला पुर्णत्व आलं होत....


यशोदिप व संजिवनीने साधारण परिस्थितीत स्वतः ला सिद्ध करुन दाखवल होत... मुल चांगल्या शाळेत शिकत होती. सारी सुखे आता पायाशी होती... घर, गाडी,ऐशोआराम सार होते....पण " खेळ कुणाला ना ह्या दैवाचा कळला"ह्या ओळींप्रमाणे...सार चित्रच पलटल...दोघांचाही सुखासाठी होणारा पाठलाग आता संपला होता व दुःखावर मात करण्यासाठीचा पाठलाग सुरु झाला होता...


आज संजीवनी अस्वस्थ होती. कारण पहिल्यापासुन थोडासाअसलेला खोकला वाढला होता. .."बाबा घरी या आईला बर नाही "...असा फोन येताच यशोदिप सुट्टी टाकून घरी आला ...पण चित्र काही वेगळच होत.. संजीवनी रक्ताच्या उलट्या करत होती... त्यांनी तातडीने दवाखाना गाठला ...काटकसरी संजीवनीला कॉन्सर झाला होता .संसारात सगंत करणारी जीवनसंगिनी आपल्यासोबत सार्या सुखदुखात सोबत करत होती... तिला बर करण्यासाठी त्याने शर्यतीचे प्रयत्न चालु केलेत..कमवलेला पैसा व सार संपल तरीही चालेल...हे त्याने ठरवलं... सारे मित्र नातेवाईक त्याला बोलत होती... पण सारे डॉक्टर, वैद्य कुणी काही सांगितले ते उपाय यशोदिप करत होता... आजचा दिवस उद्यावर फक्त असच चालू होते.. पण संजिवनीचे दिवसेंदिवस हाल होत होते एक एक अवयव निकामी होत होता.. तिच्या आजारपणाने त्याच्या कामावर परिणाम झाला होता... नोकरीही गेली होती... पण तीला वाचवण्यासाठी त्याचा पाठलाग चालुच होता... पण तीच्या तब्येतीत सुधारणा नव्हती... संजिवनीने आज यहलोकाचा प्रवास केला होता अखेर आठ वर्षाचा त्याचा दैवाशी असलेला पाठलाग संपला होता.. मोठ्या हिम्मतीने संसारात साथ करणारी व्यक्ती व मिळालेले वैभव दोघेही उतरावर लागले होते......


Rate this content
Log in

More marathi story from Deore Vaishali

Similar marathi story from Tragedy