Deore Vaishali

Tragedy Classics Inspirational

3  

Deore Vaishali

Tragedy Classics Inspirational

चुकतं का? आपलंच कुठेतरी

चुकतं का? आपलंच कुठेतरी

3 mins
355


"अगं काय आई तु पण ना ..कोणी सांगितल होत तुला माझ्यासाठी थांबायला ..उगाचच मागे लागतेस बघ...तुझ जीवन तु जग ग मलाही जगू दे ना यार...नको करूस इतकी चिंता ..".


शमाला दुफारी पोरगा बोलला .जरा मनालाच लागल बघा तिच्या ..आई म्हणून कुठे चुकल बर तिचं..मुलासाठी सार सोडल ना तिने ..कधीच बाहेर पडली नाही का ?तर माझं पोरगं प्रेमात कमतरता नको ..गरम जेवण ,मायेचा ओलावा व सारच भेटावं त्याला हिच फक्त अपेक्षा ...

मातृत्वाची चाहुल लागली तरी चार अंकी पगारावर पाणि सोडल होत तिने ..आज त्याच्या लहरी वागण्यावर जरा टोकल तर तिचीच चुक दाखवली त्याने...जरा अस्वस्थ झाली ती पण मनाला सावरत म्हणाली

"जाऊ ..दे,हे कधीतरी होणारच होत मोठा झाला तो,त्याच भलबुर कळत त्याला ..."..


सार विसरून मनातून स्वतःला समज घालत चेहेर्यावर कोणतीही शिकंत न ठेवता कामात व स्वतःत देंग झाली...

सायकाळ झाली..नवरा कामावरून दमुन भागुन येणार भुकही लागली असेल त्याला मग पटकन नाश्ता करायला घेतला .तोच शेजारची मिना बोलवायला आली,"शमा अग सावंताकडे हळदीकुंकु आहे ..कालच वहिनी सांगून गेल्यात तुलाही बोलवल चालतेस का?"


शमाने बघितल नवरा येणार मग मी नसेल घरी तर किती पंचाईत होईल ..नकोच जायला काय ?वाटेल आपण घरी नाही ते बघून..

"नही जमनार गं, मिना..हे यायची वेळ झाली नाश्ता द्यावा लागतो गं बी पी आहे ना त्यांना उगाच हायपर होतील बघं.."


मनातून खुप वाटत होत मैत्रिणींमध्ये रमाव व जरा बिनधास्त फिराव पण मनाला आवर घातला तीने मिना गेली बिनधास्त ..तीच्याही घरात मूल व नवरा होती पण तीला स्वतःच आयुष्य जगायच होत ...

तोच शमाचा नवरा आला तीने पाणी दिल तोच तो म्हणाला,"अगं आज नाश्ता व चहा झाला बर का?..एक मित्र भेटला त्याने दिली पार्टी .."


शमाचा चेहेराच पडला ..आपण आपल्या ईच्छा अकांक्षा सारच मारून ह्यांच्यासाठी थांबलोत व हे बाहेरून खाऊन आलेत ...ती सहजच म्हणाली ,"अहो सावंताकडे जायच होत हाळदी कुंकवाला मला वाटल तुम्हाला नाश्ता लागतो तर गेली नाही मी आणि तुम्ही ..नाश्ता करून आलात.."


"मग जायच होत ना ?तुला कोणी आडवल बर...!उगाचच चिंता असल्याचा आव आणायचा .."


आता तर ती जास्तच कोसळली ...


मीनासोबत गेली असती फ्रेश झालीअसती मुक्त बहरली असती ..हाच पश्चाताप होता शमाच्या मनात...

शेवटी काय निश्पन्न झालं ..तु फक्त झट सगळ्यांसाठी ...कोणाला तुझी काळजी नाही ..तुला कोणी सांगितल होत ...?झाल असत ना सारच माँनेज तुच पूढे पुढे करतेस ..?जायच होत ना कोण आडवत तुला ...असे सुर ऐकू येऊ लागतात ...

मग वाटत चुकतं का?आपलच कुठेतरी..!


हो हो ...आपणच चुकतो का तर आपण वाहुन घेतो प्रमाणापेक्षा जास्त एखाद्या गोष्टीसाठी,व्यक्तीसाठी व संसारासाठी..सगळ्या गोष्टीत गृहित धरून बसतो ..व स्वतःचच जीवन उध्वस्त करून घेतो...आई म्हणून आडकुन पडतो ...मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीत ..खुपच .पण नंतर ते त्यांना ओझ होत...

बायको म्हणुन कर्तव्यात आडकतो व झटत बसतो पण त्या नवर्याच्या तोंडून बरेचदा


" केल असत ना मी ..तुला कोणी सांगितल होत..?"

हेच विधान येत मग वाटत आपण जास्तच अडकलोत त्यात...नको होत ह्या गोष्टीत पडायला ..

सोबत ,नातलग,संसार घर ह्या सार्यांचही तसच होत..


लग्न करतो व लग्नानंतर आपलं सर्वस्व संसार घर,मुले नवरा, हे समजून स्वतःला बदलतो व गुरफडत जातो भावनांमध्ये आणि त्या भावनांचे मग नंतर जोखड बनत.. आपण आडकतो पण समोरच्याच्या ते लक्ष्यातही येत नाही..

जेव्हा आपल्या लक्ष्यात येत अरे आपल्यावाचून काही आडत नाही हं..!

सार निट चाललयं तेव्हा पश्चाताप उरतो बस...

आपण घरी नसलो कि जेवण हाँटेलमधून येत कधी किचनमध्ये न फिरकणारा नवरा त्याला चहा करूनच घेतो..असे बरीच उदाहरणे बघा..!


म्हणुन नका गृहित धरू आपण नसलो व नाही केल तरी आडत नाही काही नहाकच आती गुरफटत बसण्यापेक्षा आपल्याही जगण्याचा आनंद घ्या...जरा मोकळ व्हा ..! व सगळ सोडा मागे...आपल्या नंतर सारच निट होत ह्या आशेवर... आशेवर नाही निट होत व सगळे करूणच घेतात बर का..?..जरा आपल्या आयुष्याकडे बघा...मदमस्त रहा व जगा ...आती गुरफटण व दुसर्यांसाठी वाहुण घेण सोडा .



धन्यवाद....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy