Deore Vaishali

Classics Inspirational

3  

Deore Vaishali

Classics Inspirational

कशाला हवं अपेक्षांचे ओझे

कशाला हवं अपेक्षांचे ओझे

2 mins
170


"मिराताई...काय हो मुलं इतकी मोठी...इतकी गडगंज संपत्ती त्यांच्याकडे तरीही ...रोज उठुन तुम्ही भाजीपाला विकायचा व्यवसाय करता ...असं का??".


"का?? म्हणजे... मला आवडतं म्हणून...".

मिराताईने शैलाताईला उत्तर देत चेहेर्यावर हसू आणत त्या चालू पडल्यात...चेहेर्यावर कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नाही कि करत असलेल्या कामाची लाज नाही... खुशित रोज भाजीपाला विकून... सायंकाळी सुखाची झोप व स्वाभिमानी जगणं हेचं तर हवं होत त्यांना....


प्रतापराव व मीनाताईने.. लग्नानंतर कष्टाने सार वैभव उभारलं होतं...दोन मुलं..सकाळपासून उन्हातान्हात भाजीपाला विकून शिकवायचं व मोठं करायचं हे त्यांच स्वप्न... होतं...कधीच मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी भासू दिली नव्हती...आपल्या वाट्याला आलेल्या ह्या कष्टात मुलांनी होरपळू नये म्हणून चांगली शाळा व स्वतःपासून कायम दूर ठेवलं...व चांगल्या संस्कारात घडवलं...कारण आईवडील म्हणून त्यांचं कर्तव्यच होत ते...ते त्यांनी चोख पार पाडलं...


तसा व्यवसाय चारचौघात मिरवण्यासारखा नाही असचं त्यांना वाटे पण मुलांना अभिमान होता. आई वडिलांची व त्यांच्या कष्टाची जाणं ठेवून दोघेही भाऊ ...आभ्यासात प्रगती करत होते... दोघांनी त्यांची स्वप्न पुर्ण करत ...चांगल्या ठिकाणी स्वतः च्या हिमतीने व हुशारीने नोकरी मिळवली होती.....मिनाताई व प्रभाकरला त्यांचा अभिमान होता....


"अहो...आता मुलं कमवू लागलीत...आपण हा व्यवसाय बंद करू व मुलांसोबत शहरात स्थाईक होऊ...".

असं मिनाताई प्रभाकर रावांना सांगत असे...पण

"मिना...आईबाप म्हणुन त्यांना शिकवण उभं करणं आपलं काम बघं...ते नोकरीला लागलीत त्यांच्या मेहनतीने...त्यांनी आपला आदर करावा पण त्यांच्यावर..आपण आवलंबून राहावं असं का वाटतं तुला?...जोवर हातात हिम्मत आहे तोवर कमवून स्वाभिमानाने जगू... सोड त्या अपेक्षा जेव्हा सार करणं संपेल ...आपले हातपाय थकतील...तेव्हा ते करतील... पण आजचं नको त्याच्यावर आपेक्षांचे ओझे लादायला ...असच मला वाटतं बघं...आपण आहोत ना सुखात...त्यांनाही राहु दे सुखात..."हे प्रभाकर रावांचे मत होते...


मिनाताईला हे पटलं...हातपाय चालतात तोवर करावं आपणचं...व जगावं स्वाभिमानाने स्वतः च्या हिमतीवर... नाही लादायचे मुलांवर अपेक्षांचे ओझे...म्हणतं फक्त कर्तव्य करत राहिले...मुलांची लग्न झाली... उत्तरोत्तर प्रगती होत होती...मुलं आईवडिलांना त्यांच्याकडे बोलवत होती...पण दोघेही स्वतःच्या कमाईवर व कष्टांने मिळवलेल्या भाकरीत खुश होती...त्यात प्रभाकररावांचे निधन झाले एकट्या आईला मुलं सोडायला तयार नव्हते... मुलांकडे गेल्यावर मिनाताई जास्त बंधिस्त झाल्या..शहरी वातावरण व सगळ्या गोष्टि चकोरीत हे त्यांच्या वळणी पडत नव्हतं..."कष्टाच्या भाकरीने सुखाची झोप लागते मिना."हे प्रभाकर रावांचे वाक्य तिला सतत आठवत होतं...पाहुण्यासारखी चार दिवस राहून मिनाताई गावाकडे परतल्यात...व पुन्हा व्यवसाय सुरू केला...आनंदी व उत्साहाने जगू लागल्यात... मुलेही मध्ये मध्ये आईकडे येत मीनाताई ही मुलांकडे चार आठ दिवस जाऊन राहात...त्यामुळे परिवार आनंदी होता...नात्यांमध्ये आपेक्षा नव्हत्या म्हणून ते नाते...मनाने व प्रेमाने ...मायेचा ओलाव्यात जपलं जात होतं...


मिनाताईला मुलांनी साभाळलचं असतं पण अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांना जगायचं नव्हतं...


कोणत्याही नात्यांमध्ये अपेक्षांचे ओझे नसले ना तर नात्यांची विण घट्ट होते...ते नात दबावात व बळजबरीने निभावताना ..मनात दडपण नसतं.... फक्त दोघंही बाजूंनी ...समजून घेण्याची भावना असावी.. बसं...!



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics