ram gagare

Abstract

2  

ram gagare

Abstract

मी अजुन सेटल नाहीये

मी अजुन सेटल नाहीये

1 min
123


आपण नॉर्मली आपल्या आजुबाजूच्या लोकांना विचारले की,काय चाललंय मग?तर काही लोक आवर्जून बोलतात काही नाही "मी अजुन सेटल नाहीये"!


पण मग सेटल होणं म्हणजे नक्की काय असत?सेटल होण्याची प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी असते.काही लोकांना ते आर्थिकदृष्ट्या परिपुर्ण असणे,ही व्याख्या आहे;तर काहींना शरीर सुदृढ असणे किंवा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी असणे किंवा त्यांच्या भविष्याची चिंता नसणे म्हणजे सेटल होणे असते.

नोकरी करणाऱ्याला वाटते बिझनेस चांगला तर बिझनेस करणाऱ्याला वाटते नोकरी चांगली.पण पहायला गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी असतात आणि आपल्याला स्वतःपेक्षा समोरचाच जास्त सुखी अन सेटल आहे असं वाटतं असत.पण स्वतःच्या आयुष्यातील दुःख, अडचणी ह्या ज्याच्या त्यालाच माहित असतात.तोंडावर प्रत्येक जण मजेत आहे असे म्हणतो;पण सर्वांच्या बाबतीत तो बोलतो ते खरे असेल असे नाही.

कारण इथे प्रत्येकाला आपले दुःख लपवायची कला अवगत झाली आहे.


वास्तविक पाहता आयुष्यात सेटल असे कोणीच नसतो,सेटल होणे हे आपापल्या मानण्यावर आहे.मोजक्या गरजा अन कमीत कमी अपेक्षा असल्याकी सेटल होणं हा विचार मनात डोकावत नाही. कारण कसे आहे ना आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने इतरांशी तुलना न करता जगल की आयुष्यात दुःखाला जास्त थारा मिळत नाही; आयुष्य अन आयुष्यात मिळणाऱ्या संधी ह्यासुद्धा एकदाच भेटतात. तेव्हा त्याच सोन करायचं का माती?हे आपणच ठरवायचं. म्हणजे "मी अजुन सेटल नाहीये"अस म्हणायची वेळ येणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract